Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्व विद्यालय, माऊंट अबू

 Blog No.2023/314.  

Date: -23rd, December 2023. 

मित्रांनो,

            कालच्या ब्लॉगमध्ये दिलवाडा मंदिर, नक्की लेक आणि टोड रॉक विषयी आपण बघितलं.आज बाकी स्पॉट म्हणा स्थळ म्हणा,माहिती करून घेऊ.माऊंट अबूला आम्ही गेलो तेव्हा थंडी प्रचंड होती.म्हणजे 8 डिग्री एवढे तापमान होते.थंडीसाठी महाराष्ट्रात जी आयुधे आपण वापरत असतो,ती सारीच आयुधे तिथे कुचकामी ठरतात.म्हणून आम्ही पुण्याला रमेश डाईंगमध्ये जाऊन खरेदी केली.तिथे त्यांनी कुठे फिरायला जाताय,ते विचारले.ते सांगिल्यावर योग्य ते कपडे दाखविले.

प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्व विद्यालय   

            प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्व विद्यालय आंतरराष्ट्रीय,गैर-सरकारी आध्यात्मिक संस्थेचे मुख्यालय माउंट अबू येथे आहे.सगळ्यात आधी आम्ही तेथील यूनिवर्सल पीस हॉल” ला गेलो.तिथे पोहोचताच एक भगिनी आम्हाला दोघांना आंत घेऊन गेली आणि तिने हॉलमध्ये जातांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.त्या भगिनीने सगळ्यात आधी आम्हाला प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्व विद्यालय हे नांव कसं ठेवलं गेलं आणि ते कसं समजलं जातं ते समजाविले.प्रजापिता ब्रम्हा म्हणजे या विश्वाचा निर्माता ब्रम्हदेव,कुमारी हे अखिल महिला जातीला उद्देशून आहे आणि विश्व विद्यालयचा अर्थ यूनिवर्सिटी किंवा विद्यापीठ हा अभिप्रेत नसून विश्व म्हणजे विश्वभरात पसरलेले विद्यालय होय.1930 च्या दशकात दादा लेखराज कृपलानी यांनी ही संस्था स्थापन केली.त्याआधी त्यांना  पाकिस्तानातील कराची येथे दिव्य साक्षात्कार झाला होता.तिथे त्यांचे बरेच अनुयायी होते.पण 1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर त्यांनी आपले कार्य माऊंट अबू येथे हलविण्याचे ठरविले.येथे राजयोग हा ध्यानाचा एक प्रकार शिकवला जातो.या संस्थेची 100 देशांमध्ये 8,500 हून अधिक केंद्र आहेत आणि 825,000 नियमित विद्यार्थी असल्याचा दावा केला जातो.आम्ही भेट दिलेल्या पीस हॉलमध्ये एका वेळी 1000 लोक बसू शकतात.   

अचलगड गाव

हे गांव माउंट अबूमधील एक छोटे गाव आहे.जे अचलगड किल्ला आणि अचलेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.अचलगड हा किल्ला डोंगराच्या शिखरावर आहे.अचलगढपासून 5-7 मिनिटांची चढाई,तुम्हाला सुंदर आणि ऐतिहासिक जैन मंदिरांपर्यंत पोहोचवते.हे जैन मंदिर एक निसर्गरम्य स्थान आहे आणि सुंदर शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे.अचलेश्वर मंदिर,5 धातू, पट, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त यांनी बनविलेल्या  नंदीसाठी प्रसिद्ध आहे.अचलगड किल्ला हा माउंट अबूमधील 15 व्या शतकातील किल्ला आहे,जो आता भग्नावस्थेत आहे. उध्वस्त झालेल्या किल्ल्याच्या संकुलात हनुमानपोल नावाचा एक दरवाजा आहे,जे की मुख्य प्रवेशद्वार आहे. किल्ला संकुलाच्या आत एक प्रसिद्ध शिव मंदिर (अचलेश्वर महादेव मंदिर) आणि मंदाकिनी तलाव आहे.असे सांगितले जाते.जैन मंदिरात जातांना उजव्या हाताला एक पुरातन शिव मंदिर आहे.अचलगड येथे माऊंट अबूच्या  प्रसिद्ध रबडीचा स्वाद घ्यायला विसरू नका.

गायमुख मंदिर

माउंट अबूमधील एक आकर्षण म्हणजे गायमुख मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे.या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे 700 पायऱ्यांची चढण हे आहे,या पायऱ्या उतरतांना आणि चढतांना,आजूबाजूच्या खोऱ्याचे विहंगम दर्शन घडते.घनदाट जंगलात, गायमुख,भगवान कृष्ण, भगवान राम आणि ऋषी वशिष्ठ यांच्या मूर्तींसोबत नंदीच्या मूर्ती आहेत.संगमरवरी नंदीच्या मुखातून पडणारा गूढ पाण्याचा प्रवाह लक्ष वेधून घेत असतो.म्हणूनच, गायमुख मंदिर हे भगवान शिवाचे भक्त आणि पर्यटक या दोघांमध्ये लोकप्रिय आहे.

अर्बुदा देवी मंदिर

अर्बुदा देवी मंदिर हे माउंट अबूमधील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते आणि ते राजस्थानच्या समृद्ध स्थापत्य वारशाची साक्ष म्हणून उभे आहे.अर्बुदा देवीला कात्यायनी देवीचा अवतार मानले जाते. हे मंदिर एक पवित्र हिंदू तीर्थक्षेत्र आहे आणि नवरात्रीच्या 9 पवित्र दिवसांमध्ये ते भाविकांनी गजबजलेले असते. 365 पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही अर्बुदा देवी मंदिरात पोहोचू शकता, प्रत्येक पायरी वर्षातील प्रत्येक दिवसाचे प्रतीक आहे जी एखाद्याला कठीण चढाईची वाटेल.परंतु वरून शहराचे संपूर्ण दृश्य पाहायला मिळत असल्याने ते प्रेक्षणीय आहे.

गुरु शिखर, माउंट अबू

गुरु शिखर हे अरवली पर्वतरांगातील सर्वोच्च शिखर आहे आणि ते माउंट अबूपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 1722 मीटर आहे.तिथून अरवली पर्वतरांगा आणि माउंट अबूच्या हिल स्टेशनचे चित्तथरारक दृश्य दिसते.'गुरूचे शिखर' हे नाव गुरू दत्तात्रयांच्या नावावरून ठेवण्यात आले होते,जे त्यांच्या काळात एक भिक्षु म्हणून शिखरावर राहत होते असे मानले जाते. त्याच्या स्मरणार्थ शिखरावरील गुहेचे रूपांतर मंदिरात करण्यात आले आहे.गुरु शिखर हे माउंट अबू वेधशाळेचेही केंद्र  आहे.गुरुशिखराच्या शीर्षस्थानी एक जुनी घंटा आहे,ज्यावर '1411 AD' असे शब्द कोरलेले आहेत. शिखरावर चढून गेल्यावर ती घंटा वाजवणे हे एक आकर्षण असते.कारण या घंटेचा नाद दूर दूर ऐकायला येतो.

समारोप

            साधारणतः ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान जरी थंडी जास्त असली तरी,जी पायऱ्या चढून किंवा उतरुन जायची ठिकाणे आहेत,ते सोपे व्हावे आणि माऊंट अबूमधील थंडीचा अनुभव घेता यावा म्हणून लोक या सीजनमध्ये येथे येत असतात.अचलगड गावात पोहोचल्यावर,जैन मंदिर किंवा किल्ल्यापाशी घेऊन जाणाऱ्या पायऱ्यापर्यंत सोडायचे रु.300/- घेतात.अरुंद रस्ता असल्याने आपण कार घेऊन गेलो तरी आपली कार आपल्या गावात सोडावी लागते.तिथपासून पायी पायी जाता येते एवढेच अंतर होते.आम्ही फसलो कारण आम्हाला कुणी सांगणारं नव्हतं.तुम्हाला मी सांगतो आहे,कुणाच्या सांगण्यावर जाऊ नका.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु, पुणे.

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...