Skip to main content

वयाच्या सत्तरी नंतरही स्नायू होतात बलवान

ब्लॉग नं. 2026/042 दिनांकः 11 फेब्रूवारी , 2026.   मित्रांनो ,  “ 70 नंतर शरीराची झीज अटळ असते.स्नायू कमी होतात , त्यातील ताकद निघून जाते , संतुलन ढासळतं… आणि ते पहात रहाण्याशिवाय पर्याय उरत नाही.” असं आपल्याला वर्षानुवर्षं सांगितलं गेलं. पण जपानच्या डोंगरदऱ्यांत झालेल्या एका संशोधनाने ह्या समजालाच धक्का दिला आहे.नेमकं काय आहे हे संशोधन, जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: अशा काही बिया आहेत की,या बियांमधील प्रथिने अंड्यांपेक्षा तब्बल 21 पट अधिक परिणामकारक ठरली आहेत,विशेषतः 70 वर्षांवरील लोकांमध्ये स्नायू पुन्हा बांधण्यासाठी.काही महिन्याभरात नव्हे तर तर काही आठवड्यांतच त्यांचे पाय स्थिर झाले, त्यांचे संतुलन परत आलं आणि ताकद आणि ऊर्जा वाढली.मग प्रश्न हा  पडतो…ही माहिती इतकी वर्षं आपल्यापासून लपवली का गेली ? कारण साधं आहे , ही सत्य माहिती समोर आली , तर 70 अब्ज डॉलर्सच्या प्रोटीन सप्लिमेंट इंडस्ट्रीला मोठा धक्का बसू शकतो.चला तर मग , जाणून घेऊया. 70 नंतरही स्नायू मजबूत ठेवणाऱ्या 6 चमत्कारी बिया कुठल्या आहेत.   🌻 क्रमांक 1 : सूर्यफूल बिया ( Sunflower Seeds...

वयाच्या सत्तरी नंतरही स्नायू होतात बलवान

ब्लॉग नं.2026/042

दिनांकः 11 फेब्रूवारी, 2026. 

मित्रांनो

70 नंतर शरीराची झीज अटळ असते.स्नायू कमी होतात,त्यातील ताकद निघून जाते,संतुलन ढासळतं… आणि ते पहात रहाण्याशिवाय पर्याय उरत नाही.” असं आपल्याला वर्षानुवर्षं सांगितलं गेलं. पण जपानच्या डोंगरदऱ्यांत झालेल्या एका संशोधनाने ह्या समजालाच धक्का दिला आहे.नेमकं काय आहे हे संशोधन, जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये.

सविस्तर:

अशा काही बिया आहेत की,या बियांमधील प्रथिने अंड्यांपेक्षा तब्बल 21 पट अधिक परिणामकारक ठरली आहेत,विशेषतः 70 वर्षांवरील लोकांमध्ये स्नायू पुन्हा बांधण्यासाठी.काही महिन्याभरात नव्हे तर तर काही आठवड्यांतच त्यांचे पाय स्थिर झाले, त्यांचे संतुलन परत आलं आणि ताकद आणि ऊर्जा वाढली.मग प्रश्न हा  पडतो…ही माहिती इतकी वर्षं आपल्यापासून लपवली का गेली?

कारण साधं आहे, ही सत्य माहिती समोर आली, तर 70 अब्ज डॉलर्सच्या प्रोटीन सप्लिमेंट इंडस्ट्रीला मोठा धक्का बसू शकतो.चला तर मग, जाणून घेऊया. 70 नंतरही स्नायू मजबूत ठेवणाऱ्या 6 चमत्कारी बिया कुठल्या आहेत.  

🌻 क्रमांक 1 : सूर्यफूल बिया (Sunflower Seeds):

100 ग्रॅम सूर्यफूल बियांमध्ये जवळपास 21 ग्रॅम संपूर्ण प्रथिने आहेत, तर व्हिटॅमिन E – 82% (फक्त ¼ कपमध्ये) आहे. व्हिटॅमिन E हे वृद्धत्वात स्नायूंना होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानीपासून संरक्षण करतं.या बियांमधील Arginine नावाचं अमिनो अॅसिड स्नायूंमध्ये रक्तप्रवाह 40% पर्यंत वाढवतं, त्यामुळे पोषण थेट स्नायूपर्यंत पोहोचतं.

संशोधन असं सांगतं की, दररोज 30 ग्रॅम सूर्यफूल बिया खाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये 8 आठवड्यांत पकडण्याची ताकद (Grip Strength) 15% वाढली.

🌾 क्रमांक 2 : तीळ (Sesame Seeds):

100 ग्रॅम तीळ बियांमध्ये जवळपास 18 ग्रॅम उच्च दर्जाची प्रथिने आहेत.पण खरी ताकद आहे,ती  Methionine मध्ये. Methionine हे वय वाढल्यावर स्नायू टिकवण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं,अमिनो अॅसिड. अंड्यांपेक्षा जास्त प्रमाणात हे तीळामध्ये उपलब्ध आहे.

🔬   टोकियो विद्यापीठाच्या अभ्यासानुसार दररोज 2 टेबलस्पून तिळाची पावडर//कूट (तीळ पेस्ट) वृद्ध पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन 18% वाढतं. आणि स्नायू रिकव्हरी 40% जलद झाली.

🌰 क्रमांक 3 : जवस (Flax Seeds):

जवस म्हणजे ओमेगा-3 चा खजिना. जवसामध्ये स्नायूंची सूज 52% कमी झाली आणि स्नायू प्रथिन निर्मितीत 27% ने वाढ झाली. विशेष म्हणजे, जवसातील Lignans,इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात, त्यामुळे स्नायूंना पोषण शोषण सोपं होतं. 12 आठवड्यांत 1.5 किलो स्नायूची वाढ होते आणि 2.2 किलो चरबी कमी होते. (आहार किंवा व्यायाम बदल न करता!)

🎃 क्रमांक 4 : भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds)

            भोपळ्याच्या बिया म्हणजे नैसर्गिक Creatine. 100 ग्रॅम भोपळ्याच्या बियामध्ये 30 ग्रॅम प्रथिनं आढळून येतात. यांत उपलब्ध असणारे Zinc हे,स्नायू दुरुस्तीसाठी अत्यावश्यक असतं.तसेच यांत आढळणारे Magnesium,हे 300 पेक्षा जास्त जैविक क्रियांमध्ये उपयोगी पडतं.  

संशोधन सांगतं, अंड्यांइतकं प्रथिन खाऊनही,भोपळ्याच्या बिया खाणाऱ्यांची 60% अधिक स्नायू वाढ दाखवली

🌿 क्रमांक 5 : हेम्प बिया (Hemp Seeds)

हेम्प बियांनी NASA ने “Perfect Food” म्हटलेलं आहे. 31 ग्रॅम संपूर्ण प्रथिन यांत असतं. यामुळे  94% पचनक्षमता वाढते. या बियांमधील Edestin Protein,हे अगदी मानवी रक्तातील प्रथिनांसारखं असतं. जे मूत्रपिंडांवर ताण न देता स्नायू बांधतं. यामुळे शरीरातील सूज 58% कमी होते.  

क्रमांक 6 : चिया बिया (Chia Seeds):

चिया बिया या स्नायूच्या वृद्धत्वाच्या शत्रू आहेत असं म्हटलं जातं. चिया बिया,या स्वतःच्या वजनाच्या 12 पट पाणी शोषतात.त्यामुळे प्रथिनांचा 6 तासांचा,हळूहळू पुरवठा होतो.  

🔬 स्टॅनफर्ड अभ्यास :

70 नंतर चिया बियांचं शोषण, 12 आठवड्यांत 2.8 किलो स्नायू वाढ होते. तसेच चालण्याचा वेग 23% ने वाढतो. तसेच Grip Strength अर्थात पकड ताकद  31% ने वाढते.  

🌱 समारोप :

वय नाही,अज्ञान आपल्याला कमकुवत करतं.70 नंतर स्नायू कमकुवत होणं ही शिक्षा नाही.ती माहितीच्या अभावाची किंमत आहे. निसर्गाने उपाय दिले आहेत.फक्त आपण त्याकडे पाहिलं नाही. एक-दोन बियांपासून सुरुवात करा.यांत सातत्य ठेवा आणि स्वतःलाच आश्चर्यचकित करा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

 

Comments

  1. उपयोगी माहिती 🙏 RR

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...