Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

बहारोने मेरा चमन लूट कर

ब्लॉग नं.2025/057.

दिनांक: 26 फेब्रूवारी, 2025.

मित्रांनो,

कधी कधी काही गाणी खूप दिवस लक्षात रहातात.एवढेच नव्हे ते तर ती आपल्या मनावर कोरली जातात.अशी खूप आशयपूर्ण गाणी जी मनात ठसून रहातात आणि काही वेळा त्या गाण्यांशी काही आठवणी जोडल्या जातात.तरुणपणी मनुष्याच्या वाटेला असे काही प्रसंग येतात की जे एखाद्या गाण्याशी जोडले जातात.अशीच एक गोष्ट मी आज सांगणार आहे,त्या गोष्टीशी म्हणा,आठवणीशी म्हणा हे गाणे जोडले गेले आहे. 

सविस्तर:

         मी रेल्वेने नासिक रोड स्टेशनवरुन अकोल्याला येत होतो. नासिक रोडला एक वरात एका डब्यात चढली.ते सर्व एका डब्यात चढले होते.पण आतापर्यन्त नवरी मुलगी आणि नवऱ्या मुलासोबत अगदी मोकळे पणाने बोलणारा एक तरुण मुलगा माझ्या सोबत दुसऱ्या डब्यात चढला. तो वरातीसोबत चढला नाही.अचानक एक माणूस जो ट्रांजिस्टर घेऊन बसला होता. त्याच्या रेडियोवर  स्व.मुकेश यांनी गायलेले,“देवर” सिनेमातील हे गाणं लागलं.गीत आनंद बक्षी यांच, संगीत रोशन (राजेश आणि राकेश रोशन यांचे वडील) यांच आणि याचं चित्रण हे धर्मेंद्रवर करण्यात आलं होतं.                             

बहारों ने मेरा चमन लूटकर, खिज़ां को ये इल्ज़ाम क्यों दे दिया.  

किसीने चलो दुश्मनी की मगर, इसे दोस्ती नाम क्यों दे दिया.  

बहारों ने मेरा ...

             हे गाणं सुरू होताच तू मघाशी डब्यात प्रवेश करता झालेला तरुण अस्वस्थ झाला.तो ट्रांजिस्टर घेऊन बसलेल्या माणसाला म्हणाला,काका हे गाणं बंद करा न.त्या गृहस्थाने विचारले कां? तर तो म्हणाला की त्या गाण्याच्या नायकाच्या बाबतीत जे घडले आहे.तसेच माझ्या बाबतीत झाले आहे.मी त्याला विचारले तर तो म्हणाला. या गाण्याचा अर्थ सांगतो आधी, मग माझी कहाणी.   

माझी बाग वसंत ऋतुने उजाड करून टाकली पण दोष मात्र शरद ऋतुला दिला.

कुणीतरी शत्रुत्व केले आहे पण त्याला मैत्रीचे गोंडस नांव दिले आहे.            

मैं समझा नहीं ऐ मेरे हमनशीं, सज़ा ये मिली है मुझे किस लिये.  

के साक़ी ने लब से मेरे छीन कर, किसी और को जाम क्यों दे दिया

बहारों ने मेरा ...

मला समजत नाही मित्रा की मला ही कसली शिक्षा मिळाली आहे.

की माझ्या हातातला मद्याचा प्याला हिसकावून कुणी दुसऱ्याला दिला.    

मुझे क्या पता था कभी इश्क़ में, रक़ीबों को कासिद बनाते नहीं.   

खता हो गई मुझसे कासिद मेरे, तेरे हाथ पैगाम क्यों दे दिया

बहारों ने मेरा ...

मी प्रेमाच्या बारीक सारिक गोष्टींबाबत पूर्ण अनभिज्ञ होतो.

आपल्या प्रेमिकेच्या दुसऱ्या प्रेमीला कधीच संदेशवाहक बनवू नये.    

माझ्याने चूक झाली,मी माझ्या हाताने प्रतिस्पर्ध्याच्या हातात लगाम देऊन टाकला.    

खुदाया यहाँ तेरे इन्साफ़ के, बहुत मैंने चर्चे सुने हैं मगर.  

सज़ा की जगह एक खतावार को,भला तूने ईनाम क्यों दे दिया.  

हे परमेश्वरा, तुझ्या न्याय प्रियतेच्या खूप चर्चा ऐकल्या होत्या.

पण तू गुन्हेगाराला शिक्षा करण्याऐवजी बक्षीस कां देऊन टाकलेस.

            हा अर्थ सांगून तो त्या गृहस्थाला आणि मला, पुढे म्हणाला, “मी आणि ती मुलगी एकाच वर्गात शिकत होतो. तो नवरा मुलगा माझा मावस भाऊ,एकदा आमच्या घरी पाहुणा म्हणून आला होता.माझं आणि त्या मुलीचं  प्रेम होते आणि मी त्याला तसं सांगितलं होतं.मीच स्वतः त्याची ओळख माझ्या मैत्रिणीशी करून दिली.मी माझे म्हणणे माझ्या आई बाबांना सांगू शकलो नाही.त्यानं तिच्या आई बाबांना सांगायची हिम्मत केली.आणि त्यानं त्याचं प्रेम त्यांच्या मुलींवर असल्याचं सांगितलं. आणि दोघांचे लग्न झालं.अगदी एका चित्रपटात शोभेल अशी माझी कहाणी आहे.प्रेम हिम्मत असेल तरच करांव.हा धडा तो मला शिकवून गेला. म्हणून हे गाणं लागलं की मी ते बंद करतो.”

समारोपः

            तेव्हा त्याला ते काका काय म्हणाले हे महत्वाचे आहे.ते म्हणाले, “राजा, तू एका चांगल्या गाण्याचा आनंद घ्यायला मुकला आहेस. अरे गाणं बंद करून तुला झालेलं दुख: कधीच हलकं होणार नाही.आज या गाण्याने तुला बोलतं केलं बघं. दु:खाला असं मनात कोंडून टाकू नकोस, मोकळं कर. मग हेच गाणं तू स्वतः म्हणशील.” खरं आहे काही वेळा आपण उगाच दु:ख कुरवाळत बसतो आणि त्याच्या कोशात स्वतःला अडकवून घेतो आणि मोकळा श्वास घेऊ शकत नाही. हे गाणं आणि त्याची गोष्ट मला खूप काही शिकवून गेली.               

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु. 

 



Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...