Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

एक अनोखा गीतकार

Blog No. 2023/47      

Date: 24th, February 2023.



 मित्रांनो

            तुम्हाला आशिकी हा चित्रपट नक्कीच आठवत असेल.राहुल रॉय आणि अनू अग्रवालच्या भूमिका असलेला हा चित्रपट खूप गाजला.त्याची जवळपास सर्वच गाणी हिट झाली. “सासों की जरुरत है जैसे,जिंदगी के लिए बस एक सनम चाहिये आशिकी के लिए” “नजर के सामने जिगर के पास” “तू मेरी जिंदगी है,तू मेरी हर खुशी है, धिरे धिरे से मेरी जिंदगी मे आना” ही आशिकीतील सगळी गाणी कुमार सानूने अन्य गायकांसोबत गायलीत आणि एका रात्रीत तो सुपर स्टार झाला.संगीत होते नदीम श्रवणचे ही जोडी देखील प्रसिद्ध झाली.ह्या चित्रपटाची गाणी लिहिली होतीम समीर यांनी. समीर हे कवि अंजान ह्यांचे सुपुत्र. अंजान तुम्हाला नक्कीच आठवत असतील ते “खइके पान बनारस वाला” “लोग कहते है मै शराबी हू” यासारख्या गाण्यांसाठी.





समीर बद्दल थोडे

            गीतकार समीर चे पूर्ण नांव समीर अंजान पांडे. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1958 चा. त्यांचा जन्म बनारसचा. त्यांनी बी.कॉम केले आणि बँक अधिकारी म्हणून ते सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये रुजू झाले.पण हे आपले क्षेत्र नाही असे म्हणत त्यांनी चक्क  सुरक्षित नोकरी सोडून बेभरवश्याच्या क्षेत्रात पदार्पण केले.अर्थात वडिलांचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी होता.समीर ह्यांनी 617 चित्रपटांसाठी 3 हजार 400 गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे नांव “गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंदवले गेले त्यांनी. गीतकार आनंद बक्षी ह्यांचा 624 चित्रपटात 3 हजार 200 गाण्याचा त्या पूर्वीचा रेकॉर्ड मोडला आणि बापसे बेटा सवाई असल्याचे दाखवून दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीस त्यांनी बेघर,इंसाफ कौन करेगा,जबाब हम देन्गे,रखवाला,महासंग्राम आदि चित्रपटांसाठी गाणी लिहिली.पण म्हणावे तसे यश मिळाले नाही. 1989-90 च्या आशिकीने त्यांना हात दिला आणि मग त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. 

 त्यांना लाभलेले संगीत दिग्दर्शक

            चित्रपट रसिकांवर आपल्या शब्दांचे मायाजाळ टाकणाऱ्या समीर यांनी आपल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत 100 हून अधिक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले. यात अनू मलिक,आदेश श्रीवास्तब, इलया राजा, ए.आर. रहमान,जतिन ललित,दिलीप सेन-समीर सेन,नदीम श्रवण, राजेश रोशन. शंकर-एहसान-लॉय ह्यांच्या सोबत त्याची चांगली जोडी जमली.                                                  

 

समीरने केलेले चित्रपट

समीरने गाणी लिहिलेल्या आँखे’, ’आशिकी’, ’कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कुली नंबर वन’, ‘जुर्म’, ‘तेरे नाम’, ‘दबंग-२’, ‘दिल है की मानता नही’, ‘दिवाना’, ‘देवदास’, ‘धडकन’, ‘धूम’, ‘फिजा’, बेटा’, ‘बोल राधा बोल’, ‘राजाबाबू’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘रावडी राठोड’, ‘शोला और शबनम’, ‘सडक’, साजन’, ‘सावरियाँ’, ‘हम है राही प्यार के’, ‘हीरो नंबर वन’ चित्रपटातील गाणी लोकप्रिय झाली. समीरने हिन्दी व्यतिरिक्त  भोजपुरी आणि मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत.



 
समीर यांची काही गाजलेली गाणी

1. आये हो मेरी जिंदगीमे तुम बहार बनके

2. घुंगट की आडसे दिलबरका

3. तुम्हे अपना बनाने की कसम खाई है

4. तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है

5. धिरे धिरे से मेरी जिंदगीमे आना

6. धूम मचा ले धूम मचा ले      

7. सांसो की जरुरत है जिंदगीके लिए

8. दिल है के मानता नही

9. नजर के सामने जिगर के पास

10.परदेसी परदेसी जाना नही

11. मुझे निंद न आये

12. मैने प्यार तुम्हीसे किया है

13. मै दुनिया भुला दुंगा तेरी चाहत मै


पुरस्कार आणि सन्मान

फिल्मफेअर पुरस्कार


1991 मधे सर्वोत्तम गीतकार आशिकी मधील नजर के सामनेसाठी

1993 मधे गीतकार दिवाना मधील तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है साठी

1994 मधे गीतकार हम है राही प्यार के मधील साठी

            अशा या सुरेल गीतकाराला त्याच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.

 

 

प्रसाद नातू,पुणे

 

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...