Skip to main content

Posts

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

महिलांनी 45 व्या वर्षा नंतर करावयाच्या टेस्ट

ब्लॉग सं. 2025/142 दिनांकः 2 3 मे , 2025.    मित्रांनो ,              महिला या एकंदरीतच जास्त काटक असतात,असं पूर्वीपासून मानलं जातं.पण हा समज असेल किंवा वास्तविकता,यामुळे त्या स्वतःच्या आरोग्याबाबत उदासीन असतात आणि बऱ्याच गोष्टी अंगावर काढतात. त्यांना काही त्रास होत असेल तर कुणाला सांगत देखिल नाहीत. पण यामुळे काही वेळा एखाद्या लहान दुखण्याचे मोठ्या दुखण्यात होऊ शकते.आजचा ब्लॉग हा महिलांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिला आहे.                         सविस्तर: महिलांमध्ये वयाच्या 45 नंतर हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.बदलती जीवनशैली , हार्मोन्समधील बदल आणि वाढत्या वयानुसार उच्च रक्तदाब , कोलेस्टेरॉल आणि हृदयविकारासारख्या समस्या सामान्य होत आहेत.त्यामुळे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टरांच्या मते , नियमित आरोग्य तपासणीमुळे हृदयविकार वेळेवर ओळखता येतो आणि गंभीर स्थिती टाळता येते. वयाच्या 45 नंतर महिलांनी कोणत्या महत्त्वाच्या चाचण्...

दीर्घ काळ बसण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी व्यायाम

ब्लाॅग नं.2025/141 दिनांकः 22 मे, 2025.  मित्रांनो ,  आधुनिक काळात , दीर्घकाळ बसून राहण्याच्या सवयीमुळे,अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत चालला आहे.हृदयरोग , मधुमेह , कर्करोग , स्मृतिभ्रंश यांसारख्या समस्या निर्माण होण्यामागे,बसण्याच्या जीवनशैलीचा मोठा वाटा आहे. या समस्यांमुळे अकाली मृत्यूची शक्यता वाढत असल्याचे,विविध अभ्यासांमध्ये स्पष्ट झाले आहे.या विषयावर आहे आजचा ब्लॉग. सविस्तरः 2020 मध्ये जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार , बसण्याचा आणि उठण्याचा कालावधी कमी केल्यास , काही प्रमाणात दुष्परिणाम कमी करता येऊ शकतात.मात्र , व्यायाम हा एकमेव मार्ग आहे , ज्याद्वारे दीर्घकाळ बसून राहण्याचे,परिणाम टाळता येऊ शकतात.ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये, प्रकाशित संशोधनात , दररोज 30-40 मिनिटे व्यायाम केल्याने,जास्त बसून राहण्यामुळे होणारे दुष्परिणाम , कमी होऊ शकतात असे नमूद केले आहे. शारीरिक हालचालींचे महत्त्व दररोज मध्यम ते जोरदार तीव्रतेच्या,शारीरिक हालचालींमध्ये 40 मिनिटे घालवणे,हे 10 तासांच्या स्थिर बसण्याशी,संतुलन साधण्यास उपयुक्त ठरते.सायकल ...

टोमॅटो साॅसमधील भेसळ कशी ओळखाल?

ब्लाॅग सं. 2025/140 दिनांकः 21 मे, 2025. मित्रांनो , आजकाल अन्नपदार्थांमध्ये भेसळ ही एक गंभीर समस्या बनली आहे. पदार्थ अधिक चांगले दिसावेत , टिकावेत , आणि चविष्ट लागावेत म्हणून त्यात कृत्रिम रंग , स्वाद आणि रसायनांचा वापर केला जातो.यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अधिकाधिक वाढले आहेत.याच पार्श्वभूमीवर , मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील औषध तज्ज्ञ डॉ. पुष्कर शिरकरखाने यांनी टोमॅटो सॉसमधील भेसळीबद्दल माहिती दिली आहे.आजच्या ब्लॉग मध्ये हिच माहिती मी शेअर करीत आहे. सविस्तर:             बाजारात गेलं की, आपल्याला विविध ब्रॅंडचे वेगवेगळे सॉस बघायला मिळतात.बऱ्याच वेळा आपण ज्याला ब्रॅंडेड सॉस विकत घेत असतो.पण काही वेळा                   भेसळयुक्त टोमॅटो सॉसचे धोके : बनावट टोमॅटो सॉसमध्ये हानिकारक खाद्य रंग , कृत्रिम स्वाद , सिंथेटिक रंग , संरक्षकं आणि रसायने असतात.हे घटक तुमच्या शरीरासाठी,गंभीर आरोग्य समस्यांचे कारण ठरू शकतात. प्रमुख आरोग्य समस्या: अपचन आणि पोट फुगणे , जुलाब आण...

बेल एक उपयोगी फळ

ब्लाॅग सं.2025/139 दिनांकः- 20 मे, 2025. मित्रांनो , बेल ही भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व असलेली वनस्पती आहे. या वनस्पतीला धार्मिक , अध्यात्मिक आणि औषधी उपयोगांमुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. बेलाच्या पानांचा , फळांचा , सालीचा आणि मुळांचा वापर विविध विकारांवर केला जातो. चला , आजच्या ब्लॉगमध्ये,बेल वनस्पतीचे आरोग्याशी संबंधित माहिती जाणून घेऊया. सविस्तरः बेल पानाचा आरोग्यदृष्ट्या खूप फायदा आणि उपयोग होतो.हे तुम्हाला खालील विवेचनावरुण लक्षात येईल.मग मधुमेह असो, किडनीचे विकार असोत, डोळ्याचे किंवा कानाचे विकार असो, हृदय असो किंवा हृदयाशी संबंधित कोलेस्ट्रॉल,इतकेच काय तर पचनसंस्थेवर देखील बेल फळ किंवा बेल पानाचा रस फायदेकारक आहे.                   1 . मधुमेह नियंत्रण: रोज सकाळी उपाशीपोटी 30 मि.ली. बेल पानांचा रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. 2.  डोळ्यांचे विकार: बेल पानांचा दोन दोन थेंब रस, डोळ्यांत टाकल्याने डोळ्यांच्या विकारांपासून मुक्ती मिळते. 3 . मानसिक स्थैर्य : मानसिक अस्थिरता असलेल्या ल...

हृदय रोगामुळे होणार्‍या मृत्युंमधे 29% मधुमेही

ब्लॉग नं. 2025/13 8 दिनांकः 19 मे , 2025.   मित्रांनो ,             मधुमेहामुळे हार्ट अटॅक सारखा ताबडतोब मृत्यू येत नसला तरी,मधुमेह हा सायलंट किलर आहे असे म्हटले जाते.आणि तेही तुमच्या रक्तातील शुगर लेवल ही उच्च असेल तर,मग तर प्राणघातक देखील ठरू शकतो. ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या संशोधनानुसार जि आकडेवारी समोर आली आहे,ती धक्कादायक आहे.पण एका गोष्टीचं मला कौतुक वाटतं की असे संशोधन नेहमी परदेशात होत असतात,यावरून त्यांच्या चिकित्सक वृत्तीची कल्पना येते आणि आरोग्यविषयी ते किती जागरूक आहेत याची.एखादे वृत्त भारतातून आले तर, मला निश्चितपणे शेअर करायला जास्त आनंद होईल.तर या संशोधनाबद्दल आणि त्यातून समोर आलेल्या आकडेवारीबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये अधिक जाणून घेऊ.                                               सविस्तर: आरोग्या च्या पुनर्विचाराची वेळ: मधुमेह आणि हृदयरोग यामधील अदृश्य धोक्याची कथा आपल्याला थांबून स्वतःच्या...

चुकीच्या प्रकारचे व्यायाम टाळायला हवेत

  ब्लॉग नं. 2025/137 दिनांकः 18   मे , 2025. मित्रांनो ,             सीनियर सिटिजन्सनी व्यायाम करावा कां? आणि करावा तर तो कोणता करावा? असा प्रश्न नेहमी चर्चिला जातो.इतक्यात करण्यात आलेल्या एका संशोधनातून,असे दिसून आले आहे की, 65 वर्षांनंतर चुकीच्या प्रकारचे व्यायाम केल्याने दुखापत होण्याचा , हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजाराचा धोका,लक्षणीयरीत्या वाढू शकतो आणि तुमचे आयुष्यमान देखील कमी होऊ शकते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंग च्या एका अहवालात असे म्हटले आहे की,चुकीच्या व्यायामांमधे सहभागी झाल्यामुळे,वृद्ध प्रौढांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचा धोका, 48 % पर्यंत वाढू शकतो.हे एक गंभीर वास्तव आहे.तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून सांगितले गेलेले,अनेक व्यायाम केल्याने सांधे खराब होऊ शकतात , हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर धोकादायक ताण निर्माण होऊ शकतो , संतुलन बिघडू शकते.आजचा ब्लॉग या विषयावर आहे.   सविस्तर:              65 वय झाल्यानंतर ज्येष्ठांनी टाळायला प...

भारतात हायड्रोजन ट्रेन धांवणार !

ब्लॉग नं: 2025/136 दिनांक: 17  मे , 2025. मित्रांनो ,          तुम्ही कधी हायड्रोजन ट्रेनबद्दल ऐकलंत का ? नसेल ऐकलं तर आजच्या ब्लॉगमधे हायड्रोजन ट्रेनबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.बऱ्याच काळापासून असे सांगितलं जातं आहे की , भारत देखिल जर्मनी किंवा चीनप्रमाणे हायड्रोजन ट्रेन बनवण्याचा प्रयत्न करत आहे.यासंबंधात एवढ्यात,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे आणि यासंबंधात एक अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे , ज्यामध्ये असे म्हटले आहे की , याच महिन्यात , पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे.   सविस्तरः आपण अनुभवतं आहोत की , जगभर पर्यावरणाच्या प्रश्नाने भंडावून सोडले आहे , चिंतेत टाकले आहे.या दृष्टीने पाहिलं तर,ही हायड्रोजन ट्रेन आपल्यासाठी कशी उपयुक्त ठरणार आहे,हे आपण जाणून घेणार आहोत.     हायड्रोजन इंधन किंवा हायड्रोजनशी संबंधित असलेल्या कोणत्याही गोष्टी,कार्बन उत्सर्जित करत नाहीत , हायड्रोजन इंधन बनवणे किंवा हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करणे,हे थोडे थोडे कठीण असले तरी , पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात काय उपलब्ध असेल,तर ते पाणी ...