ब्लॉग नं. 2026/16 6. दिनांक: 15 जून, 2026. मित्रांनो, आपल्याला जेव्हा वजन कमी करायचे असतं किंवा निरोगी राहायचे असतं , तेव्हा आपण सर्वात आधी काय करतो ? आपण जेवणातील भात कमी करतो , चपाती किंवा ब्रेड खाणे टाळतो आणि साखरेपासून दूर राहतो. बहुतेक लोकांना वाटते की,साखर , ब्रेड किंवा तांदूळ खाणे हेच आरोग्यासाठी सर्वात जास्त हानिकारक आहे.पण तुम्हाला माहित आहे का ? या सर्वांपेक्षाही एक अत्यंत धोकादायक कार्बोहायड्रेट (कर्बोदक) आहे , जे आपण रोज नकळतपणे खात आहोत! दिल्लीतील प्रसिद्ध ' डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटल ' चे,ऑर्थोपेडिक आणि स्पोर्ट्स सर्जन, डॉ. ओबैदुर रहमान यांनी त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टद्वारे,या छुप्या शत्रूबाबात लोकांना सावध केले आहे. त्यांच्या मते , ही गोष्ट ब्रेड किंवा साखर नाही , तर प्रक्रिया केलेल्या अन्नातील ( Processed Foods) ' इंडस्ट्रियल स्टार्च ' (Industrial Starch) आहे.जाणून घेऊ या, आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: काय आहे हे ' इंडस्ट्रियल स्टार्च '? औद्योगिक किंवा इंडस्ट्रियल स्टार्च,हे मका , बटाटे , गहू आणि स्टार्चच्या इतर...
ब्लॉग नं. 2026/15 9. दिनांक: 8 जून, 2026. मित्रांनो, ऑफिसच्या धावपळीतही राहा ऊर्जेने भरपूर: आजकालच्या दगदगीच्या आणि वेगवान जीवनशैलीत , स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप मोठे आव्हान बनले आहे. विशेषतः ऑफिसला जाणाऱ्या नोकरदार वर्गाची सकाळ , कमालीची घाईगडबडीची असते. या गडबडीत बऱ्याचदा नाश्ता वगळला जातो किंवा बाहेरचे पदार्थ खाल्ले जातात. परंतु , लक्षात ठेवा की सकाळचा नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्त्वाचा आहार आहे.जर सकाळची सुरुवात पौष्टिक आणि प्रथिनांनी ( Proteins) परिपूर्ण असलेल्या नाश्त्याने झाली , तर दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि ऑफिसच्या कामात लक्ष केंद्रित करणे सोपे होते.तुम्हालाही ऑफिसच्या दीर्घ तासांमध्ये उत्साही राहायचे असेल , तर तुमच्यासाठी काही झटपट , चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणारे ७ सर्वोत्तम नाश्त्याचे पर्याय , आजच्या ब्लॉगमध्ये सुचविले आहेत. सविस्तर: 1 . पनीरसोबत मूग डाळ चिल्ला : मूग डाळ ही आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते.मूग डाळीचा चिल्ला (धिरडे) आणि त्यात पनीरचे सारण,( Stuffed Paneer) हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे.ह...