ब्लॉग नं:2025/335.
दिनांक:29 नोव्हेंबर, 2025.
मित्रांनो,
लहानपणी शाळेत असतांना जीवशास्त्र
या विषयाचा अभ्यास करताना, लहान आतडे,मोठे आतडे आपण ऐकलेलं.शरीराला व्यवस्थितपणे चालविण्याचे
काम हे आतडे करीत असतात. पण यांना आरोग्यदायी ठेवण्यासाठी लागतं प्रोटीन. प्रोटीन हे
फक्त मांसाहारी जेवणातून मिळत असत नाही. तर असे पाच शाकाहारी पदार्थ आहेत,जे प्रोटीनने
समृद्ध आहेत.याच विषयावर आहे,आजचा ब्लॉग याच विषयावर आहेत.
सविस्तर:
आपण प्रोटीन म्हटले की,लगेच डोळ्यांसमोर येते ते स्नायू, व्यायाम आणि
वजन कमी करण्याचे फायदे. पण आजचे तज्ज्ञ सांगतात की,प्रोटीन हे केवळ स्नायूंसाठीच
नाही,तर आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट
डॉ. पॉल यांच्या मते, प्रोटीनसोबत फायबर, प्रीबायोटिक्स किंवा प्रोबायोटिक्स मिळाले, तर ते
आपल्या आतड्यांच्या बॅक्टेरियासाठी एक परफेक्ट कॉम्बिनेशन ठरते. म्हणूनच खाली
दिलेले पाच शाकाहारी प्रोटीन स्रोत केवळ पचनास सोपे नसून, आतड्यांतील
चांगले बॅक्टेरिया वाढवतात आणि पचनशक्ती सुधारतात.
1)
अंकुरलेली मुगडाळ — पचायला हलकी आणि फायबरयुक्त:
भिजत ठेवलेल्या आणि अंकुर आलेल्या मुगडाळीत जीवनसत्त्वे वाढतात,पचनशक्ती
सुधारते आणि गॅस निर्माण करणारे घटक कमी होतात.
मुगडाळीत प्रोटीन
किती: 100 ग्रॅम
अंकुरलेल्या मुगडाळीत सुमारे 7 ग्रॅम प्रोटीन असतं.
हे कसे
खावे: सलाड किंवा चाटमध्ये टाकून खावे,किंवा पोह्यात मिसळून
खावे, मोहरी–कढीपत्ता टाकून हलके परतून स्नॅक म्हणून खावे.
2) सोया
पनीर — पूर्ण प्रोटीन, कमी फॅट: सोया दूध कर्डलिंग करून बनवलेले हे पनीर पूर्ण
प्रोटीन देते आणि चवीत न्यूट्रल असल्याने कोणताही मसाला सहज शोषून घेते.
प्रोटीन किती: 100 ग्रॅममधे 8 ग्रॅम प्रोटीन
असतं.
हे कसे
खावे: स्टर-फ्रायमध्ये,
काठी-रोलमध्ये, पालक-टोफूमध्ये आणि पॅन-सीअर करून जलद साइड डिश
3)
स्ट्रेन्ड दही — प्रोबायोटिक्स + प्रोटीन:
पाणी काढलेले घट्ट दही (हंग कर्ड) प्रोटीनने समृद्ध असते आणि त्यातील जिवंत
बॅक्टेरिया आतड्यांतील मायक्रोबायोम संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
प्रोटीन किती: 100 ग्रॅममध्ये सुमारे 10
ग्रॅम प्रोटीन आहे.
हे कसे
खावे: फ्रूट–नट बाउल खाणे, काकडीचे रायते खाणे, स्मूदीच्या
स्वरूपात सेवन करून पहावे .
4) लो-फॅट
पनीर — जास्त प्रोटीन, कमी जडपणा:
लो-फॅट दूधापासून तयार केलेले पनीर हलके, पचायला सोपे आणि प्रोटीनने समृद्ध असते.
प्रोटीन किती:: 100 ग्रॅममध्ये जवळपास 18 ग्रॅम
प्रोटीन असतं.
हे कसे
खावे: पनीर भुर्जीच्या स्वरूपात खावे, एअर-फ्रायरमध्ये
पनीर टिक्का करून खावे,भाज्यांच्या ग्रेव्हीत किंवा मिलेट पुलावमध्ये टाकून खावे.
5)
फर्मेंटेड सोयाबीन केक — प्रीबायोटिक + प्रोबायोटिक गुणधर्म:
सोयाबीन आंबवून तयार होणाऱ्या या घट्ट केकमध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स वाढतात
आणि पचण्याची क्षमता सुधारते.
प्रोटीन किती: 100 ग्रॅममध्ये जवळपास 19 ग्रॅम
प्रोटीन असतं.
हे कसे
खावे: पॅन-ग्रिल करून बुद्धा बाउलमध्ये, शेजवान
सॉससोबत टॉस करून, कीमा-स्टाइल स्टफिंगमध्ये
समारोप:
पचन सुधारायचे असेल तर आतड्यांची ताकद वाढवायची असेल आणि शरीराला दर्जेदार
प्रोटीन द्यायचे असेल तर,वरील पाच वनस्पती-आधारित प्रोटीन स्रोत तुमच्या दैनंदिन
आहारात नक्की समाविष्ट करा. प्रोटीनसोबत फायबर आणि प्रोबायोटिक्स मिळाले की ते
आपल्या पोटासाठी एक नैसर्गिक औषधासारखे काम करते.
आजचा हा
ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट
बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद
नातु.
(आरोग्य आणि
जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा
लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी
संपर्क करावा.

छान माहीती
ReplyDeleteमिलिंद निमदेव
🙏RR
ReplyDeleteउपयुक्त माहिती
ReplyDelete