Skip to main content

Posts

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

भारतात नवश्रीमंतांची संख्या वाढते आहे !

  Blog No.2024/014.   Date: -19 th , January,2024.          मित्रांनो,             भारतातील श्रीमंत लोकांमध्ये भर पडत आहे आणि मुख्य म्हणजे त्यात नवश्रीमंताची संख्या अधिक आहे.आपल्या देशातील लोकांचा हॅचबॅक म्हणजे अगदी प्रायमरी कार,त्यानंतर मोडणारी म्हणजे सेडान यापेक्षा सध्या लोकांचा एसयुव्ही म्हणजे मोठ्या गाड्या,उंची कार खरेदी करण्यामागचा कल हेच दर्शवितो.या संबंधात आपण आज चर्चा करणार आहोत.           प्रास्ताविक गोल्डमन सॅचही एक आघाडीची जागतिक वित्तीय संस्था आहे.जिचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात असे म्हटले आहे की भारताचा श्रीमंत वर्ग हा अर्थव्यवस्थेतील उपभोग्य वस्तूंच्या बाजारावर हुकूमत गाजविणार आहे.त्यांचा अंदाज आहे की भारतातील 60 दशलक्ष लोक असे आहे की ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे सरासरी 8 लाख आहे आणि ही लोकसंख्या 2027 मधे म्हणजे तीनच वर्षांनी 1 00 दशलक्षपर्यंत वाढेल.यासाठी त्यांनी यावर्षी फाइल झालेल्या इन्कम टॅक्स रिटर्नचा आधार घेतला आहे. गेल...

राम मंदिर उद्घाटन आणि घोटाळेबाज सक्रिय

  Blog No.2024/013.   Date: -18 th , January,2024.                                                                   image courtesy Tax  Guru.  मित्रांनो, देश 22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनाची वाट पाहत असताना,घोटाळेबाज त्यांच्या वैयक्तिक  फायद्यासाठी धार्मिक भावनांचा फायदा घेऊन भक्तांचे शोषण करण्याचा प्रयत्न करत आहे असे आढळून आले आहे.फसव्या व्हॉट्सअॅप मेसेजेसवरून शंकास्पद प्रसाद वितरण योजनांची माहिती दिली जात आहे.हे अत्यंत महत्वाचे असल्याने सगळ्यांनी हे वाचणे गरजेचे आहे.   हे सर्व कसे केले जात आहे .     घोटाळा 1 - मार्केटप्लेस मृगजळ : ई-कॉमर्स दिग्गजांवर खोटे दावे Amazon सारख्या दिग्गजांसह ऑनलाइन बाजारपेठा अधिकृत राममंदिराचा प्रसाद देण्याचा दावा करणाऱ्या घोटाळ्यांचे प्रमुख केंद्र बनले आहेत.उत्पादनाना राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टने मान...

लक्षद्वीपचे पर्यटन आणि सामरिक महत्व

  Blog No.2024/012.   Date: -17 th , January,2024.   मित्रांनो,   देशातील बहुतेक भारतीय जे विश्रांतीसाठी पर्यटन करतात , ते बहुतेक तीर्थक्षेत्रांना प्राधान्य देतात आणि अयोध्येला त्या वाहतुकीचा सिंहाचा वाटा काही काळासाठी मिळेल.पण भारतातील एकूण लोकसंख्येच्या म्हणजेच 1.4 अब्ज लोकसंख्येपैकी सगळेच मंदिर दर्शनाला जात नाहीत.तसेच जे लाखो लोक पुढील काही महिन्यांमध्ये अयोध्येला जाणार आहेत , ते सर्व संभाव्य पर्यटक आहेत,असे म्हणता येणार नाही.पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनामुळे लक्षद्वीपकडे लोकांच्या नजरा वळल्या आहेत.   प्रास्ताविक मालदीव मधे लक्षद्वीपच्या तुलनेत अधिक सुविधा जसे हॉटेल्स , रस्ते आणि पर्यटन स्थळे विकसित केलेली आहेत. कारण भारताने लक्षद्वीप मध्ये आजपावेतो विशेष स्वारस्य दाखवले नाही. 1,000 वर्षांपूर्वी , सम्राट राजेंद्र चोलने चेरा देशातील त्याच्या मोहिमेचा भाग म्हणून संपूर्ण द्वीपसमूह जिंकला. त्याच्या 1,200 वर्षांपूर्वी मौर्य सम्राट अशोकाची कन्या संघमित्रा हिने तेथे बौद्ध धर्म नेला असे मानले जाते.अगदी अलीकडे , लक्षद्वीपचा जो भाग आता ...

लयबद्ध आणि मधुर गीतांचा निर्माता ओ पी नय्यर

  Blog No.2024/011.   Date: -16 th , January,2024.   मित्रांनो,             लयबद्ध आणि मधुर संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या ओ.पी. नय्यर अर्थात ओंकार प्रसाद नय्यर यांची आज 98 वी जयंती. ‘आस्मान” या 1952 साली आलेल्या चित्रपटापासून सुरु झालेली ओपीची कारकीर्द अगदी 1994 पर्यन्त विस्तारलेली होती. ‘जिद’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट.अशा या संगीत दिग्दर्शकाला आज त्यांच्या 98 व्या जयंती दिनी माझा मानाचा मुजरा.   प्रास्ताविक             ओपी नय्यर यांचा जन्म 16 जानेवारी, 1926 ला पाकिस्तानातील लाहोर येथे झाला. त्यांना तीन भाऊ होते.ओपी यांची पत्नी सरोज ही लग्नापूर्वी स्टेज डान्सर होती.सरोज यांनी “प्रीतम आन मिलो” हे गीत लिहिले होते. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा होता. कारकीर्द             ओपी नय्यर यांनी सर्वप्रथम 1952 ला “आस्मान” या चित्रपटासाठी संगीत दिले. त्यानंतर छम छमा छम, बाज या चित्रपटांसाठी संगीत दिले.चित्र...

पंडित शिवकुमार शर्मा-एक अनोखा कलाकार

  Blog No.2024/010.   Date: -13 th , January,2024.   मित्रांनो,          भारतीय संगीतात संतूर हे एक अनोख वाद्य. या वाद्याला लोकमान्यता देण्याचे आणि विशेष म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीतात संतूरला एक वाद्य म्हणून मान्यता मिळवून देण्याचे काम एका शास्त्रीय संगीतकाराने केले. त्या संगीतकाराचे नांव म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा. आज त्यांची 86 वी जयंती. त्या निमित्त त्यांना आजच्या या ब्लॉगच्या रूपाने माझ्या कडून शब्द सुमनांजली.   प्रास्ताविक           पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 रोजी ब्रिटिश भारतातील जम्मू आणि काश्मीर संस्थानातील (आताच्या जम्मू राज्यात)  जम्मू येथे झाला.त्यांचे वडील उमा दत्त शर्मा हे गायक आणि तबला वादक होते.त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या पाचव्या वर्षापासून गायन आणि तबला शिकवायला सुरुवात केली. वडिलांनी त्यांची संतूर या हातोड्याने बांधलेल्या डलसीमरची ओळख करून दिली. संतूर हे एक लोक वाद्य आहे. ज्याचे मूळ प्राचीन पर्शियामध्ये होते , परंतु ते काश्मीरमध्ये वाजवले जायचे.त्यांच्या ...

मेट्रो फायदेशीर आहेत कां?

  Blog No.2024/009.   Date: -12 th , January,2024.   मित्रांनो, मेट्रो रेल्वेचे आकर्षण वेगळीच गोष्ट आहे. सुरेख दिसणाऱ्या रेल्वे गाड्या शहरांत उंचावर शांपणे फिरत असतात. आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळून आपल्याला शहरात जिथे जायचे असते,त्या गंतव्यस्थानी  (Destination ) पोहोचविण्याचे काम करत असतात.शहर एक विकसित शहर असल्याचा आभास त्यामुळे निर्माण होतो.पण अशा या आकर्षक मेट्रोमुळे खरोखर वाहतुकीची समस्या दूर व्हायला मदत झाली आहे कां? हे आज आपण पहाणार आहोत.      प्रास्ताविक भारत मेट्रोच्या बांधकामात आज अग्रेसर आहे. सरकारने गेल्या दशकात यासाठी सुमारे ₹90,000 कोटी राखून ठेवले आहेत.भारतात दर महिन्याला ६ किमीचे नवीन ट्रॅक सुरू करत आहोत आणि लवकरच भारत हे मेट्रोचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क असेल.म्हणजे आपण फक्त चीनच्या मागे असू. मेट्रो उभारण्याचे काम जोरात सुरु आहे,पण मेट्रोतून प्रवास करणाऱ्याची संख्या मात्र त्या प्रमाणात वाढत नाही.ही एक समस्या आहे.आयआयटी दिल्लीतील काही प्राध्यापकांनी यावर संशोधन केले आणि त्यांचा अहवाल धक्कादायक आहे.दिल्ली म...