Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

कहाॅ तक ये मनको-एक सकारात्मक गाणं

Blog No.2024/230

Date :-29th, September,2024.

मित्रांनो,

           आज मला फेसबुकवर एक रिमाइंडर आलं. त्यावरून किशोरकुमारचं एक गाणं आठवलं. कोविड-19 चा  खूप फैलाव झाला होता. फार काही पॉजिटिव्ह गोष्टी कानावर येत नव्हत्या. माझ्या बँकेतल्या काही सहकाऱ्यांचे  निधन झाल्याच्या बातम्या येत होत्या. कोविड-19 संपेल की नाही आणि अजून किती लोकांना सोबत घेऊन जाणार असं वाटतं असतांना हे एक सकारात्मक गाणं मी म्हटलं आणि फेसबुकवर पोस्ट केलं.किती सुंदर अर्थ आहे या गाण्याचा.बऱ्याचदा,अशी गाणी मनाला उभारी देऊन जातात.आज आठवलं म्हणून त्यावर ब्लॉग लिहितोय. 

प्रास्ताविक

            एप्रिल,1979 ला “बातों बातोंमे” हा एक हल्के फूल्के मनोरंजन करणारा बासु चटर्जी यांचा चित्रपट आला होता. अमोल पालेकर आणि टीना मुनीम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात डेव्हिड, पर्ल पदमसी, असराणी आणि रणजीत चौधरी यांच्या सहाय्यक भूमिका होत्या. त्याच्यातील चारही गाणी खूप गाजली. “सुनिये कहिये”, “ना बोले तुम न मैने कुछ कहाँ, “उठे सबके कदम देखो रम पम पम” आणि कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे” ही ती चार गाणी.यातल्या “कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे” या गाण्याबद्दल मी बोलत होतो. किशोरकुमारनी गायलेले हे गीत, योगेश यांनी शब्दबद्ध केलेले आणि संगीत राजेश रोशन यांचे.

            कवि योगेश यांनी बऱ्याच चित्रपटांसाठी गीतं लिहिली,ज्यात “आनंद”, “रजनीगंधा”, “मिली”, “छोटी सी बात”, “मंजिल” आणि “शौकीन” हे महत्वाचे चित्रपट. तर आता “कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे” हे गीत आणि त्याचा अर्थ बघू या.                                  

कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे

उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे

अर्थ:- हा अंधार असा किती काळ टिकणार आहे आणि मनाला छळणार आहे. हे उदासीने भारलेले दिवस कधी न कधी संपतीलच.    

कभी सुख कभी दुखयही ज़िंदगी हैं

ये पतझड़ का मौसम घड़ी दो घड़ी हैं   

नये फूल कल फिर डगर में खिलेंगे

उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे (1)

अर्थ:- सर्व दिवस सारखे नसतात - कधी ते आनंदाचे तर कधी दुःखाचे आणि ह्याचेच नांव तर जीवन आहे.हा शरद ऋतू फार काळ टिकणार नाही.तोही निघून जाईल,आणि मग बाग नवीन फुलांनी बहरेल. हे उदासीने भारलेले दिवस कधी न कधी संपतीलच.

भले तेज कितनाहवा का हो झोंका

मगर अपने मन में तू रख ये भरोसा   

जो बिछड़े सफ़र में तुझे फिर मिलेंगे

उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे (२)

अर्थ:- हे दु:ख भले खूप त्रासदायक आहे आणि तीव्रता ही अधिक जाणवते आहे. पण तू स्वतःवर विश्वास ठेव. जे काही तू या प्रवासात गमावले आहे, ते सर्व तुला पुन्हा मिळणार आहे. हे उदासीने भारलेले दिवस कधी न कधी संपतीलच.       

कहे कोई कुछ भीमगर सच यही है

लहर प्यार की जो कभीं उठ रही है  

उसे एक दिन तो किनारे मिलेंगे

उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे (3)

 अर्थ:- लोक जे त्यांना बोलायचे आहे, ते बोलतच असतात.पण सत्य हेच आहे की तुझ्या मनात ज्या प्रेमाच्या भावना उत्पन्न झाल्या आहेत. त्यांना पूर्णत्व नक्कीच प्राप्त होईल. हे उदासीने भारलेले दिवस कधी न कधी संपतीलच.     


   सारांश:

            किती सुंदर अर्थ आहे या गीताचा. ही अशीच सगळी सुंदर गीत आपले जिवन भारून टाकतात. बऱ्याचदा ही गाणी काही प्रसंगाशी देखिल जोडलेली असतात. ही गाणी पुनः कधी कानावर पडली की ते प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवून देत असतात. जिवन असचं आहे मित्रांनो. जेवढे सकारात्मकतेने स्वीकाराल तेवढं चांगलंच होईल.जो भूतकाळ आहे तो सोडून द्या म्हणतात, पण तो विसरून कसं चालेल. त्यातच तर आपण संकटांना समर्थपणे तोंड दिल्याच्या आठवणी असतात.ज्या आपल्याला उद्यासाठी उभारी देतात.पण कालची दु:ख कुरवाळीत बसू नये,हे देखिल तेवढंच खरं आहे. एकंदरीत भूत,वर्तमान यातील सकारात्मक गोष्टी लक्षात ठेवायच्या हेच खरे.      

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु,पुणे


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...