ब्लॉग नं. 2026/182 . दिनांक: 1 जुलै , 2026. मित्रांनो , एकाकीपणा आणि वृद्धांमधील मानसिक आरोग्य: वयोवृद्ध व्यक्तींमध्ये मानसिक आरोग्य आणि त्यांच्या जीवनमानावर , सामाजिक परिस्थितीचा कसा परिणाम होतो , यावर सातत्याने संशोधन होत असते.नुकतेच ' युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये,डेव्हिस ' (UC Davis) च्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या,एका महत्त्वपूर्ण संशोधनातून एक धक्कादायक आणि डोळे उघडणारा निष्कर्ष समोर आला आहे.आजच्या ब्लॉगमध्ये या संशोधनाबद्दल जाणून घेऊ या. सविस्तर: 15 जून रोजी प्रकाशित झालेल्या,प्रसिद्ध ' जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजी ' (Journal of Personality and Social Psychology) मध्ये,हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. या अभ्यासानुसार , वृद्ध व्यक्तींमधील बौद्धिक क्षमता कमी होणे,( Cognitive Impairment) आणि त्यांचे आयुर्मान घटणे , यामागे ' सामाजिक अलिप्तते ' पेक्षा ( Social Isolation) ' एकाकीपणाची भावना ' (Loneliness) अधिक घातक ठरते. सामाजिक अलिप्तता विरुद्ध एकाकीपणा: फरक काय ? या दोन्ही संकल्पना वरवर पाहता सारख्या वाटत...
ब्लॉग नं. 2026/1 81. दिनांक: 30 जून, 2026. मित्रांनो , 1 जुलै 2026 रोजी अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू होणार आहेत. या बदलांचा परिणाम करदाते , बँक ग्राहक , क्रेडिट कार्ड वापरकर्ते , पासपोर्टसाठी अर्ज करणारे आणि आधार कार्ड धारक यांच्यावर होऊ शकतो. जुलै 2026 मध्ये लागू होणाऱ्या प्रमुख आर्थिक बदलांची माहिती जाणून घेऊया आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: 1. ITR-1 आणि ITR-2 साठी अंतिम मुदत: ITR-1 आणि ITR-2 फॉर्म भरणाऱ्या करदात्यांसाठी , आर्थिक वर्ष 2025-26 (करनिर्धारण वर्ष 2026-2027) चे रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. विहित मुदतीत रिटर्न न भरल्यास दंड आकारला जाऊ शकतो , तसेच विशिष्ट कर प्रणाली ( tax regimes) निवडण्यावर निर्बंध येऊ शकतात आणि पात्र तोटा ( losses) पुढील करनिर्धारण वर्षांमध्ये पुढे नेण्यावर ( carry forward) मर्यादा येऊ शकतात. 2. आधार कार्डमध्ये मोफत अपडेट: 1 जुलैपासून , ' युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ' (UIDAI) ने आधार कार्डवरील नोंदणीकृत ईमेल पत्ता अपडेट करण्यासाठी आकारले जाणारे 75 रुपयांचे शुल्क तात्पुरत...