Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

भंडाऱ्यातील ‘भ्रुशुंड गणेश’

Blog No.2023/003

Date:- 7th, January,2023. 



नमस्कार मित्रांनो,

          माझ्या विदर्भाच्या फेरफटक्याची एक सकारात्मक बाजू म्हणजे,एखाद दुसऱ्या रस्त्याचा अपवाद वगळता, ड्रायविंग सुखावह करणारे आणि वाटणारे रस्ते. पुण्याच्या आसपास देखिल जायचे म्हणजे ‘मेजर पार्ट’ हा प्रवासात जातो.विरंगुळा म्हणून बाहेर पडावे तर आपल्या विरंगुळयाच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी,अक्षरक्ष: संघर्ष करावा लागतो.तिथे पोहोचलो की आराम करण्यात वेळ जातो आणि परत येतांना तेच.म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून जरा सुटका व्हावी,म्हणून पिकनिकला जायचं, पण तसं होतांना दिसत नाही.विदर्भात तसे नाही.काही वेळेस रस्त्यावर माझी एकट्याची कार धावत असल्याचा अनुभव आला,ड्रायविंग करतांना मजा आली.

 माझा पुढचा टप्पा भंडारा     

माझा पुढचा टप्पा होता भंडारा.भंडारा शहर गोंदियाला जातांना येतांना बरेचदा बघितलेले.जाऊन राहयलो नव्हतो.वैनगंगा विदर्भातील एक प्रमुख नदी भंडाऱ्याजवळून जाते.या व्यतिरिक्त विदर्भातील अष्टगणेशांपैकी एक गणेश येथे आहे,हे ऐकून माहित होते.त्याचे नावं काय वगैरे ह्याची ह्याची माहिती नव्हती.ह्या वेळेस दर्शन घ्यायचेच हे ठरविले होते.

भ्रुशुंड गणेश आणि त्या बद्दल बरेच काही

ठरविल्याप्रमाणे भंडाऱ्यातील ‘मेंढा’ भागात असणाऱ्या ‘भ्रुशुंड गणेशाच्या’ दर्शनास जाऊन पोहोचलो. मुळ स्वरुपातील ‘हेमाडपंथी’ बांधकामातील हे मंदिर दगडी बांधकामाचे होते.त्या समोर ओटा आणि गणेशाच्या मूर्तीसमोर ‘शिवलिंग आणि मूर्ती’ असे. पण जीर्णोद्धारानंतर मंदिराचा विस्तार करून ‘शिवलिंग आणि मूर्ती’ मंदिरातच इतरत्र  स्थापित करण्यात आल्या. ‘भ्रुमध्यात शुंड: इति भ्रुशुंड’ असे गणेश पुराणात नामकरण केल्याप्रमाणे ‘स्वरूप समाधीत’ असलेली ही एकमेव गणेश मूर्ती रक्ताश्म शिळेवर कोरलेली आहे. गाभार्यात तळापासून 8 फुट उंच आणि 4 फुट रुंद अशी गणेशाची मूर्ती चतुर्भुज आणि मुशकारुढ आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे.मुख्य म्हणजे ह्या गणेश मूर्तीला दाढी आणि मिश्या आहेत.गणेश पुराण आणि मुदगल पुराणातील काही खुणा,शिल्पे आणि पुरावा ह्या मंदिरात आढळून येतो. मंदिराच्या बाहेर चौथाऱ्यावर एक हनुमानाची मूर्ती आहे.उग्र रुपातील डोक्यावर छत नसलेला हा हनुमान किंवा मारुती नवसाला पावतो अशी धारणा आहे.  

लिळाचरित्रातील संदर्भानुसार ई.स. 1130 मधे ‘निळंभट भंडारेकर’ ह्या ग्रामजोशींच्या उपस्थितीत ह्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली.तेव्हापासून जोशी कुटुंबाकडे पूजेची वंशपरंपरागत परंपरा चालत आलेली आहे. कै. विश्वासराव जोशी ह्यांच्या अथक परिश्रमातून ह्या मंदिरास प्रसिद्धी प्राप्त झाली. येथे पौष वद्य सप्तमी पासून ते माघ शुक्ल पंचमी पर्यन्त (वसंत पंचमी) सार्वजनिक गणेशोत्सवास साजरा केला जातो. सामाजिक एकात्मतेचे उत्तम उदाहरण म्हणून हा सार्वजनिक गणेशोत्सव ओळखला जातो. असा हा एक अष्टगणेश आहे.

 विदर्भातील अष्टगणेश किंवा अष्टविनायक:-

पश्चिम महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणे विदर्भात अष्टगणेश किंवा अष्टविनायक आहेत.नागपूर, भंडारा, वर्धा,यवतमाळ आणि चंद्रपूर अशा पाच जिल्ह्यात ही मंदिरे स्थापित आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणे हया गणपतीचे विशिष्ट क्रमाने दर्शन करायला हवे कां,ह्या संबंधी विचारणा केली. पण तत्संबंधी विशेष माहिती मिळाली नाही.हे अष्टगणेश किंवा अष्टविनायक पुढीलप्रमाणे :-

1.       टेकडी गणपती, नागपूर .

2.       शमी विघ्नेश, आदासा, जिल्हा नागपूर.

3.       अष्टदशभुज, रामटेक, जिल्हा नागपूर.

4.       भ्रुशुंड गणेश, मेंढा, भंडारा.

5.       सर्वतोभद्र गणेश, पवनी, जिल्हा भंडारा.

6.       सिद्धीविनायक, केळझर,जिल्हा वर्धा.

7.       चिंतामणी, कळंब, जिल्हा यवतमाळ आणि

8.       वरदविनायक, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर.

आपण भ्रुशुंड गणेश, मेंढा येथे जाऊन दर्शन घ्यावे. गणेशाचं वेगळचं रूप अनुभवाल हे निश्चित.

 

                                                                                                    प्रसाद नातु, पुणे.                                  





Comments

  1. छान माहितीपूर्ण पोस्ट.

    ReplyDelete
  2. Pratyakshat tithing safar ghadvun anlyabaddal khup khup dhanyavaad

    ReplyDelete

Post a Comment