Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

अमीन सयानी जादुई आवाजाचा जादूगार

Blog No.2025/053. 

Date: -22nd, February,2025.  

मित्रांनो,

            1960-80 या दरम्यान जन्माला आलेल्या लोकांना,अमीन सयानी माहित नाही असे होऊ शकत नाही. “भाईयो और बहनो” अशा मृदु संबोधनाने ते रेडियो रसिकांना साद घालीत.मला आठवतंय एखाद्या वेळेस लहानपणी बिनाका गीतमाला लावायचं विसरलो,तरी विशेष फरक पडत नसे.कारण बाजूच्या सगळ्याच घरांमधून बिनाका गीतमाला लागलेली असायची.त्या अमीन सयानी यांचे मागच्या वर्षी  20 फेब्रुवारीला वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.या सोनेरी आवाजाच्या जादूगाराला पहिल्या स्मृती दिनी,विनम्र श्रद्धांजली वहाण्यासाठीचा हा ब्लॉग.         

सविस्तर:

            अमीन सयानी यांचा जन्म 21 डिसेंबर, 1932 ला झाला.अमीन सयानी यांची ओळख त्यांचे भाऊ हमीद सयानी यांनी ऑल इंडिया रेडिओ, बॉम्बे (आताचे मुंबई) येथे करून दिली.अमीन यांनी दहा वर्षे इंग्रजी कार्यक्रमात सहभागी झाला.पुढे त्यांनी ऑल इंडिया रेडिओ लोकप्रिय करण्यात मदत केली.अमीन सयानी यांचा भूत बंगला,तीन देवियां,बॉक्सर आणि कतल यांसारख्या अनेक चित्रपटांत देखील सहभाग होता. या सर्व सिनेमांमध्ये ते कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात निवेदकाच्या भूमिकेत दिसले.

अमीन सयानी यांनी त्यांची आई कुलसुम सयानी यांना महात्मा गांधींच्या सूचनेनुसार नव-साक्षरांसाठी पाक्षिक नियतकालिकाचे संपादन, प्रकाशन आणि छापण्यात मदत केली.1951 पासून त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, 1970 पासून ऑल इंडिया रेडिओची व्यावसायिक सेवा आणि 1976 पासून विविध परदेशी स्टेशन्स असे मिळून अमीन सयानी यांनी 54,000 हून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि 19,000 स्पॉट्स/जिंगल्सची निर्मिती केली आहे.या बद्दल त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

            1952 पासून त्यांनी CIBACA (पूर्वी BINACA) गीतमाला मुख्यतः रेडिओ सिलोनवर आणि नंतर विविध भारती (AIR) वरून - एकूण 42 वर्षांहून अधिक काळ प्रसारित केले.ते जेव्हा बिनाका गीतमाला या कार्यक्रमाचे संचालन करत असतं तेव्हा ते अतिशय मनोरंजकपणे सादर करत. और अगली पादान पर है ... असं म्हटल्यावर प्रत्येक रसिकाचे कान पुढील गाण्याचे बोल ऐकण्यासाठी आतूर होत.दर बुधवारी हा कार्यक्रम प्रसारित केला जात असे.कोलगेट सिबाका गीतमाला म्हणून 2 वर्षांसाठी विविध भारतीच्या नॅशनल नेटवर्कवर प्रसारित केले गेले.कॅसेट, एलपी आणि सीडीवर अनेक ऑडिओ फीचर्सची निर्मिती केल्यानंतर, सयानी सीडीवर त्याच्या फ्लॅगशिप रेडिओ शो गीतमालाचा असामान्य रेट्रोस्पेक्ट (सारेगामा इंडिया लिमिटेडसाठी) निर्मिती करत होते. या मालिकेचे नाव "गीतमाला की छाओं में" असे आहे, ज्यातील 40 खंड (प्रत्येकी पाच सीडीच्या पॅकमध्ये) आधीच तयार आणि रिलीज केले गेले आहेत.खंडांची भारतात आणि परदेशात चांगली प्रशंसा झाली आहे. 

सन्मान आणि पुरस्कार:

अमीन सयानी यांना 2009 मध्ये भारत सरकारचा चतुर्थ सर्वोच्य पुरस्कार “पद्मश्री”ने सन्मानित करण्यात आले.याशिवाय त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले।  

1. इंडिया रेडिओ फोरमसह लूपफेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीकडून लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड.

2. रेडिओ मिर्ची (टाइम्स ग्रुपचे एफएम नेटवर्क) कडून कान हॉल ऑफ फेम पुरस्कार.

3. ॲडव्हर्टायझिंग क्लब,बॉम्बे द्वारे गोल्डन ॲबी शताब्दीच्या उत्कृष्ट रेडिओ मोहिमेसाठी ("बिनाका/सिबाका गीतमाला").

 

4. इंडियन ॲकॅडमी ऑफ ॲडव्हर्टायझिंग फिल्म आर्ट (IAAFA) कडून हॉल ऑफ फेम पुरस्कार.

5. पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड.

6. इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हर्टायझर्स (ISA) कडून सुवर्ण पदक (1991) श्री के.आर. नारायणन, भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती.

7. 2007 मध्ये त्यांना नवी दिल्लीच्या प्रतिष्ठित हिंदी भवनाने "हिंदी रत्न पुरस्कार" प्रदान करण्यात आला. 

मृत्यू

अमीन सयानी यांचे 20 फेब्रुवारी,2024 ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. सयानी यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला.त्यानंतर त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात नेले, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोनेरी आवाजाच्या जोरावर ज्याने,अगणित रसिकांच्या हृदयावर राज्य केले,त्या आवाजाच्या जादूगाराला माझी विनम्र श्रद्धांजली.

समारोप:

            आवाजाच्या जोरावर आपले करियर घडविणारे असे फार कमी लोकं आहेत.भलेही संगीताच्या दुनियेत असे बरेच असतील. पण केवळ संभाषणातील आवाजाने लोकप्रिय फार कमी झाले.त्यात महाभारतात “मी समय हूं” असं धीरगंभीर आवाजात म्हणणारे हरिष भिमानी,हिन्दी क्रिकेट समालोचक सुशील दोषी,आकाशवाणीवर  मराठी बातम्या देणारे “दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे”. असे काही बोटावर मोजण्याइतकेच.आणि हो हिन्दी चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन.पण एकाच प्रोग्रामला आवाज देऊन अनेक वर्षे तो स्वतःलाच नाही तर त्या कार्यक्रमाला रेडियोवर लोकप्रियता मिळवून देणारे अमीन सयानी ग्रेटच.                         

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...