ब्लॉग नं:2025/336.
दिनांक:30 नोव्हेंबर, 2025.
मित्रांनो,
तुम्हाला मधुमेह आहे म्हटलं की, हे खात जा, ते खाऊ नका,रोज इतके
चालत जा किंवा ही योगासने करा असंच डॉक्टरच नव्हे तर ज्याला वाटेल तो सांगत सुटतो.
पण एक डॉक्टर असेही आहेत,जे म्हणतात मधुमेहावर ईलाज करायचा असेल, तर जे खाल ते हळू हळू खा, लक्ष देऊन खा… आणि तुमची साखर आपोआप कमी होईल.हो
आजचा ब्लॉग आहे याच विषयावर.
सविस्तर:
कधी कधी आपण इतक्या घाईघाईत जेवतो की, कुणी विचारलं की, “अरे,तू नेमकं काय खाल्लंस?” तर बऱ्याचदा आपल्याकडे उत्तर
नसतं आणि मजेची गोष्ट म्हणजे ही घाईघाईत जेवायची सवय फक्त पोट नाही तर आरोग्यालाही
त्रासदायक ठरते. ही एक शांतपणे नुकसान करणारी सवय आहे.आणि त्यात तुम्हाला मधुमेह असेल
तर मधुमेह असणाऱ्यांसाठी तर ती आणखीच त्रासदायक आहे.आपण नेहमी शोधत असतो, कोणते सुपरफूड
खाऊ, कोणती गोळी घेऊ, कोणते डाएट फॉलो करू? पण तुम्हाला सांगतो,जे शोधताय ना ते फार दूर नाही,ते
तुमच्या ताटातच आहे. हो ज्यालाच म्हणतात, “माइंडफुल ईटिंग.”
हळू हळू जेवा, लक्ष देऊन जेवा, फक्त जेवताना जेवणावर लक्ष ठेवा.उपाय
इतका साधा पण परिणाम? अप्रतिम! विशेषज्ञ काय सांगतात? डॉ. अमित भूषण शर्मा (Paras Health) यांनी खूप छान
सांगितलं आहे, ते म्हणतात, “लोक जास्त खातात,कारण ते भुकेले
असतात म्हणून नाही, तर ते विचलित असतात म्हणून.” फोन,
टीव्ही, घाई, ताण,
कंटाळा—हे सगळं आपल्याला अन्नापासून दूर नेतं. “माइंडफुल ईटिंग.”ची कल्पना
त्यांचीच.
त्यांचे नियमही
सोपे आहेत,ते म्हणतात, जेवायला डायनिंग टेबलवर बसा. मोबाईल,टीव्ही,नोटिफिकेशन्स सगळं बाजूला ठेवा, ताटातील अन्नाचा सुगंध, रंग, पोत, चव अनुभवा.प्रत्येक घास नीट चावून चावून
खा. स्वतःला विचारा—“मी भुकेलेलो आहे का, की फक्त खाण्याची
इच्छा आहे? दुसऱ्यांदा ताटात काही हवं आहे कां?थोडं थांबा, भूक
आहे कां? तरच खा !”
त्यांच्याच विचाराला डॉ. रविंद्र
निडोणी यांनीही पुष्टी दिली आहे, “आपण कसे खातो यावर शरीर ऊर्जा कशी वापरतं हे ठरतं.”
माइंडफुल
ईटिंग म्हणजे,
✔ खाण्यावरचे नियंत्रण सुधारते, ✔ लिव्हरवर ताण येत नाही, ✔ भावनिक खाणं कमी
होतं आणि ✔ शरीर शांत राहतं.शेवटी आरोग्य जपण्यासाठी अवघड गोष्टींची गरज नसते.जाणीव
आणि सतर्कता पुरेशी असते.आणि हो विज्ञानही तेच सांगतं.
बरं या सगळ्या फक्त गप्पा नाहीत बार कां.
अभ्यास सांगतो,
1) 2024 चा एक अभ्यास सांगतो, Mindful
Eating म्हणजेच कमी HbA1c. संशोधना दरम्यान असे
आढळू आले की, जे लोक माइंडफुल पद्धतीने खात होते,त्यांची HbA1c
पातळी नियमितपणे चांगली आढळली.तुम्ही खा, पण
लक्ष देऊन खा. तसेच;
2) 2020 च्या Meta-analysis मध्ये आढळून आले की, माइंडफुलनेस आणि माइंडफुल ईटिंगने HbA1c रिपोर्ट सुमारे 0.25% ने कमी आला. माइंडफुलनेस आणि माइंडफुल ईटिंगमुळे 1) HbA1c कमी आलं, 2) भावनिक ताण कमी, 3) डिप्रेशनची लक्षणे कमी आढळली आणि शरीराला
शांतता दिली की साखरही कमी असते.
3) 2016 अभ्यास म्हणतो की माइंडफुलनेस आणि माइंडफुल ईटिंगने उपाशी साखर कमी म्हणजे fasting sugar कमी
येते. माइंडफुल ईटिंग करणारे लोक, गोड कमी खातात,त्यांची शुगर लेवल कमी असते,त्यांच्या
खाण्याच्या सवयी आरोग्यदायी बनतात.
नवीन
डायबेटीस मंत्र:हळू हळू खा, लक्ष देऊन खा
माइंडफुल ईटिंग ही फॅशन नाही.ते डॉक्टरांनी सुचवलेलं, संशोधनांनी
सिद्ध केलेलं एक प्रॅक्टिकल टूल आहे.कारण ते, जास्त खाणे अर्थात ओव्हरईटिंग
थांबवतं, भावनिक खाणं कमी करतं, खर्या भुकेची जाणीव करून देतं, तसेच पोट भरल्याचे
संकेत लक्षात आणून देतं,मनावरील ताण कमी करतं, पचन सुधारतं. आणि सगळ्यात
महत्त्वाचं म्हणजे, माइंडफुल ईटिंग हे मोफत आहे. कुठलाही खर्च नाही. फक्त…लक्षात असू
द्यायचं, जे खाल ते हळू हळू खा, लक्ष देऊन खा आणि आनंद घेत खा.
समारोप:
हळू खा… आणि तुमचं शरीर त्या बदल्यात तुम्हाला बरेच काही देईल! माइंडफुल ईटिंग
हा चमत्कार नाही, पण ती एक साधी, सुंदर, सहज
अमलात आणता येणारी सवय आहे.आपण जेवणाकडे अनुभूती म्हणून पाहायला लागलो,तर शुगर लेवल सुधारते,पचन सुधारते,
मनावरचा ताण कमी होतो आणि आरोग्य नैसर्गिकपणे सुधारते.म्हणून जेवायला बसाल तेव्हा थोडं
थांबा…खोल श्वास घ्या…आणि लक्षात ठेवा “जे खाल ते हळू हळू खा, लक्ष देऊन खा आणि
आनंद घेत खा.” मी सुरुवात केलीय.
मित्रांनो,एकवार महिनाभर करून बघायला काय हरकत आहे, झाला तर फायदाच होईल. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा.
पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी
घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद
नातु.
(आरोग्य आणि
जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा
लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी
संपर्क करावा.

अतिशय उपयुक्त माहिती
ReplyDeleteप्रसाद नातू, तुमच्या ब्लॉगचे viewers १ लाखाहून जास्त झाले त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊
तुमचे ब्लॉग असतातच माहितीपूर्ण
मिलिंद निमदेव
खूप खूप धन्यवाद सर
ReplyDelete🙏 RR
ReplyDeleteImportant information
ReplyDelete