ब्लॉग नं. 2025/35 3 . दिनांक: 1 7 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनशैलीतून उद्भवणारे अनेक त्रास आपण वारंवार अनुभवतो,त्यापैकी पित्ताचा त्रास हा सर्वाधिक सामान्य आणि त्रासदायक प्रकार आहे. छातीत जळजळ , तोंड कडू होणे , अंग गरम जाणवणे , आंबट ढेकर… हे सर्व त्रास पित्त वाढल्याची लक्षणे आहेत.पण पित्त का वाढते ? आणि ते कमी करण्यासाठी घरच्या घरी कोणते उपाय करता येतात ? चला , अत्यंत सोप्या भाषेत समजून घेऊया आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: पित्त वाढण्याची मुख्य कारणे : 1. चुकीचा आहार: आपण नेहमी खात असलेल्या पदार्थांचा पित्ताशी थेट संबंध असतो.तेलकट , तिखट , मसालेदार पदार्थ रेड मीट , जंक फूड हे अन्न पदार्थ पित्त वाढवण्यामागील मुख्य कारणे आहेत. अशा पदार्थांमुळे छातीत जळजळ होणे अगदी स्वाभाविक आहे. 2. अपेय पानाचे सेवन: आयुर्वेदानुसार अपेय पान म्हणजे शरीरासाठी हितकारक नसलेले पदार्थ.जसे चहा , कॉफी , दारू , सिगारेट यांचे जास्त प्रमाणात सेवन पित्त दोष वाढवते. 3. तीव्र ऊन आणि उष्ण वातावरण: ऊन्हात जास्त वेळ काम करणे , शरीराला सूर्याची तिव्रता पेलवणं कठीण होणे,...
ब्लॉग नं. 2024/285 दिनांक: 25 नोव्हेंबर, 2024 मित्रांनो ‘ शतपावली ’ हा शब्द तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आपले वडील , काका , मामा , आजोबा किंवा इतर सीनियर लोकांकडून निश्चित ऐकलेला असणार.’ ‘ शतपावली करुन येतो गं’. आजकाल मात्र हा शब्द विशेष ऐकायला मिळत नाही. “शतपावली” म्हणजे एक मोजून शंभर पावलं चालली पाहिजेत असं नाही.पण थोडं चालायचं आणि त्यातही हळू चालायचं. कारण रात्रीच्या जेवणानंतरचं चालणं असे. आपण त्याचे फायदे काय याचा कधी विचार केला आहे. नाही ना , मग आज करूया. शतपावली कां करावी ? शतपावली कां करावी हे पाहू या. 1. पचनास मदत करते: जेवणानंतर आरामशीर चालल्याने पचनसंस्थेला प्रभावीपणे चालना मिळते. ही सौम्य शारीरिक क्रिया आपल्या पचनसंस्थेच्या गुंतागुंतीच्या मार्गांवर अन्नाच्या अखंड हालचालीला मदत करते , ज्यामुळे पचनाचे कार्य आणि महत्त्वपूर्ण पोषक तत्वांचे शोषण सुलभ होते.जेवणानंतरचा फेरफटका मारून , एखादी व्यक्ती पोट फुगणे आण...