ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
Blog No. 2023/100 Date: 24th , April 2023 . मित्रांनो, भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल,1973 ला झाला. याचा अर्थ शतकांचे शतक केलेला सचिन तेंडुलकर याने आपल्या जीवनाचे अर्धशतक पूर्ण केले आहे.सचिन 50 चा, खरं नाही वाटतं हे.भरवसा नाही बसतं.पण जन्म तारखेप्रमाणे हे खरे आहे असेच म्हणावे लागेल. कुणाचाही वाढदिवस किंवा जन्मदिवस असला की त्याची जन्मापासून शिक्षण वगैरेची माहिती दिल्याशिवाय मला रहावत नाही.पण सचिन तेंडुलकर बद्दल कुणाला काही माहित नाही असे काहीच नसेल बहुदा.पण आज 24 तारीख आणि म्हणूनच मी अशा 24 गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. त्यातल्या काही गोष्टी तरी तुम्हाला माहित नसतील किंवा विशेष वाचनात आल्या नसतील. सचिनच्या बद्दल फारशा माहित नसलेल्या काही गोष्टी 1. तरुण तेंडुलकरला वेगवान गोलंदाज व्हायचे होते परंतु 1987 मध्ये महान डेनिस लिलीच्या ...