Blog No. 2023/38
Date: 14th, February 2023.
मित्रांनो,
आनंद बक्षी ह्यांनी जीवनात 4000 च्या
वर गाणी लिहिली.ह्यातील बऱ्याचशा गाण्यांना ऐकून अनेकांचे life बदलले असेल.म्हणजे
ज्या गायकांनी गायली,ज्या चित्रपटात होती त्या निर्माते-दिग्दर्शकांचे,त्यातील
नायकांचे, संगीतकारांचे.कारण बरेचसे चित्रपट हे केवळ गाण्यांवर हिट झाले,बरेचसे
चित्रपट कहाणी चांगली,स्टारकास्ट चांगली,अगदी दिग्दर्शक चांगले असूनही चित्रपटातील
गाणी चांगली नसल्यामुळे पडल्याची अनेक उदाहरणे देता येतील.
हे झाले ते
गाणे ज्या चित्रपटात होते,त्या चित्रपटाशी संबंधित लोकांच्या बाबतीत.पण अनेक
लोकांना गाण्यांनी घडविले आणि त्यातील मी एक.जीवनाच्या खडतर प्रवासात एक गाणं
माझ्या मदतीला आलं.अनुरोध हा राजेश खन्नाचा चित्रपट.राजेश खन्नाची कारकिर्द जवळपास
उतरणीला लागलेली.1973 च्या जंजीर नंतर अमिताभ बच्चनचा उदय झाला.1975 च्या शोले नंतर अमिताभचे स्टारडम सुरु झाले.अन फेब्रुवरी 1977 ला अनुरोध हा चित्रपट आला.अन तो
मुख्यतः गाण्यामुळे चालला.किशोर कुमारच्या “आपके अनुरोध पे मै ये गीत सुनाता हूं”
“आते जाते खूबसूरत आवारा सडकोपे” “मेरे दिल ने तडप के जब नाम तेरा पुकारा” ह्या गाण्याच्या
मानाने मन्ना डे यांनी गायलेले आणि अशोककुमारवर चित्री केलेले “तुम बेसहारा हो तो किसी का सहारा बनो” हे गीत मागे
पडले. अशोककुमारचा ह्या गाण्यातील सुरेख अभिनय ह्यामुळे देखिल हे गाणे आवडले. त्या सोबत हे अर्थपूर्ण गाणं गाणं आहे म्हणून देखिल मला खूप आवडलं,भावले.किती सुंदर अर्थ आहे ह्या गाण्याचा.
बघा ना.
!! मुखड़ा !!
तुम बेसहारा हो तो किसी का सहारा बनो
तुमको अपने आप ही सहारा मिल जाएगा
कश्ती कोई डूबती पहुचा दो किनारे पे
तुमको अपनेआप ही किनारा मिल जाएगा !!
मुखड़ा !!
ह्या गाण्यात कवि म्हणतो,”तुम्ही स्वत: “बेसहारा आहात,तुम्हाला कुणाचा आधार
नाही.तर तुम्ही दुसऱ्याला आधार द्या.आपोआप तुम्हाला त्याचा आधार मिळेल.एखाद्या
डुबणाऱ्या नावेला किनाऱ्या पर्यन्त पोहोचवा.अन
तुम्हाला आपोआप किनारा सापडेल.किती सुंदर.
!! अंतरा 1 !!
हंस कर जिंदा रहना पड़ता है,अपना
दु:ख खुद सहना पड़ता है
रस्ता चाहे कितना लंबा हो,दरिया
को तो बहना पड़ता है
तुम हो एक अकेले तो रुक मत जाओ चलो निकलो
रस्ते मे कोई साथी तुम्हारा मिल जाएगा
कवि पुढे म्हणतो की जीवनातील दु:ख आपल्यालाच सहन करायचे हे
आपल्याला माहित असतं.मग जीवन हसत हसत जगा.दु:खाचा बाऊ करु नका,दु:ख कुरवाळत बसू
नका.नदीला किती दूर वहात जायचे,ह्याची तिला कल्पना नसते.पण तरी ती तिचे वहात राणे थांबवत
नाही, वहात जाते.तसे तुम्ही रस्त्यात म्हणजे जीवनाच्या प्रवासात कुठे थांबू
नका.चालत रहा कारण एक दिवस, रस्त्यात तुम्हाला तुमचा साथीदार नक्कीच मिळेल.
!! अंतरा 2!!
जीवन तो एक जैसा होता है,कोई
हँसता कोई रोता है
सब्र से जीना आसां होता है,फिक्र
से जीना मुश्किल होता है
थोड़े फूल है काँटे है जो तकदीर ने बाँटे है
हम को ईन मे से हिस्सा हमारा मिल जाएगा
कवी पुढे म्हणतो जीवन तर सगळ्यांचे एक सारखेच असते.कुणी ते
हसत हसत जगतो,तर कुणी कुणी रडत रडत.काळजी करत जगणं
खरं तर कठीण जातं.तेच जरा संयम बाळगला आणि विश्वास बाळगला,की
एक दिवस माझाही येईल.तर तेच जीवन सोप होतं.नशिबाने आपल्या रस्त्यात थोडे फूलं तर
थोडे काटे पेरून ठेवलेत.त्यातील जे काही नशिबात आहे ते आपल्या वाट्याला येईलच.
थोडक्यात
खरं पाहयला गेले तर ह्यात मानसशास्त्र आहे,थोडे अध्यात्म आहे.पण मला वाटतं की एकंदरीत ह्या गाण्यात सुखी जीवनाचं सार सामावलं आहे.म्हणून हे गाणं मला फार आवडतं. मन्नादांनी सुद्धा ते अप्रतिम गायले आहे. आपल्याला गाता गाता भरून येतं.ह्याची चाल संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी देखिल सुमधुर बांधली आहे. तुम्ही देखिल ऐका आणि आनंद घ्या ह्या आनंद बक्षी यांच्या गाण्याचा.
अनुरोध ह्या चित्रपटात राजेश खन्नासोबत विनोद मेहराची खूप हृदयस्पर्शी भूमिका
होती,ह्या चित्रपटात तो कवि झाला होता आणि हे गाणे चित्रपटात विनोद मेहराने
लिहिलेले असते. परवाच त्याचा जन्मदिवस होता. त्या दिवशी त्याच्या बद्दल लिहितांना
मला हे गाणे आठवले.
प्रसाद नातु,पुणे
https://youtu.be/hEB42UzSFIg

कई बार यह गाना सुना
ReplyDeleteआज इस गाने को पुनः अर्थपूर्ण तरीके से पढ़ना बहुत ही अच्छा लगा -धन्यवाद
छान लिहिलाय सर
ReplyDelete1990 kivha mid 90s paryantachi arthapoorna ani samarnat rahnari gani ani tyanantarchi gani madhe Hach farak ahe. Tum besahara ho to hey gana me vividh bharti var baryach da aikla ahe. Mala vatta this song lacked the populist tag. Of course vividh Bharati ne kadhi ha bhedbhav kela nahi. Mast blog tumhi Artha sangitlyamule ankin arthapoorna jala
ReplyDelete