ब्लॉग नं: 2025/333.
दिनांक: 27 नोव्हेंबर,2025.
मित्रांनो,
रिकाम्या पोटी कॉफी-प्यावी
की पिऊ नये:
आपल्याला लहानपणापासूनच अनेक सुचनांना सामोरे जावे लागते.“रिकाम्या पोटी काहीही घेऊ नकोस”, “कॉफी
पिऊ नकोस,ती आम्ल वाढवते”, किंवा
“सकाळचा वेळ कोणीही फक्त चहा-पाण्यावर
घालवायचा नाही”.परंतु अलीकडेच X (पूर्वीचे
ट्विटर) वर डॉ. सिरियाक अॅबी फिलिप्स जे
“द
लिव्हर डॉक” म्हणून ओळखले जातात. त्यांनी 21
नोव्हेंबर रोजी केलेल्या एका पोस्टमध्ये,या
अनेक समजुतींवर भाष्य केले आहे.आजच्या ब्लॉगमध्ये यावर चर्चा करू या.
सविस्तर:
डॉ. फिलिप्स म्हणतात की, सकाळी
रिकाम्या पोटी कॉफी प्यायला काही हरकत नाही.ते पुढे
म्हणतात, “सकाळी सर्वात आधी कॉफी प्या, अगदी रिकाम्या
पोटीही. ती तुम्हाला हानी पोहोचवणार नाही.” म्हणजे रिकाम्या पोटी कॉफी पिण्यामुळे,सामान्य
लोकांसाठी कोणतेही गंभीर दुष्परिणाम होण्याची पुष्टी करता
येत नाही. अर्थात
हे सर्व लोकांसाठी एकसारखे लागू होत नाही,तर ते वैयक्तिक
शारीरिक स्थिती लक्षात घेऊ ठरविता येईल.
कॉफी
आणि व्यायाम:
अनेकांना असे वाटत असते की,कसरत
करण्यापूर्वी कॉफी घेतल्याने ताकद येते,कारण कॅफीन
ऊर्जादायी असते.परंतु डॉ. फिलिप्स म्हणतात की,व्यायाम करण्यापूर्वी कॉफी पिणे हा आदर्श
पर्याय नाही.त्यासाठी कॉम्प्लेक्स
कार्बोहायड्रेट (उदा. ज्वारी/ओट्स/बटाट्याचं योग्य प्रमाण) असलेले आहार अधिक
फायदेशीर असतात. कारण त्यात दीर्घकालीन ऊर्जा मिळते.
अॅसिड रिफ्लक्सची कारणं
शोधा:
बहुतेक लोकांची मुख्य
तक्रार असते की, “रिकाम्या पोटी कॉफी घेतल्याने आम्लता वाढते व अॅसिड
रिफ्लक्स
होतो”.अर्थात अॅसिड पोटातून वरवर येऊ लागते.डॉ. फिलिप्स
आणि इतर हेपॅटोलॉजिस्ट यांचा दृष्टीकोन थोडा वेगळा आहे.ते म्हणतात रिफ्लक्सची कारणे
अनेकदा गुंतागुंतीची असतात जसे की पाचनतंतूची
संवेदनशीलता,जीवनशैली (उदा. उशीरा जेवण, अति मसालेदार
अन्न), वजन, औषधे किंवा हायटाटल
हर्निया सारखी समस्या.त्यामुळे अॅसिड
रिफ्लक्ससाठी फक्त कॉफीवर दोष ठेवण्याऐवजी,डॉक्टरांचा
सल्ला घ्या आणि कारण शोधून त्यावर उपचार सुरु करा.
कॉफी
आणि मेंदूतील हार्मोन्स अर्थात डोपामाइनचा
प्रश्न
काही लोक असाही दावा करतात
की,रिकाम्या पोटी कॉफी घेतल्यास,सकाळी
होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे डोपामाइन इत्यादींचे संतुलन बिघडू शकते. परंतु डॉ.
फिलिप्स यांनी या शंकांचे निरसन केले आहे. सध्याच्या वैज्ञानिक पुराव्यांनुसार,कॉफी
पिणे हा डोपामाइनसारख्या,न्यूरोट्रान्समीटरच्या
दीर्घकालीन असंतुलनाचा मूळ कारण नसावे, विशेषतः जर तुम्ही
मध्यम प्रमाणात कॉफी घेत असाल तर.
साखर
घातल्यास काय होते?
काही लोक म्हणतात की,कॉफीमध्ये साखर घातल्याने
कॉफीचे फायदे नष्ट होतात. डॉ. फिलिप्स यांचे मत थोडे लवचीक आहे, कॉफीमध्ये अत्यधिक साखर घातल्यास,निश्चित
आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो (उदा. रक्तातील साखरचा वाढलेला धोका),
परंतु थोड्या प्रमाणात साखर घातल्याने,कॉफीचे
तात्पुरते फायदे पूर्णपणे नष्ट होणार नाहीत. त्यांचा संदेश असा की साखरेचे
प्रमाण योग्य ठेवा,अति करू नका. डॉ. फिलिप्सचा सर्वात साधा पण
महत्त्वाचा इशारा,“कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात हानीकारक असते”.
ते सुचवतात की,दिवसातून जास्तीत जास्त पाच कप कॉफीपर्यंत
मर्यादित ठेवावी. हे सरासरी लोकांसाठी आहे; गर्भवती महिला,उच्च रक्तदाबाचे रुग्ण, हृदयविकाराचे काही
विशेष प्रकार किंवा कॅफीनसंबंधित संवेदनशील व्यक्ती,यांना
त्यांच्या
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
तुम्ही
काय कराल:
तुमच्या शरीराची तुम्हालाच
चांगली ओळख आहे.तुम्हाला
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास कधी पोटदुखी,जळजळ
किंवा अस्वस्थ वाटले आहे का? असं
असेल तर ताबडतोब थांबवा आणि डॉक्टरशी सल्लामसलत
करा.
मध्यम
प्रमाण ठेवा: दिवसातून 3–5 कप साधारणपणे सुरक्षित मानले जाते,
परंतु वैयक्तिक संवेदनशीलता वेगळी असू शकते.व्यायामापूर्वी ऊर्जा
हवी असल्यास: फक्त कॉफीवर अवलंबून न राहता,हलके स्नॅक
किंवा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घ्या.रिफ्लक्स किंवा सततची आम्लता असल्यास,फक्त
कॉफीबदल शंका न घेता,डॉक्टरांकडे जाऊन वास्तविक कारण शोधा. शुगर
आणि अॅड-ऑन्स नियंत्रित करा,कॉफीमध्ये साखर किंवा
क्रीमरचे प्रमाण कमी ठेवा,आरोग्यासाठी ते
फायदेशीर ठरेल.
समारोप:
डॉ. सिरियाक अॅबी फिलिप्स यांच्या थ्रेडमधून आपल्याला एक
स्पष्ट संदेश मिळतो.रिकाम्या पोटी कॉफी पिणे,बहुतेक
सामान्य लोकांसाठी घातक नाही. परंतु, “सर्व काही प्रमाणात” या
नीतीला विसरू नका. वैयक्तिक आरोग्यस्थिती, संवेदनशीलता
आणि जीवनशैली यांचा विचार करून निर्णय घ्या.जर अॅसिड
रिफ्लक्स, जठराशी
संबंधित तक्रारी किंवा हृदय विषयक चिंताअसतील तर तज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य
आहे.
आजचा हा
ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट
बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद
नातु.
(आरोग्य आणि
जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा
लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी
संपर्क करावा.

🙏RR
ReplyDeleteमला वाटतं कॉफीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना नैसर्गिक परिणाम पेक्षा कंपन्यांनी केलेले रिफायनिंग कारणीभूत जास्त असते.
ReplyDeleteलहानपणी मी काळ्या चौकोनाची वडी ने बनवलेली कॉफी प्यायचं त्यावेळी मला कधीही ऍसिडिटीचा त्रास झाला नव्हता. परंतु नेस कॅफे व इतर ब्रँड्स च्या कॉफी एक कप पेक्षा त्रासदायक होतात