Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

जो राह चुनी तुने


Blog No. 2023/46     

Date: 23rd, February 2023.

 


मित्रांनो,

            कधीकधी काही गाणी आपल्याला खूप काही सांगून जातात आणि कधी तरं असं वाटतं की हे गाणं आपल्यासाठीच लिहिले असावे.मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हा असचं एक गाणं ऐकल आणि लक्षात ठेऊनच मी जीवनाची पुढील वाटचाल केली.असे म्हटले तर गैर होणार नाही.त्यावेळेस आलेल्या "तपस्या" या चित्रपटात राखी गुलजार आणि परीक्षित सहानी हे दोघे दिग्गज कलाकार होते.या चित्रपटातलं "जो राह चुनी तूने उसी राह पे राही चलते जाना रे" हे गाणं स्व.किशोरकुमार यांनी केवळ छान आणि सुंदरच म्हटलेलं नाही तर अतिशय भावस्पर्शी म्हटलेलं आहे. गाण्यात एक छानसा अर्थ आहे,अगदी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.असे म्हटले तरी चालेल.मला हे  गाणं  नेहमीच भावतं.

!! मुखडा !!

जो राह चुनी तुने उसी राह पे राही चलते जाना रे

वो कितनी भी लंबी रात दिया बन जलते जाना रे

 ह्याचा अर्थ असा की

तू जी वाट निवडली आहेस, त्या वाटेने चालत रहा.तुला वाटेने न जाण्यासाठी कुणी कितीही हत्सोहित केले तरी तू आपल्या निश्चयापासून ढळू नकोस.ती रात्र किती ही मोठी असो तरी दिवा बनून तेवत रहा.म्हणजेच दु:खाचा  काळ  कितीही मोठा असला तरी त्या दु;खरुपी अंधारात स्वयंप्रकाशाने पुढे चालत रहा.     

 पुढे कवि म्हणतो,

!!अंतरा !!

                         कभी पेड का साया, पेड के काम न आया,

                        सेवा मे सभी की उसने जनम बिताया,

                        कोई कितने भी फल तोडे, उसे तो भाई फलते जाना रे.

ह्याचा अर्थ असा की,

झाडाची सावली झाडाच्या कधीच कामांत येत नाही. किती खरंय हे की, झाडाची सावली त्याच्या कधीच कामात येत नाही, ऊन्हात ते झाड इतरांना मात्र सावली देत असतं.त्या सावलीचा त्या झाडाला कधीच फायदा घेता येत नाही. त्या झाडाचा जन्म इतरांची सेवा करण्यात जातो. कोणी त्याच्यावर  लागलेली सर्व फळे तोडली तरी ते आपला फुलण्याचा,फलण्याचा धर्म कधीच सोडत नाही.तू इतरांना आधार दे पण तुला कोणाचाही आधार मिळेल ह्याची अपेक्षा न ठेवता हे कार्य कर.तुझ्याकडून सर्व काही घेण्याचा इतर जण प्रयत्न करतील पण तू आपल्या देण्याचा धर्म कधी सोडू नकोस.     

पुढे कवि म्हणतो,  

!!अंतरा !!

                        तेरी अपनी कहानी ये दर्पन बोल रहा है,

                        भीगी आंख का पानी हकीकत खोल रहा है,

                        जिस रंगमे ढादे वक्त मुसाफिर चलते जाना रे.

ह्याचा अर्थ असा की

तुझे जे वास्तव आहे ते कधीच तू लपवू शकणार नाहीस.कारण ते तुझा चेहरा सांगतोय.तुझ्या डोळ्यातील पाणी सारेच काही सांगून जाते. जे समोर येईल ते जसेच्या तसे तुला स्विकारायचं आहे आणि चालत रहायचं आहे.     

फिल्मी गाणी लिहिणाऱ्या कवींना कवी न म्हणता गीतकार का म्हणायचे हे मला अजूनही कळलेलं नाही. आधीच्या काळात गीतकार म्हणजे कवी पेक्षा थोडासा हलक्या दर्जाचा असा समजला जायचा. का कुणास ठाऊक? या गीताचे गीतकार एम.जी.हशमत हे किती सुंदर सांगून गेले आहेत या गीतात.मार्ग दाखविणारे पथदर्शक असे ही गाणे आहे.कधी कधी कठीण प्रसंगात आपली मती कुंठित होते.आता नेमकं काय करायचं ही हे सुचतं नाही तेव्हा ही गाणी मार्ग दाखवितात.अंधारातून प्रकाशाकडे नेतात.विचार करायला लावतात आणि नेहमीच आपल्या सोबत असतात.माझ्या जीवनाशी या अशाच सुंदर गीतांची नाळ केव्हा जोडली गेली मला कळलचं नाही.अन मग जीवनाची वाटचाल केवळ प्रवाही झाली नाही तर सुकर झाली,सोपी झाली.गाण्यांचे माझ्या जीवनात मोठे योगदान आहे.  




प्रसाद नातु,पुणे 

Comments

  1. फारच सुंदर गाणे आणि समर्पक रसग्रहण.

    ReplyDelete
  2. मीनल ओगले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...