ब्लॉग नं.2025/230.
दिनांक: 20 ऑगस्ट, 2025.
परवा म्हणजे 15 ऑगस्टला स्वतंत्रता दिवस होता,म्हणून त्याचे
औचित्य साधत येथून अवघ्या 15-20 किमीवर असलेल्या तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांची
समाधी आहे,तिथे दर्शन घ्यायला गेलो होतो.हे ठिकाण इंद्रायणी नदी आणि भाम आणि भीमा यांच्या
संयुक्त प्रहावाच्या संगमावर वसलेले आहे.त्या दिवशी खूपच गर्दी होती.चपला, जोडे आवाराच्या
बाहेर काढायला लागतात.एक दाणे वगैरे विकणारी विक्रेती होती. तिच्या दुकानावर त्या निमित्ताने
काही घ्यावे म्हणून बघितले, तर राय आवळा विकायला होता. त्या मावशीने लगेच त्याचे आरोग्य फायदे सांगायला सुरुवात केली,कोल्हापूरला
राय आवळा मिळत असल्याने,त्याचे फायदे माहित होते. पण तिने आरोग्य फायदे सांगितल्याने
हा ब्लॉग लिहायला सुचले.
सविस्तर:
राय आवळा हा आवळ्यासारखा दिसणारा,पण वेगळ्या वनस्पतीचे फळ आहे.राय आवळा म्हणजे काय? तर राय आवळ्याचे शास्त्रीय नाव,साधारणपणे
Phyllanthus acidus असे आहे.याला इंग्रजीत Star
Gooseberry म्हणतात.हे झाड लहानसर असून,त्यावर मोत्यासारखी पिवळसर,
गोल आणि थोडी चकचकीत फळे लागतात.फळाचा आकार साधारण आवळ्यासारखा असतो,
पण चव मात्र जास्त तुरट-आंबट असते. भारतात विशेषतः महाराष्ट्र,
कर्नाटक, गोवा, केरळ,
आणि कोकण पट्ट्यात हे आढळते.
राय आवळा खाण्याचे फायदे:
व्हिटॅमिन C भरपूर – रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.पचनासाठी चांगले,पित्त व गॅस कमी करण्यास मदत.रक्तशुद्धी, त्वचारोग, फोडे-पुरळ कमी करण्यास मदत होते. यकृताचे आरोग्य सुधारते,लिव्हर स्वच्छ ठेवते आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने वृद्धत्वाची चिन्हे उशिरा दिसून येतात.
राय आवळा खाण्याचे प्रकार:
राय आवळा खाण्याचे वेगवेगळे प्रकार
आहे,जसे राय आवळा कच्चा थेट झाडावरून खाणे (खूप तुरट लागतो). लोणचं, मुरांबा, चटणी करून
खाणे किंवा गुळ किंवा मीठ घालून चवदार करून खाणे.
राय आवळा आणि साधा आवळा यातला फरक:
|
वैशिष्ट्य |
साधा आवळा (Indian Gooseberry) |
राय आवळा (Star Gooseberry) |
|
शास्त्रीय नाव |
Phyllanthus emblica / Emblica officinalis |
Phyllanthus acidus |
|
इंग्रजी नाव |
Indian Gooseberry |
Star Gooseberry |
|
दिसणे |
हिरवट-फिकट पिवळसर, गुळगुळीत पृष्ठभाग, 6-8 कपारी |
पिवळसर-पारदर्शक, लहान मोत्यासारखे, 6-8 उथळ कपारी |
|
चव |
तुरट-आंबट पण गोडसरपणाची छटा |
जास्त तुरट-आंबट, थोडा कडसर स्वाद |
|
झाडाची उंची |
मध्यम ते मोठे (15-20 मी.) |
लहान ते मध्यम (4-8 मी.) |
|
हंगाम |
हिवाळा (नोव्हेंबर-फेब्रुवारी) |
पावसाळा ते हिवाळा (जून-डिसेंबर) |
|
पोषणमूल्य |
व्हिटॅमिन C अत्यंत जास्त, कॅल्शियम, लोह |
व्हिटॅमिन C, पोटॅशियम, काही प्रमाणात लोह |
|
उपयोग |
च्यवनप्राश, लोणचं, ज्यूस, पावडर,
औषधं |
लोणचं, मुरांबा, चटणी, स्थानिक
औषधी वापर |
|
आरोग्य फायदे |
रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, पचन सुधारणा, केस-त्वचा आरोग्य |
पचन सुधारणा, रक्तशुद्धी, यकृत स्वच्छ करणे |
|
प्रदेश |
भारतभर, विशेषतः उत्तर व मध्य भारत |
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ,
कोकण पट्टा, दक्षिण भारत |
राय आवळ्याचे संभाव्य दुष्परिणाम
राय आवळा जास्त
खाल्यामुळे,अतितुरटपणामुळे पोट बिघडते, राय आवळा खूप तुरट आणि आम्लीय (acidic) असल्याने, जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात जळजळ, आम्लपित्त (Acidity)
किंवा गॅस होऊ शकतो.
त्यातील आम्लीय घटकामुळे
दातांचा एनॅमल (Enamel) हळूहळू
झिजू शकते.त्यामुळे राय आवळा खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुणे आवश्यक. किडनी स्टोन
(मूत्रपिंडातील खडे) असणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी,कारण राय आवळ्यात काही प्रमाणात ऑक्झलेट्स
असतात, जे किडनी स्टोनची समस्या वाढवू शकतात.ज्यांना
आधीपासून खडे आहेत त्यांनी प्रमाणातच खावे.गॅस्ट्रिक अल्सर असणाऱ्यांसाठी
त्रासदायक ठरू शकतात,कारण
जास्त आम्लीय असल्याने, पोटातील अल्सर किंवा गॅस्ट्राइटिस
वाढवू शकतो.तर काही लोकांना अॅलर्जी होण्याची शक्यता आहे.तसेच क्वचित काही
लोकांना राय आवळ्यामुळे तोंडात खरखर, घशात खाज, त्वचेवर लाल चट्टे अशा अॅलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकतात. जास्त व्हिटॅमिन C
असल्याने, काही औषधांच्या शोषणावर परिणाम होऊ
शकतो (उदा. रक्त पातळ करणारी औषधे).
✅ समारोप:
राय आवळ्यात
जरी चांगले आयुर्वेदिक फायदे देणारे गुण असले तरी, दररोज 4–5 राय आवळ्यांपेक्षा जास्त खाऊ नये
(विशेषतः कच्चे).शक्यतो गुळ, मीठ किंवा थोडे साखर घालून
खावेत, त्यामुळे आम्लीय परिणाम कमी होतो.पोटाचे विकार,
किडनी स्टोन किंवा अॅसिडिटी असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच
खावे.अर्थात कुठलीही गोष्ट मर्यादेतच खावी हे तत्व राय आवळ्यास देखिल उपयोगी पडते.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये
तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी
रहा,मस्त जगा.
✍🏻 लेखक: प्रसाद नातु
(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी
आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
नवीन माहिती 🙏 RR
ReplyDeleteलहानपणी शाळेच्या बाहेर रायआवळे,चिंचा, बोर विकायला एक बाई बसायची. राय आवळे तेंव्हापासून खातेय. खूप आवडतात.
ReplyDeleteप्रथमच माहित झालं राय आवळ्याबद्दल. छान माहिती
ReplyDelete