Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

स्व. महेंद्र कपूर पहाडी आवाजाचा गायक

ब्लॉग नं.2025/009

दिनांक:-9 जानेवारी, 2025.

मित्रांनो,

            आज “मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरेमोती. मेरे देश की धरती.” असं अगदी ठणकावून सांगणाऱ्या बुलंद, पहाडी आवाजाच्या स्व. महेंद्र कपूर यांची जयंती.महेंद्रकपूर यांनी मराठीमध्येही अनेक गाणी गायली.ज्यातील एक म्हणजे “रात्रीस खेळ चाले, या गुढ चांदण्यांचा,संपेल ना कधी ही हा खेल सावल्यांचा.” आज त्यांच्या जयंती दिनी स्व. महेंद्र कपूर यांना ब्लॉग द्वारे शब्द सुमनांजली अर्पण करून या. 

प्रास्ताविक

            स्व. महेंद्र कपूर यांचा जन्म 9 जानेवारी, 1934 चा,त्यांचा जन्म अमृतसर मधे झाला. पार्श्वगायक म्हणून करियर घडवायचे म्हणून ते मुंबईत आले.1953 ची एक फिल्म ‘मदमस्त’ साठी “आप आये तो खयाल-ए-दिल-ए- नाशाद आया” हे त्यांच्या पदार्पणातील गाणं.पुन्हा एकदा ऐकलत तर जाणवणार देखिल नाही की हे त्यांचे पहिलं वहिलं गाणं होतं.

त्यानंतर ‘गुमराह’ मधील “चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो” या पहिला फिल्म फेयर पुरस्कार मिळाला.लागोपाठच्या ‘हमराज’ मधील “हे नीले गगन के तले धरती का प्यार पले” साठी दूसरा फिल्म फेयर पुरस्कार मिळाला.त्यांना जिवनातील तिसरा फिल्म फेयर पुरस्कार ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटातील “और नही बस और नही,गमके प्याले और नही” या गाण्यासाठी मिळाला. 

त्यांची लोकप्रिय गाणी

            त्यांच्या लोकप्रिय गाण्यांमद्धे “किसी पत्थर की मुरत से मोहब्बत का इरादा है”, “लाखों है यहाँ दिलवाले पर प्यार नही मिलता”, “आप आये तो खयाल-ए-दिल-ए-नाशाद आया”, “चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो”, “हे नीले गगन के तले धरती का प्यार पले”, “ऐ प्रीत जहाँ की रीत सदा”, “संसार की हर शै का इतना ही फ़साना है,एक धुंद मे आना है, एक धुंद मे जाना है”; “मेरे देश की धरती सोना उगले”, “अबके बरस तुझे धरती की रानी”, “मांगी थी एक दुवा जो कुबूल हो गई”, “बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी”, “दिलकी यह आरजु थी कोई दिलरुबा मिले”, “तेरे प्यार का आसरा चाहता हूँ” इत्यादिचा समावेश करता येईल.तसेच मराठीतील ““रात्रीस खेळ चाले, या गुढ चांदण्यांचा,संपेल ना कधी ही हा खेल सावल्यांचा.” “आला महाराजा सोबत बैंड बाजा” आणि दादा कोंडके यांच्या चित्रपटातील गाणी.

पुरस्कार आणि सन्मान

            महेंद्र कपूर यांना तीन फिल्म फेयर पुरस्कार मिळाले ज्यांचा मी वर उल्लेख केलेल्या आहे,त्या शिवाय भारत सरकार तर्फे त्यांना देशाचा चतुर्थ नागरी पुरस्कार “पद्मश्री”  देऊन गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र सरकारने प्रतिष्ठित “लता मंगेशकर पुरस्कार” देऊन त्यांचा गौरव केला. 

मृत्यू

            27 सप्टेंबर, 2008 ला त्यांचे त्यांच्या बांद्रा स्थित निवासस्थानी निधन झाले. 

समारोप   

            महेंद्र कपूर या बुलंद,पहाडी आवाजाच्या गायकाने आपले हिन्दी चित्रपट जगतात आपले वेगळे स्थान आणि वेगळी ओळख निर्माण केली होती.किशोरकुमार,मोहम्मद रफी आणि मुकेश या त्रिकूटांच्या जगात ते आपलली वेगळी ओळख स्थापित करण्यात यशस्वी झाले होते.त्यांना त्यांच्या 91 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.     

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

 

प्रसाद नातुपुणे.      

Comments

  1. त्यांच्या गायनाने खूप आनंद दिला. विनम्र अभिवादन

    ReplyDelete

Post a Comment