ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
Blog No 2024/25 7 . दिनांक : 31, ऑक्टोबर , 2024 मित्रांनो , कालच्या ब्लॉगमध्ये मी लिहिले होते की ऑनलाइन व्यवहारांमुळे जिवन जलद आणि सुखकर झाले आहे.पण या सोबत त्याचा छोट्या किराणा दुकानांवर वाईट परिणाम झाल्याचे दिसत आहे.बिग बाजार,डिमार्ट सारखे मॉल आल्यावर देखिल छोटे किराणा व्यावसायिक तगले होते,कारण मॉलमध्ये केव्हाही उठून जाणे सोपे नव्हते. आणि तिथे गर्दी असल्यामुळे दोन चार गोष्टी घेण्यासाठी कुणी मॉलमधे जात नसे.पण Zomato's Blinkit, Swiggy, आणि Zepto यासारख्या घरपोच सेवा देणाऱ्या अॅप्स् मुळे आणि त्यांच्या कडून मिळत असलेल्या डिस्काऊंट, अगदी 100 फुटांवर असलेल्या दुकानात लोकांचे जाणे बंद झाले किंवा कमी तरी झाले. यावर आहे आजचा ब्लॉग. सविस्तर: भारतातील जलद व्यापाराच्या झपाट्याने विस्तारामुळे,गेल्या एका वर्षात देशातील सुमारे 200,000 किराणा दुकाने बंद झाली आहेत , असे भारतातील सर्वात मोठे रिटेल वितरक असोसिएशन ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन ( AICPDF) ने सोमवारी सांगितले. ...