Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

भारतातील आरोग्य सेवा भाग 2

 Blog No. 2023/48        

Date: 25th, February 2023.



मित्रांनो, 
        मला आठवतंय ह्याच महिन्यात 6 तारखेला मी आरोग्यसेवेवर एक ब्लॉग लिहिला होता.त्यात मी आरोग्यसेवेत तंत्रज्ञानाचा वाढता वापर हा कसा लाभदायी ठरणार आहे,हे लिहिले होते. माझ्या हाताला असलेल्या स्मार्ट वॉचचे उदाहरण देखिल मी दिले होते.

तंत्रज्ञान आणि मानवी मन 
        तंत्रज्ञान हे वरदायी ठरणार असलं तरी,त्यांना हाताळणारा मानव हा मात्र दिवसेंदिवस  जास्तीतजास्त कमर्शियल होत चालला आहे.त्याला कोण थांबविणार.इतक्यात एक केस ऐकण्यात आली की एका महिलेला कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले.त्या महिलेला किंवा तिच्या घरच्या लोकांना जे निदान केले आहे,ज्या टेस्ट केल्या गेल्या आहेत.त्याचे रिपोर्ट वगैरे उपलब्ध करुन न देताच केमो थेरपी सुरु केली.त्या महिलेच्या संबंधातील लोकांनी तिला आणि तिच्या घरच्या लोकांना केस पेपर मागण्याचा सल्ला दिला आहे.  

 
घडलेला एक किस्सा 
        या संबंधात मला माझ्या भावाच्या मित्राच्या बाबतीत घडलेला किस्सा आठवला.नागपूरला असतांना माझ्या भावाच्या एका मित्राला प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.डॉक्टरांनी सोनोग्राफी करावयास सांगितले.सोनोग्राफीचा रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी  ऑपरेशन करून घ्या.माझ्या दवाखान्यातच करु.रु.35,000/- लागतील असे सांगतले.माझ्या भावाने मला सांगितले,तेव्हा मी त्याला म्हटले की तुझ्या मित्राला वर्ध्याला सेवाग्राम हॉस्पिटलला एकदा सेकंड ओपिनियन घ्यायला सांग.सेवाग्राम हॉस्पिटलला गेल्यावर त्यांनी पुनः एकदा सोनोग्राफी करून घेतली आणि रिपोर्ट पाहिल्यावर सांगतले की सध्या ऑपरेशनची गरज नाही.तुम्ही ज्या गोळ्या घेत आहात,त्याच घेत रहा,आपण विश्वास म्हणून ज्यांच्याकडे जातो त्यांनीच असे केले तर विश्वास कुणावर ठेवायचा.अर्थात सारे असे नसतात.पण जे तसे नसतात ते अपवादात्मक असतात हे तितकेच खरे.प्रत्येक गोष्टीत नाही तरी अपवाद हे थोडेच असतात आणि त्या अपवादांमुळे हा देश चालतो असेही म्हटले जाते. 



मला आलेला अनुभव             
            एक किस्सा माझ्याही बाबतीत घडला तो असा.मागच्या वर्षी साधारणपणे ह्याच दिवसांत मी अकोला, शेगांव आणि खानदेशातील वडोदे येथे गेलो होतो.परतलो तर मला थोडा सायनसचा  त्रास असावा असे वाटले.म्हणून मी इएनटी स्पेशालिस्ट गाठला.त्याने तपासले आणि मला नाकाचे CT Scanning ज्याला CTPNS म्हणतात,ते करावयास सांगितले.CTPNS इएनटी स्पेशालिस्टला दाखविले.त्याने ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले.मनांत आले की दुसऱ्या एखाद्याला एकदा सेकंड ओपिनियन साठी दाखवावे.गूगल सर्चवर एका इएनटी स्पेशालिस्टचे नांव दिसले.(त्या वेळेस मी त्याचे रिव्यू पाहिले नव्हते) त्यांच्याकडे गेलो.त्यांना तो रिपोर्ट दाखविला.त्यांनी मला म्युकर मायकोसिसची भीती दाखविली.त्या वेळेस ही काही डॉक्टर लोकांच्या मनांतून कोविडचे भूत गेलेच नव्हते.त्यांनी एका मोठ्या हॉस्पिटलच्या नावाने भले मोठे पत्र लिहून माझ्या एकाच नाकातील करण्यात येणाऱ्या पाच ऑपरेशनची नांवे,वैद्यकीय भाषेत लिहून दिली.ताबडतोब भरती व्हावे लागेल असे सांगितले.
        आता दोन ओपिनियन झालेत,आता ऑपरेशन करुन घ्यावे म्हणून मी त्या मोठ्या हॉस्पिटलला गेलो. माझे ऑपरेशन दुसऱ्या दिवशी होणार होते.म्हणजे अर्थातच planned होते. पण हॉस्पिटलला जाताच मला Emergency ला घेऊन गेले.माझा मुलगा आणि मिसेस फॉरमॅलिटीज करीत होते.त्या अवधीत माझे बी.पी. ब्लड वगैरे सगळे घेऊन झाले.मग मिसेस म्हणाली की पाच पैकी एका ऑपरेशनचे पैसे इन्शुरेंस कंपनी देईल.बाकीचे आपल्याला भरायला लागतील.मला दोन्ही हाताला एका यंत्राच्या वायरने जकडून ठेवले होते.त्यांना म्हटले अहो मला सोडा.इन्शुरेंसचे फक्त मला माहीत आहे.तेव्हा तिथे ज्या डॉक्टरने माझा बी.पी. ब्लड चेक करायला सांगितले होते. तो म्हणाला "मग पेशंट कोण आहे?" याचाच अर्थ पेशंट कोण आहे ह्याची खात्री करून न घेता,बी.पी. ब्लड वगैरे चेक करीत होते.उजव्या नाकपुडीतील सायनसच्या ऑपरेशनचा खर्च रु.192,000/-. मला इन्शुरेंसच्या ऑफिसला जावे लागेल असे सांगून निघालो. इन्शुरेंसवाल्यांना मी सांगितले की पॉलिसीत Nose एवढेच लिहिले आहे.पण सगळी पाचही ऑपरेशन माझ्या एकाच नाकपुडीतील आहेत.तुम्ही Cash Less अप्रूव करा.तर ते हॉस्पिटलपेक्षा भारी. तुम्ही भरती होऊन जा,आम्ही नंतर पाहू.त्या नंतर मी ऑपरेशन केले नाही.मला काही त्रासच होत नव्हता.फक्त एक रिपोर्ट मात्र सांगत होता. 


सारांश     
         मित्रांनो, म्हणून सांगतो की परिस्थिति फार गंभीर आहे.काळजी घ्या.एक उपाय असंही आहे की गूगल मध्ये डॉक्टरबद्दल इतरांनी पोस्ट केलेले रिव्यू बघा. कारण 50 लोकांनी जर चांगला रिव्यू दिला असेल तर त्या 50 जणांची फसगत होणे अवघड आहे.तुम्हाला दिलेली औषधे सुध्या  पाहून घेत चला.तुम्हाला diabetes किंवा बी.पी. कुठलाही आजार असेल तर नेहमीच्या डॉक्टर शिवाय दुसऱ्या डॉक्टरकडे गेले असाल तर त्याची पूर्वकल्पना त्या डॉक्टरना द्या.विश्वास सगळ्यांवर आहे असे दाखवायचं,कुणावर ठेवायचा हे आपण ठरवायचं कारण शरीर आपले आहे, जीवन ही आपलेच आहे आणि जीवही आपलाच.  


     प्रसाद नातू,पुणे.               
        
                
                                                                                






            

Comments

  1. Khara ahe.. jashi drugs price control mpst and cannot afford.Administration asta tasa ya specialist/doctors na regulate karnyachi veli ali ahe. Root cause lies lies with education and set up cost of these doctors. We need to adopt communist model of regulating things which the society needs

    ReplyDelete
  2. खरंय. सगळं जगच कमर्शियल झालंय, वैद्यकीय क्षेत्र थोडे अधिकच. कारणेही तशीच आहेत. वैद्यकीय शिक्षणाचा खर्च अवाढव्य आहे. जे पैसे घालतील ते लवकरात लवकर वसूल करायला बघतील.

    हा आपल्या जीवाशी खेळ असल्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी एवजध्ये नक्की.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...