ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
ब्लॉग नं :2025/336. दिनांक :30 नोव्हेंबर, 2025. मित्रांनो, तुम्हाला मधुमेह आहे म्हटलं की, हे खात जा, ते खाऊ नका,रोज इतके चालत जा किंवा ही योगासने करा असंच डॉक्टरच नव्हे तर ज्याला वाटेल तो सांगत सुटतो. पण एक डॉक्टर असेही आहेत,जे म्हणतात मधुमेहावर ईलाज करायचा असेल, तर जे खाल ते हळू हळू खा , लक्ष देऊन खा… आणि तुमची साखर आपोआप कमी होईल.हो आजचा ब्लॉग आहे याच विषयावर. सविस्तर: कधी कधी आपण इतक्या घाईघाईत जेवतो की, कुणी विचारलं की, “ अरे , तू नेमकं काय खाल्लंस ?” तर बऱ्याचदा आपल्याकडे उत्तर नसतं आणि मजेची गोष्ट म्हणजे ही घाईघाईत जेवायची सवय फक्त पोट नाही तर आरोग्यालाही त्रासदायक ठरते. ही एक शांतपणे नुकसान करणारी सवय आहे.आणि त्यात तुम्हाला मधुमेह असेल तर मधुमेह असणाऱ्यांसाठी तर ती आणखीच त्रासदायक आहे.आपण नेहमी शोधत असतो, कोणते सुपरफूड खाऊ , कोणती गोळी घेऊ , कोणते डाएट फॉलो करू ? पण तुम्हाला सांगतो , जे शोधताय ना ते फार दूर नाही,ते तुमच्या ताटातच आहे. हो ज्यालाच म्हणतात, “माइंडफुल ईटिंग.” हळू हळू जेवा , लक्ष दे...