Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

धरतीवरचे त्रिदेव- निंबोणी, पिंपळ आणि वड

ब्लॉग नं.2025/234.

दिनांक: 24 ऑगस्ट, 2025.

मित्रांनो,

तुम्हाला कदाचित हे विचित्र वाटेल,खरं वाटणार नाही,पण हे सत्य आहे…मागील 68 वर्षांपासून पिंपळ, वड आणि नीम यांची लागवड सरकारी पातळीवर बंद करण्यात आली आहे. 😢तसं पाह्यला गेलं तर पिंपळ, निंबोणी आणि वड किंवा वटवृक्ष हे तिन्ही अतिशय पर्यावरण पूरक असे वृक्ष आहेत.पण त्याकडे लक्ष देत कोण? आजचा माझा ब्लॉग आहे,याच विषयावर.

सविस्तर:

पिंपळ,वड आणि नीम किंवा निंबोणी या तिन्ही वृक्षांचे शास्त्रात एक वेगळे सांगितले आहे.आणि याला धार्मिक महत्व देण्यात आले.कारण धार्मिक कारण दिलं की लोकांना पटत असे, पण खरं कारण हे की हे वृक्ष  पर्यावरण संतुलन राखण्याचे,महत्वाचे कार्य करत असतात.कारण  पिंपळ हा कार्बन डाय ऑक्साईडचा 100 % शोषक वृक्ष आहे,वड हा कार्बन डाय ऑक्साईडचा 80 % शोषक वृक्ष आहे तर नीम  किंवा निंबोणी हा 75%. पण यांच्या ऐवजी लोकांनी परदेशी युकॅलिप्टस लावायला सुरुवात केली, जो जमिनेला जलविहीन करून टाकतो. 😠

आज सर्वत्र युकलिप्टस, गुलमोहर आणि इतर सजावटी झाडे दिसतात.आता जेव्हा वातावरणात शुद्धीकरण करणारी म्हणजे कार्बन डाय ऑक्साईडचे शोषक वृक्ष उरलेच नाहीत तेव्हा उष्णता तर वाढणारच.
आणि जेव्हा उष्णता वाढेल तेव्हा पाणी वाफ होऊन उडून जाणारच.

👉 जर प्रत्येक 500 मीटर अंतरावर एक पिंपळ वृक्ष लावला, तर येत्या काही वर्षांत भारत प्रदूषणमुक्त होईल… 💞

आणखी एक माहिती अशी की,पिंपळाच्या पानांचा घेरा मोठा असतो,म्हणजे वृक्ष वर मोठा असतो, पण त्याचे खोड हे लहान असते, त्या मानाने बारीक असते.म्हणून शांत हवामानातसुद्धा पाने हलत राहतात आणि शुद्ध ऑक्सिजन देत राहतात. 💞 म्हणूनच पीपळाला "झाडांचा राजा" म्हणतात.

म्हणून पिंपळास वंदन करण्यासाठी एक श्लोक म्हटला जातो,तो खालील प्रमाणे आहे:    

मूलं ब्रह्मा, त्वचा विष्णु, सखा शंकरमेव च।

पत्रे पत्रेका सर्वदेवानां, वृक्षराज नमोऽस्तुते।।

आता काय करावे लागेल: … 💞

👉 या जीवनदायी झाडांची जास्तीत जास्त लागवड करण्यासाठी समाजात जागरूकता वाढवा.

👉 बागा तयार करा, झाडे लावा.

👉 बागांना निरर्थक खेळाचे मैदान बनवू नका.

जसे माणसाला हवेसोबत पाण्याची गरज आहे, तशीच झाडांनाही हवेसोबत पाण्याची गरज असते…

🌹 वड एक लावा, पीपळ लावा पाच।

घराघरांत नीम लावा, हेच पुरातन साच।। 🌹

हेच आज सर्वजण मानत आहेत.फक्त ते प्रत्यक्षात यायला हवे. मग प्रदूषण पळून जाईल – हे सर्वांना कळत नाही.

जागतिक ताप नाहीसा होईल, प्रत्येक मन आनंदी होईल.

म्हणूनच म्हणतात धरतीवरचे त्रिदेव आहेत – नीम, पिंपळ आणि वड ।। 🌹

समारोप:

            काल सहज नेटवर वेगवेगळ्या पोस्ट वाचत असतांना, ही पोस्ट नजरेस पडली.असं वाटून गेलं की, पिंपळ, वड आणि नीम हे किती महत्वाचे आहेत.ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाऊस अतिरेकी झाला आहे.या नदीला पूर त्या नाल्याला पूर वगैरे पूर्वी ऐकायला एवढे मिळत नसे,अगदी हे कबूल केली तरी, प्रसार माध्यमे आता खूप वाढली आहे,बातम्या आपल्या पर्यन्त लगेच पोहोचतात, तरी देखिल धो धो पडणारा आणि जागोजागी पूर काढणारा श्रावण महिना माझ्या आठवणीत नाही. नाही तर बालकवींना “श्रावण मानसी हर्ष मानसी,हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येती सरसर शिरवे,क्षणात फिरून ऊन पडे.” सुचलंच नसतं.या सर्वाला थांबवण देखिल आपल्याच हातात आहे.        

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 🏻 लेखक: प्रसाद नातु

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...