ब्लॉग नं. 2026/0 64. दिनांक: 5 मार्च , 2026 . मित्रांनो , ज्येष्ठ नागरिक आणि फ्रॅक्चरचा धोका वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल होत जातात. त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हाडांची घनता कमी होणे (ऑस्टिओपोरोसिस) . त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये फ्रॅक्चर होण्याचा धोका लक्षणीय वाढतो. यासाठी एक साधं सूत्र लक्षात ठेवायला हवं . या विषयावर आहे, आजचा ब्लॉग. सविस्तर: साठी नंतर हाडांशी संबंधित रोग होणे हे स्वाभाविक लक्षण आहे.मग स्त्री असो वा पुरुष, हाडांची काळजी घेण्यात येत नाही. फक्त त्यांचा पुरेपूर वापर केला जातो. त्यातच स्नायू मजबूत रहात नाही आणि त्यांच्या मजबूतीसाठी आपल्याकडून काही केले जात नाही.त्यामुळे पडण्याचे प्रमाण वाढते.आणि पडण्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोकाही वाढतो. 📌 फ्रॅक्चरचा धोका: हाडांची घनता कमी असेल तर,अगदी छोट्या धक्क्यानेही फ्रॅक्चर होऊ शकते. त्यामुळे केवळ तपासण्या करून उपयोग नाह...
ब्लॉग नं. 2026/05 9. दिनांक: 2 8 फेब्रू वारी , 2026 . मित्रांनो , कोरडा खोकला (सूखी खांसी) वर प्रभावी घरगुती उपाय कोरडा खोकला,हा कफ न येता वारंवार होणारा आणि घशात खवखव , जळजळ निर्माण करणारा त्रासदायक प्रकार आहे.बोलताना , झोपताना किंवा थंड हवेत हा खोकला अधिक वाढतो. बहुतेक वेळा तो व्हायरल इन्फेक्शन , ऍलर्जी , धूर-धूळ किंवा हवामानातील बदल यामुळे होतो.सामान्यतः हा खोकला घरगुती उपायांनी कमी होतो. मात्र 2 -3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकला , ताप आला किंवा श्वास घ्यायला त्रास झाला, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. कोरड्या खोकल्याविषयी आजच्या ब्लॉगमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर: 🌿 कोरड्या खोकल्यावर सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय: 1. मध – घशासाठी नैसर्गिक औषध: मध घशाला कोटिंग देतो व खवखव कमी करतो.एक चमचा मध घ्या . तो कोमट पाण्यात मिसळून प्या दिवसातून 2-3 वेळा घ्यावा. मात्र 1वर्षाखालील मुलांना मध देऊ नये. 2. आले – सूज कमी करणारे: आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.आल्याचा चहा करून त्यात मध घाला किंवा आले + मध एकत्र चाटाव...