Skip to main content

Posts

वयाच्या सत्तरी नंतरही स्नायू होतात बलवान

ब्लॉग नं. 2026/042 दिनांकः 11 फेब्रूवारी , 2026.   मित्रांनो ,  “ 70 नंतर शरीराची झीज अटळ असते.स्नायू कमी होतात , त्यातील ताकद निघून जाते , संतुलन ढासळतं… आणि ते पहात रहाण्याशिवाय पर्याय उरत नाही.” असं आपल्याला वर्षानुवर्षं सांगितलं गेलं. पण जपानच्या डोंगरदऱ्यांत झालेल्या एका संशोधनाने ह्या समजालाच धक्का दिला आहे.नेमकं काय आहे हे संशोधन, जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: अशा काही बिया आहेत की,या बियांमधील प्रथिने अंड्यांपेक्षा तब्बल 21 पट अधिक परिणामकारक ठरली आहेत,विशेषतः 70 वर्षांवरील लोकांमध्ये स्नायू पुन्हा बांधण्यासाठी.काही महिन्याभरात नव्हे तर तर काही आठवड्यांतच त्यांचे पाय स्थिर झाले, त्यांचे संतुलन परत आलं आणि ताकद आणि ऊर्जा वाढली.मग प्रश्न हा  पडतो…ही माहिती इतकी वर्षं आपल्यापासून लपवली का गेली ? कारण साधं आहे , ही सत्य माहिती समोर आली , तर 70 अब्ज डॉलर्सच्या प्रोटीन सप्लिमेंट इंडस्ट्रीला मोठा धक्का बसू शकतो.चला तर मग , जाणून घेऊया. 70 नंतरही स्नायू मजबूत ठेवणाऱ्या 6 चमत्कारी बिया कुठल्या आहेत.   🌻 क्रमांक 1 : सूर्यफूल बिया ( Sunflower Seeds...

मेंदूत स्वतःला बदलण्याची अद्भुत क्षमता म्हणजे न्यूरोप्लॅस्टिसिटी

  ब्लॉग नं: 2025/035. दिनांक: 4 फेब्रूवारी, 2026. मित्रांनो,   न्यूरोप्लॅस्टिसिटी : मेंदू त स्वतःला बदलण्याची अद्भुत क्षमता आपण अनेकदा म्हणतो , “ आता माझं वय झालं , सवयी बदलणं कठीण आहे” किंवा “ मेंदू एकदा घडला की बदलत नाही.” पण आधुनिक न्यूरोसायन्स हे स्पष्टपणे सांगते की मेंदू सतत बदलत असतो. या विलक्षण क्षमतेलाच म्हणतात — न्यूरोप्लॅस्टिसिटी ( Neuroplasticity). आज आपण न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजे काय ? हे समजून घेण्याचा प्रयत्न करू या. सविस्तर:  न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजे, अनुभव , शिकणे , विचार , भावना , दुखापत किंवा उपचारांच्या परिणामामुळे मेंदूची रचना आणि कार्य बदलण्याची क्षमता. सोप्या शब्दांत सांगायचं तर, आपला मेंदू ‘स्टॅटिक’ नसून ‘डायनॅमिक’ आहे. पूर्वी काय समजलं जात होतं ? एकेकाळी असा समज होता की, मेंदू बालपणातच पूर्ण विकसित होतो, एकदा न्यूरॉन्स नष्ट झाले की ते पुन्हा निर्माण होत नाहीत आणि वृद्धत्वात मेंदू बदलू शकत नाही पण संशोधनाने हे सर्व गैरसमज खोटे ठरवले. न्यूरोप्लॅस्टिसिटी कसं काम करते ? मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स ( Neuron) असतात. हे न्...

मनुका खाण्याचे फायदे

  ब्लॉग नं: 2025/0 34 . दिनांक: 3 फेब्रुवारी, 2026.   मित्रांनो,             मनुका केवळ खाण्यासाठी नसतात , तर हृदयासाठीही फायदेशीर आहेत. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टकडून ते खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. मनुका हे फायबर , अँटीऑक्सिडंट्स आणि लोहाने समृद्ध असलेले सुका मेवा आहे आणि त्यांचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश केल्यास अनेक आरोग्य समस्या दूर राहू शकतात.याबद्दल सविस्तर जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर:   अलीकडेच , गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शुभम वत्स यांनी याबद्दल सांगितले आहे. त्यांच्या मते , दररोज मनुका खाल्ल्याने तुमच्या पोटापासून ते हृदयापर्यंतच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो. पचनसंस्थेसाठी वरदान: डॉ. वत्स यांच्या मते , मनुकांमध्ये असलेल्या फायबरमुळे शौचाची प्रक्रिया खूप सोपी होते.लोकांना अनेकदा बद्धकोष्ठता आणि शौचाच्या वेळी जोर लावण्याचा त्रास होतो. मनुका खाल्ल्याने हा त्रास कमी होतो आणि आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांचे पोषण होते. सॉर्बिटॉलची जादू: मनुकांमध्ये सॉर्बिटॉल असते.हे आत...

Ice Bag कधी आणि Heating Pad कधी?

  ब्लॉग नं: 2025/0 33 . दिनांक: 2 फेब्रुवारी, 2026. मित्रांनो,   वेदनांवर उपचार : Ice Bag कधी आणि Heating Pad कधी ? आपल्या दैनंदिन आयुष्यात चालताना पडणे , व्यायाम करताना मुरगळणे , अचानक मान-कंबर दुखणे किंवा सांधेदुखी होणे हे सर्वसामान्य अनुभव आहेत. अशा वेळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न येतो , थंड शेक ( Ice Bag) लावायची की गरम शेक ( Heating Pad)? योग्य वेळी योग्य उपचार केल्यास वेदना लवकर कमी होतात. चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये, हे शास्त्रीय पद्धतीने समजून घेऊया. सविस्तर: Ice Bag ( थंड शेक) कधी वापरा वी ? Ice Bag म्हणजे बर्फ किंवा थंड पाण्याने केलेला शेक.तो मुख्यतः सूज आणि ताज्या दुखापतींमध्ये उपयोगी ठरतो. Ice Bag वापरण्याच्या योग्य परिस्थिती : 1.        मुरगळ ( Sprain) मुरगळ म्हणजे पाय घोटा वाकणे, किंवा मनगट किंवा गुडघ्याला मुरगळ 2.        ताजी दुखापत ( Acute Injury) o    पडल्यावर आलेली वेदना आणि खेळताना झालेली दुखापत. 3.        सूज ( Swelling) o ...

मानसिक आजार आणि लग्न

  ब्लॉग नं: 2025/0 32 . दिनांक: 1 फेब्रुवारी, 2026.   मित्रांनो, मानसिक आजार आणि लग्न             आज समाजात जसे शारीरिक आजार वाढत आहेत,तसेच मानसिक आजार वाढत आहेत.समाजात लग्न म्हणजे स्थैर्य , सुरक्षितता आणि सुखाचा आरंभ असे मानले जाते. दोन कुटुंबांचा , दोन व्यक्तींचा आणि त्यांच्या स्वप्नांचा मिलाफ अशी एक सुंदर कल्पना. पण या सुंदर चित्राच्या मागे एक वास्तव आहे , ज्याबद्दल आपण फारसं बोलत नाही,ते म्हणजे मानसिक आजार . आजपासून दर आठवड्याला,रविवारी एका मानसिक आजारावर लिहायचं ठरवलं आहे. आजचा ब्लॉग त्यातील पाहिला. सविस्तर:   आजही शारीरिक आजाराबद्दल खुलेपणाने चर्चा होते , पण मानसिक आजाराचा उल्लेख झाला की कुजबुज , भीती आणि लपवाछपवी सुरू होते. विशेषतः लग्नासारख्या संवेदनशील विषयात देखिल, “ मानसिक आजार आहे” हे सत्य लपवले जाते का ? दुर्दैवाने , हो. लग्न जुळवताना कुंडली , शिक्षण , नोकरी , पगार , घर , जात हे सगळे मुद्दे खुलेपणाने मांडले जातात. पण जर मुलगा किंवा मुलगी नैराश्य , चिंता विकार , बायपोलर डिसऑर्डर , OCD क...

शस्त्रक्रियेद्वारे मधुमेह बरा होऊ शकतो का?

ब्लॉग नं. 2025/031  दिनांक: 31   जानेवारी , 2026.    मित्रांनो ,      शस्त्रक्रियेद्वारे मधुमेह बरा होऊ शकतो का ? आजवर मधुमेह ( Diabetes) म्हणजे आयुष्यभर साथ देणारा आजार , अशीच आपली ठाम समजूत होती.गोळ्या , इन्सुलिन , आहार नियंत्रण , व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल याच गोष्टींवर मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचा भर दिला जात होता. “मधुमेह बरा होत नाही , फक्त नियंत्रणात ठेवता येतो” हे वाक्य आपण अनेकदा ऐकले आहे. मात्र अलीकडेच AIIMS ( दिल्ली) येथील शस्त्रक्रिया विभागातील डॉ. मंजुनाथ यांनी केलेल्या एका विधानामुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि रुग्णांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. आपण आजच्या ब्लॉगमध्ये या विषयी विस्ताराने जाणून घेऊ.   सविस्तर: डॉ. मंजुनाथ मते , “ मेटाबॉलिक सर्जरी ( Metabolic Surgery)” या विशेष शस्त्रक्रियेमुळे अनेक टाइप- 2 मधुमेह रुग्णांचे रक्तातील साखर प्रमाण नैसर्गिकरीत्या नियंत्रणात येते आणि काही रुग्णांना तर औषधांची गरज जवळजवळ संपते. पण प्रश्न असा उभा राहतो की , ही शस्त्रक्रिया प्रत्येक मधुमेही रुग्णासाठी आहे का ? ती सुरक्षित आहे का ? आण...