Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

व्यक्त होणे खरोखर इतके कठीण आहे कां?

 

मित्रांनो,

कालचे माझे ब्लॉग पेज “इस्त्रीचे कपडे की चेहरा?" ला आपण उदंड प्रतिसाद दिलात. या बद्दल खरं तर आपल्या सगळ्यांचे मला आभार मानायचे होते. म्हणून आजचे हे ब्लॉग पेज लिहितोय. त्याच सोबत आणखी एक कारण घडलं. त्या विषयी लिहावे वाटले. आज बऱ्याच दिवसांनी माझी बँक, बँक ऑफ इंडियाला गेलो होतो. माझ्या सोबत ज्यांनी कामं केलं, असे फार कमी स्टाफ सदस्य तिथे आहेत. काहींचे प्रमोशन तर काहींची ट्रान्सफर यामुळे बदलून गेलेत. माझा नुकताच साहित्यातील योगदानाबद्दल कॉसमॉस बँक आणि ग्रीन वर्ड पब्लिकेशन तर्फे सन्मान करण्यात आला. त्याबद्दल माझे सर्वांनी अभिनंदन केले.सर्वांना नाही येतं लिहिता, ही एक कला आहे,असेही काही जणांचे मत पडले. पण कसे लिहावे या बद्दल तुम्ही काही टिप्स आम्हाला देऊ शकाल कां? अशी विचारणा ही केली. मला खूप आनंद झाला की, माझ्या सहकाऱ्यांमध्ये कमीतकमी लिहिण्याची इच्छा झाली.

मी त्यांना सांगितले की, यासाठी तुम्ही काही वाचायला हवे. पुस्तकं घेऊन वाचायला हवीत. हे सांगतांना मी त्यांना हे देखिल सांगितले, कि ठिक आहे. वेळ मिळतं नाही हे खरे आहे. पण आपली बँक विविध सर्क्युलर, वेगवेगळ्या पॉलिसी जारी करीत असते. हे सर्व जर वाचलेत तर त्यातून दोन उद्देश सफल होतील. पहिला हा, की तुम्ही काही तरी वाचाल, त्याने वाचायची सवय होईल. दुसरा हा की विविध सर्क्युलर, वेगवेगळ्या पॉलिसी वाचल्याने, तुमचे बँकेतील कार्यासंबंधीचे ज्ञान वाढेल. ज्याचा तुम्हाला दैनंदिन कामकाजात उपयोग होईल. हे वाचून झाल्यावर त्या संबंधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, उदाहरणार्थ लंचच्या वेळेत सोबत असता, 30 मिनिटातले 10 मिनिटे,त्यावर चर्चा करा. हयातून व्यक्त होणे शिकता येईल. एकदा व्यक्त होता आलं की मग लिहिता येईल.ते त्यांना पटलं.

      दुसरे एक मला वाटतं, जे फेसबूकवर आहेत. त्यांना देखिल खूप वाचायला मिळतं असतं.कुणी आपले वेगवेगळे जीवनविषयक अनुभव पोस्ट करतो. कुणी आपल्या पर्यटनाची माहिती पोस्ट करतो. कुणी काही तरं कुणी काही. अशा चांगल्या पोस्टवर 90% लोक लाइक टाकून मोकळे होतात. हे लाइक तर इतके विचित्र आहे की कुणाचे कुणी मेले आहे तर आम्हाला “भावपूर्ण श्रद्धांजली” लिहायला वेळ नसतो. आपण Like करून मोकळे होतो. कुणाचे मरण Like करण्याइतके आपण संवेदनाहीन झालोत कां?     

      चांगली पोस्ट वाचली की त्या पोस्टवर आपल्या मनातले चार शब्द लिहिलेत, व्यक्त झालात तर खूप फरक पडेल. माणूस आपल्याला काही शारीरिक त्रास किंवा मानसिक त्रास होतोय, नोकरीच्या जागी घुटन होते आहे, चांगले कामं करून appreciation नाही. ह्या गोष्टी अगदी आपल्याला संसारातील जोडीदाराला सांगत नाही. या पायी मानसिक रोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. मन ठिक असेल, तर शारीरिक व्याधीवर मात करता येईल. पण मनच ठिक नसेल तर? माझे एक झोनल मॅनेजर होते. श्री.एस. एल. करंदीकर. एक वेगळच व्यक्तिमत्व.ते म्हणायचे तुम्हाला डायबेटीस आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे. तुमच्या बाजूला बसलेल्या स्टाफला माहित असायला हवे. शारीरिक आजार आहे त्याचा स्वीकार करा,त्याचा कमीपणा बाळगू नका. उद्या अकस्मात तुम्हाला बँकेत असतांना काही झालं, तर घरचे लोक येईपर्यंत, डॉक्टरकडे ॲडमिट केल्यावर, तुमच्या सहकाऱ्यास सांगता यायला हवे, की तुम्हाला काही व्याधी आहेत का? जेणेकरून डॉक्टरांना तुमच्या उपचाराची दिशा ठरविता येईल.

इंटरनेटमुळे जग भलेही जवळ आले असेल,पण माणसं दुरावलीत. हे फारसे चांगले लक्षण नाही. माणसांमधला संवाद संपत चालला आहे. संवाद संपल्यामुळेच व्यक्त होता येण अशक्य झाले आहे. ज्या मानसिक रोगांची आपल्याला माहिती नव्हती, ते मानसिक रोग होऊ लागलेत “मन चंगा तो सब कुछ चंगा” हे लोप पावत चाललयं. मित्रांनो खरंच विचार करायला हवा आहे आणि तेही परिवारातील सर्वांनी एकत्रित बसून.

आपल्या प्रतिक्रिया कृपया कमेंट बॉक्स मधे लिहा किंवा माझा मेल आयडी  pknatoo25360@gmail.com आहे. त्यावर निश्चित कळवा.

 

प्रसाद नातुपुणे.

88888 18589 

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...