ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
ब्लॉग सं. 2025/21 3. दिनांक: 31 जुलै, 2025 मित्रांनो, मेंदू हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव.कुठल्याही बाबतीत सकारात्मक विचार करायचा कां की नकारात्मक विचार करायचा हे मेंदूचे काम असते.आपल्या विचारांवर बरेच काही अवलंबून असते.सकारात्मक विचार असतील तर,वाईटातून देखिल मेंदू चांगले शोधायचा प्रयत्न करतो.पण नकारात्मक विचार प्रत्येक बाबतीत मेंदू वाईट करतो.मेंदूला तल्लख ठेवायचा असेल तर,त्याला चालना देणे आवश्यक आहे.आजच्या ब्लॉगमध्ये आपण मेंदू तल्लख,तीक्ष्ण राहण्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी 6 सोप्या टिप्स पाहणार आहोत. सविस्तर: 1 . तुमच्या मेंदूला आव्हान द्या : तुमचा मेंदू शिकल्यानेच भरभराटीला येतो.कोडी सोडवणे , नवीन कौशल्ये शिकणे आणि रणनीती ठरविणे,बुद्धिबळ खेळणे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.या क्रियाकलापांमुळे,मेंदूचे चांगले कनेक्शन तयार होते,ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते.वैज्ञानिक पुरावे सिद्ध करतात की,मानसिक उत्तेजनामुळे व्यक्तींमध्ये वयानुसार स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका कमी होतो. 2 . शरी राच्या हलचाली वाढवा: व्यायाम दोन ...