ब्लॉग नं. 2026/066 दिनांकः 7 मार्च , 2026. मित्रांनो , दीर्घ आयुष्याचे गुपित: तुमच्या शरीरातील ' या ' एका मज्जातंतूमध्ये दडलंय आरोग्याचं रहस्य! आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की , काही लोक वयाची शंभरी ओलांडूनही , इतके उत्साही आणि निरोगी कसे असतात ? विज्ञानाने याचे उत्तर शोधले आहे आणि ते उत्तर आपल्या शरीरातच दडलेले आहे.प्रसिद्ध न्यूरोसर्जन आणि संशोधक डॉ. केविन ट्रेसी यांच्या मते , दीर्घायुष्याचे रहस्य आपल्या शरीरातील एका महत्त्वाच्या मज्जातंतूमध्ये आहे , जिचे नाव आहे— ' व्हॅगस नर्व्ह ' (Vagus Nerve). आजच्या ब्लॉगमध्ये आपण या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर: गेल्या काही काळापासून योगाभ्यासक आणि मानसोपचारतज्ज्ञ , मानसिक शांततेसाठी ' व्हॅगस नर्व्ह ' ला उत्तेजित करण्यावर भर देत आहेत. पण आता नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की , ही मज्जातंतू फक्त मन शांत करत नाही , तर शरीरातील जळजळ ( Inflammation) कमी करून , आपले आयुष्य वाढवण्यासही मदत करते. जळजळ: आधुनिक युगातील सर्वात मोठा शत्रू : डॉ. केविन ट्रेसी त्यांच्या ' द ग्रेट नर्व्ह ' या पुस...
ब्लॉग नं. 2026/0 60. दिनांक: 1 मार्च , 2026 . मित्रांनो , 🩺 वय वाढलं की BP चा “परफेक्ट” आकडा बदलतो का ? – ज्येष्ठांसाठी जीवनरक्षक दृष्टिकोन एक काळ असा होता की 120/80 हा रक्तदाबाचा ( Blood Pressure) “ सुवर्णमान” समजला जायचा – आणि अजूनही अनेक ठिकाणी तो तसाच सांगितला जातो.पण 70-75 नंतरही तोच नियम लागू होतो का ? अलीकडील संशोधन आपल्याला एक वेगळीच गोष्ट सांगतं,आणि ती प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीने समजून घेण्यासारखी आहे.जी आपण आजच्या ब्लॉगमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर: 🔬 संशोधन काय सांगतं ? 75 वर्षांवरील 15,000 हून अधिक व्यक्तींवर पाच वर्षे केलेल्या अभ्यासात एक महत्त्वाची बाब समोर आली: ज्यांचा सिस्टोलिक BP 130–140 दरम्यान होता त्यांचा,मृत्यूदर कमी,त्यांच्यात पडण्याचे प्रकार कमी आढळलेत, आणि हॉस्पिटलायझेशन कमी वेळा करावे लागले तसेच मेंदूचे कार्य ( cognition) सुधारले. आश्चर्य म्हणजे, 120 च्या खाली BP असणाऱ्यांमध्ये पडण्याचा धोका 28% जास्त होता.याचा अर्थ असा की, BP जास्त आहे किंवा कमी आहे हे वयोमानानुसार ठरतं.. 🧠 वयानुसार श...