Skip to main content

Posts

Showing posts from February, 2023

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

पुस्तकप्रेमी समूह- 1000 वा पुस्तक परिचय भाग 2 रा

  Blog No. 2023/5 1       Date:2 8 th , February 2023.   मित्रांनो,                      कालच्या ब्लॉगमध्ये मी पुस्तकप्रेमी समूहाची स्थापना कशी झाली. पुस्तकप्रेमी समूहाच्या स्थापनेमागचे उद्देश,पुस्तकप्रेमी समूहाच्या नियमाबद्दल लिहिले होते.आज मी पुस्तकप्रेमी समूहातर्फे समूहातील सदस्यांना सक्रिय ठेवण्यासाठी आणि त्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी ज्या  विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आणि केले जात आहे,त्या बद्दल लिहिणार आहे.            पुस्तकप्रेमी समूहाचे अन्य उपक्रम शब्द-काव्य संध्या                     समूहाद्वारे सदस्यांना सक्रिय ठेवण्यासाठी अन व्यक्त होण्यास वाव मिळावा म्हणून दर शनिवारी 4.00 नंतर शब्द काव्यसंध्येचे आयोजन केले गेले.आधल्या रविवारी किंवा सोमवारी एक शब्द दिला जात असे. त्या शब्दाला अनुसरून कविता ज्या सदस्याने कविता रचिली आहे....

मनमोहन देसाई - एक अनोखा दिग्दर्शक

Blog No. 2023/49          Date: 26th, February 2023.   मित्रांनो,             मनमोहन देसाई हे 70 आणि 80 च्या दशकातील सर्वात यशस्वी चित्रपट निर्मात्यांपैकी एक समजले जातात. बॉलीवूड मधील सर्वात प्रभावशाली चित्रपट दिग्दर्शक आणि मसाला चित्रपटाचे प्रणेते म्हणून देसाई मानले जातात. हिन्दी चित्रपटांचे एक वेगळे युग त्यांच्या मुळे अनुभवास मिळाले.     मनमोहन देसाई बद्दल थोडे काही             मनमोहन देसाई यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1937 चा. ते एका गुजराती कुटुंबात जन्माला आले. त्यांचे वडील किकूभाई देसाई हे पॅरामाउंट स्टुडिओ (नंतरचे फिल्मालय) चे मालक आणि भारतीय चित्रपट निर्माते होते.त्यांनी  मुख्यतः स्टंट चित्रपट जसे की सर्कस क्वीन, गोल्डन गँग आणि शेख चिली चित्रपट बनविले.त्यांचे मोठे भाऊ सुभाष  देसाई यांनी त्यांना 1960 मध्ये छलिया चित्रपटात दिग्दर्शक म्हणून चान्स दिला.निर्माता सुभाष देसाई ह्यांनी निर्मिलेल्या ब्लफ मास्टर,धरमवीर आणि देशप्...

भारतातील आरोग्य सेवा भाग 2

  Blog No. 2023/48         Date: 25th, February 2023. मित्रांनो,           मला आठवतंय ह्याच महिन्यात 6 तारखेला मी आरोग्यसेवेवर एक ब्लॉग लिहिला होता.त्यात मी आरोग्यसेवेत तंत्रज्ञानाचा वाढता वापर हा कसा लाभदायी ठरणार आहे,हे लिहिले होते. माझ्या हाताला असलेल्या स्मार्ट वॉचचे उदाहरण देखिल मी दिले होते. तंत्रज्ञान आणि मानवी मन            तंत्रज्ञान हे वरदायी ठरणार असलं तरी,त्यांना हाताळणारा मानव हा मात्र दिवसेंदिवस  जास्तीतजास्त कमर्शियल होत चालला आहे.त्याला कोण थांबविणार.इतक्यात एक केस ऐकण्यात आली की एका महिलेला कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले.त्या महिलेला किंवा तिच्या घरच्या लोकांना जे निदान केले आहे,ज्या टेस्ट केल्या गेल्या आहेत.त्याचे रिपोर्ट वगैरे उपलब्ध करुन न देताच केमो थेरपी सुरु केली.त्या महिलेच्या संबंधातील लोकांनी तिला आणि तिच्या घरच्या लोकांना केस पेपर मागण्याचा सल्ला दिला आहे.     घडलेला एक किस्सा            या संबंधात मला माझ्या भावाच्या...

एक अनोखा गीतकार

Blog No. 2023/47       Date: 24th, February 2023.   मित्रांनो             तुम्हाला आशिकी हा चित्रपट नक्कीच आठवत असेल.राहुल रॉय आणि अनू अग्रवालच्या भूमिका असलेला हा चित्रपट खूप गाजला.त्याची जवळपास सर्वच गाणी हिट झाली. “सासों की जरुरत है जैसे,जिंदगी के लिए बस एक सनम चाहिये आशिकी के लिए” “नजर के सामने जिगर के पास” “तू मेरी जिंदगी है,तू मेरी हर खुशी है, धिरे धिरे से मेरी जिंदगी मे आना” ही आशिकीतील सगळी गाणी कुमार सानूने अन्य गायकांसोबत गायलीत आणि एका रात्रीत तो सुपर स्टार झाला.संगीत होते नदीम श्रवणचे ही जोडी देखील प्रसिद्ध झाली.ह्या चित्रपटाची गाणी लिहिली होतीम समीर यांनी. समीर हे कवि अंजान ह्यांचे सुपुत्र. अंजान तुम्हाला नक्कीच आठवत असतील ते “खइके पान बनारस वाला” “लोग कहते है मै शराबी हू” यासारख्या गाण्यांसाठी. समीर बद्दल थोडे             गीतकार समीर चे पूर्ण नांव समीर अंजान पांडे. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1958 चा. त्यांचा जन्म बनारसचा. त्यांनी ...

जो राह चुनी तुने

Blog No. 2023/46      Date: 23 rd , February 2023.   मित्रांनो,             कधीकधी काही गाणी आपल्याला खूप काही सांगून जातात आणि कधी तरं असं वाटतं की हे गाणं आपल्यासाठीच लिहिले असावे.मी कॉलेजमध्ये होतो , तेव्हा असचं एक गाणं ऐकल आणि लक्षात ठेऊनच मी जीवनाची पुढील वाटचाल केली.असे म्हटले तर गैर होणार नाही.त्यावेळेस आलेल्या "तपस्या" या चित्रपटात राखी गुलजार आणि परीक्षित सहानी हे दोघे दिग्गज कलाकार होते.या चित्रपटातलं "जो राह चुनी तूने उसी राह पे राही चलते जाना रे " हे गाणं स्व.किशोरकुमार यांनी केवळ छान आणि सुंदरच म्हटलेलं नाही तर अतिशय भावस्पर्शी म्हटलेलं आहे. गाण्यात एक छानसा अर्थ आहे , अगदी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.असे म्हटले तरी चालेल.मला हे  गाणं   नेहमीच भावतं. !! मुखडा !! जो राह चुनी तुने उसी राह पे राही चलते जाना रे वो कितनी भी लंबी रात दिया बन जलते जाना रे   ह्याचा अर्थ असा की तू जी वाट निवडली आहेस , त्या वाटेने चालत रहा.तुला वाटेने न जाण्यासाठी कुणी कितीही हत्सोहित केले तरी...

इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी

B log No. 2023/45         Date: 21st, February 202 3     मित्रांनो,            कल्पना करा तुम्ही पुण्यात रहात आहात.बाणेरला तुमचे घर आहे आणि तुम्हाला ऑफिसला हडपसरला जायचे आहे. तुम्हाला हडपसरला पोहोचायला कमीतकमी सव्वा तास वेळ लागणार हे निश्चित.हे गुगल मॅप वरुन  सांगतो आहे.पण काही दिवसांनी किंवा महिन्यांनी हेच अंतर तुम्ही 15 मिनिटांत पार करू शकाल.असे मी तुम्हाला सांगितले तर  तुमचा विश्वास बसणार नाही,बरोबर ना.पण मित्रांनो बंगळुरु मधील एरो इंडिया शोमधे ईप्लेन कंपनीच्या नॉन-फ्लाइंग प्रोटोटाइप मॉडेलने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.ही एक इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी आहे.   ई-प्लेन कंपनीचे उद्दिष्ट             आयआयटी मद्रास येथे इनकुबेटेड ईप्लेन कंपनीची स्थापना प्राध्यापक सत्य चक्रवर्ती यांनी केली आहे. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि त्यामुळे प्रवासास लागणारा वेळ कमी करण्याचे उद्देश्यातून काम करण्यास सुरुवात केली.शहरांतर्गत प्रवास आणि मालवाहतूक जलद करण्यासाठी ...

लिव इन रिलेशनशीप,

  Blog No. 2023/44        Date: 21st, February 2023.     मित्रांनो,             आजकाल काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत,की ज्यामुळे लिव इन रिलेशनशीप ही संकल्पना अधिक प्रकर्षाने प्रकाशात आली आहे.लोकसत्ता दैनिकात देखिल 2-3 दिवसापूर्वी “ पेच नातेसंबंधांचा” हा अग्रलेख प्रकाशित झाला आहे.त्यात सर्वच गोष्टींचा छान ऊहापोह केला आहे.म्हणून मी सहज लिव इन रिलेशनशीप बद्दल अधिक जाणून घ्यायचे ठरविले. कारण विषय ज्या वेळेस ताजा असतो त्याच वेळी ब्लॉग लिहायचा असतो. हे ब्लॉग लिहिण्याचा मुख्य मंत्र हे ब्लॉग रायटींगच्या एका कार्य शाळेत शिकलेलो. आज अर्थातच माझा ब्लॉग लिव इन रिलेशनशीपवर आहे.   लिव इन  रिलेशनशीप  म्हणजे काय             तर आधी जाणून घेऊयात की लिव इन रिलेशनशीप हे नेमके काय प्रकरण आहे. लिव इन रिलेशनशीप म्हणजे कुठल्याही विवाह बंधनात न अडकता जोडप्याने एकत्र राहणे.सध्या तरी एक पुरुष आणि एक स्त्री हिच जोडप्याची व्याख्...