ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025. मित्रांनो, डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...
ब्लॉग नं.2025/234 . दिनांक: 24 ऑगस्ट, 2025. मित्रांनो, तुम्हाला कदाचित हे विचित्र वाटेल , खरं वाटणार नाही,पण हे सत्य आहे…मागील 68 वर्षांपासून पिंपळ , वड आणि नीम यांची लागवड सरकारी पातळीवर बंद करण्यात आली आहे. 😢 तसं पाह्यला गेलं तर पिंपळ, निंबोणी आणि वड किंवा वटवृक्ष हे तिन्ही अतिशय पर्यावरण पूरक असे वृक्ष आहेत .पण त्याकडे लक्ष देत कोण? आजचा माझा ब्लॉग आहे,याच विषयावर. सविस्तर: पिंपळ,वड आणि नीम किंवा निंबोणी या तिन्ही वृक्षांचे शास्त्रात एक वेगळे सांगितले आहे.आणि याला धार्मिक महत्व देण्यात आले.कारण धार्मिक कारण दिलं की लोकांना पटत असे, पण खरं कारण हे की हे वृक्ष पर्यावरण संतुलन राखण्याचे,महत्वाचे कार्य करत असतात.कारण पिंपळ हा कार्बन डाय ऑक्साईडचा 100 % शोषक वृक्ष आहे , वड हा कार्बन डाय ऑक्साईडचा 80 % शोषक वृक्ष आहे तर नीम किंवा निंबोणी हा 75%. पण यांच्या ऐवजी लोकांनी परदेशी युकॅलिप्टस लावायला सुरुवात केली , जो जमिनेला जलविहीन करून टाकतो. 😠 आज सर्वत्र युकलिप्टस , गुलमोहर आणि इतर सजावटी झाडे दिसतात.आता जेव्हा वातावरणात शुद्धीकरण करणारी ...