Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

दिर्घायुषी निरोगी जिवन जगण्यासाठी काय करावे?

Blog No 2024/251.

दिनांक:23,ऑक्टोबर2024 



मित्रांनो,

            आज काल तसेही मनुष्याचे आयुष्यमान वाढले आहे. त्यात आयुष्य निरोगी व्यतित करणे जवळपास अशक्य झाले आहे. कारण आपण किती ही प्रयत्न केला तरी सकस अन्न आपल्याला मिळत नाही. Pesticides आणि insecticides चा वापर  करून पिकविलेले अन्न त्याचे काही दुष्परिणाम घेऊन येतच. हवा तर नाहीच पण पाणी शुद्ध मिळत नाही,आपण वॉटर प्युरिफायर वापरुन शुद्ध पाणी प्यायल्याचे समाधान बाळगत असतो पण पाणी शुद्ध करतांना,पाण्यातील बरेचसे शरीराला पोषक आणि आवश्यक घटक देखिल नष्ट होत असतात.माझ्या वाचनात निरोगी दीर्घायुष्य जगण्याच्या उपायांबद्दल माहिती आली,ती आजच्या ब्लॉग मध्ये पोस्ट करत आहे.त्यातील बऱ्याचशा गोष्टी कृतीत आणणे अवघड असले तरी करून पहिल्याने भलेच होणार आहे. तर बघू या, काय आहेत हे मूलमंत्र.

सविस्तर: 

आपल्या शरीरात वात,पित्त आणि कफ असतात, यांना समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी असणे म्हणतात. यांना दोष यासाठी म्हटले आहे की यांच्या संतुलनात काही बिघाड झाला की त्याचे रूपांतर आजारांत होते.यासाठी आपल्याला आपल्या जिवनशैली मधे थोडा बदल करावा लागतो.तो केला की त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात.

आधीचे लोक हे अनेक वर्षे आणि तेही तंदुरुस्त जिवन जगत. काय होते त्यांच्या जीवनाचे रहस्य किंवा मूलमंत्र,ते आपण पाहू या. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील.  

1) सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 4.30 ते 5.00 या वेळेत उठावे.                     

2) दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जाईल.याप्रमाणे 1 ते 3  ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)

3) पाणी प्यायल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातिर्विधी आटोपून घ्यावा.

4) त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किवा स्वदेशी पेस्ट वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन) दंत रोग दूर राहतात

5) नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना गरम पाणी कधीच वापरु नये.

6) सकाळी 7.30 ते 9.30 च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो,त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे केव्हाही फायदेशीर आहे. (अन्न पचन उत्तम होते)

7) जेवणाच्या 45 मिनीट अगोदर आणि जेवणानंतर एक तासाने पाणी  प्यावे. जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही.

8) सकाळी फळांचा ज्युस प्या, दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या आणि  झोपताना देशी गाईचे तूप व हळद टाकुन प्या.

9) नेहमी पाणी पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे,उभे राहून, गड़बडीने पाणी पिऊ नये.

( शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते. त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )

10) नेहमी जेवण केल्यावर 10-15 मिनीटे वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी (२० मिनीटे झोपावे) घ्यावी. आणि संध्याकाळी जेवण केल्यावर 3 तास झोपू नये व शतपावली करावी.

11) ॲल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये व काहीही खाऊ नये. ॲल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय.

12) भोजन करतांना नेहमी तांब्या,पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा. 

13) झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे,असेच झोपावे किंवा विष्णु मुद्रेत, आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले,पोटावर झोपु नये.

14) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.लाकडी घाणीचे तेलच वापरा.  (रिफाईन्ड तेल/ डबल रिफाईन्ड  विष आहे)

15) सेंन्द्रिय गुळाचा वापर करावा. (साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)

16) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा.

17) जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)

18) कमीत कमी 6 ते 7 तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे.

19 ) दररोज एक तास प्राणायाम, 15 मिनीट योगासने, व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे.

20) प्राणायाम मात्र नियमित करणेच चांगले. 

21) रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा. तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी, कोबी यांचा वापर करावा.

22) जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे, उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील. 

23) भारतीय रस म्हणजे उसाचा रस, कोकम सरबत,आवळा रस, लिंबू सरबत, फळांचा ज्युस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत. 

24) भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो पांढराच असावा.

25) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये ८४ प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.

युरीनला जावे वाटले की थांबवू नये,अश्रू बाहेर येवू द्यावेत, रडायला आले तर ऱडावेच, हसायला आले की भरपुर हसावे, जांभई आली की द्यावीच, शिंक आली की बिनधास्त द्यावी,अपानवायू आला की तसाच बाहेर येऊ द्यावा,

26) कफ कधीच गिळू नये.

वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगू शकतो.

समारोप:

            माझ्या मनात आलं की मी लिहिलंय खरं,पण यातील बऱ्याच गोष्टींचे पालन करणे अवघड आहे.पण यातील काही गोष्टी सुरुवात म्हणून आपण करू शकतो आणि त्या मी करायचं ठरविले आहे.त्यातील सकाळी 4.30 ते 5.00 मधे उठणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे,तिच्या पासून सुरुवात करू शकतो.हळूहळू या गोष्टी करत गेल्यास त्याचे फायदे अनुभवायला मिळू शकतात.तुम्ही देखिल सुरुवात करून बघा.       

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु,पुणे.             


Comments

Post a Comment