Skip to main content

Posts

Showing posts from April, 2024

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

शक्तिशाली ध्यान तंत्रांपैकी एक चक्र ध्यान

Blog No. 202 4 /   086.    Date: 30 th , April 202 4.   मित्रांनो,               आजकाल लोकांना मेडिटेशन म्हटलं की कसं अगदी मॉडर्न काही तरी सांगताहेत असं वाटतं. ध्यानधारणा ते काय असतं? असं विचारणारे देखिल भेटतील.म्हणून ध्यान धारणेवर हा ब्लॉग लिहितांना काही इंग्लिश शब्द देवनागरीमध्ये येतील. ध्यान हा एक शक्तिशाली आध्यात्मिक सराव आहे ज्यामध्ये माइंडफुलनेस आणि ब्रीदवर्क यासारख्या विविध तंत्रांचा समावेश आहे.या शतकानुशतके जुन्या प्रथेला अलिकडच्या वर्षांत त्याच्या असंख्य मानसिक आणि शारीरिक आरोग्य फायद्यांमुळे लोकप्रियता प्राप्त झाली आहे. यावर आज ब्लॉगमध्ये विचार करू. सविस्तर: प्रकटीकरण , पुष्टीकरण आणि उर्जा उपचार ( manifestation, affirmations, and energy healing ) यासारख्या इतर पद्धतींचा देखील हा मुख्य भाग आहे. सर्वात शक्तिशाली ध्यान तंत्रांपैकी एक म्हणजे चक्र ध्यान. मानवी शरीरात शेकडो चक्रे आहेत पण त्यातील सात मुख्य ऊर्जा केंद्रे आहेत.ती खालीलप्रमाणे:-   मूलाधार चक्र      ...

ओ माही ओ माही एक सुरेख गीत

Blog No. 202 4 /   085.    Date: 29 th , April 202 4. मित्रांनो,             बऱ्याच दिवसांपासून एका गीताने माझे लक्ष वेधून घेतले होते. शाहरुख खान आणि तापसी पन्नू अभिनीत “डंकी” ( Dunki ) या चित्रपटातील “ओ माही ओ माही” हे अरीजित सिंगने गायलेले हे गीत प्रीतम यांनी संगीत बद्ध केले आहे.खूप सुरेख आशयघन शब्दरचना,सुंदर चाल आणि सुरेल स्वर यांचे अनोखे संयुग बऱ्याच दिवसांनी अनुभवास मिळाले.ऐकू या हे गाणे आणि त्याचा स्वैर अनुवाद, आजच्या ब्लॉगमध्ये.   सविस्तर यारा तेरी कहानी में , हो जिक्र मेरा कहीं तेरी खामोशी में , हो फिकर मेरा मराठी अनुवाद प्रेमा,तुझ्या कहाणीत कुठेतरी माझा उल्लेख असू दे. तुझ्या मौनात माझी काळजी दिसू दे.   हिन्दी   रुख तेरा जिधर का हो , हो उधर मेरा. तेरी बाहों तलक ही है , ये सफ़र मेरा मराठी अनुवाद तुझी जिकडे नजर असेल तिकडेच माझी असू दे माझा जिवनाचा प्रवास केवळ तुझ्यापर्यन्त असू दे   हिन्दी ओ माही ओ माही,ओ माही ओ माही ओ माही ओ माही. ओ माही ओ माही मेरी वफ़ा पे...

सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है

Blog No. 202 4 /   084.    Date: 28 th , April 202 4.   मित्रांनो,             “भारत हमको जानसे प्यार है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है” हे हरिहरनने गायलेले,ए.आर.रेहमान याने संगीतबद्ध केलेले, पी.के.मिश्रा यांनी रचिलेले गीत किती यथार्थ वर्णन करतं आपल्या देशाचं.“सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है” खरं आहे,न्याराच आहे हा देश. देशाच्या राजधानीत सरकार असलेल्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्री महोदयांना 21 मार्च, 2024 रोजी ईडीने अटक केली. या गोष्टीला सव्वा महिना झाला,पण ते अजूनही राज्याचे मुख्यमंत्री आहेत.त्यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाही.त्यांना "सत्तेच्या विनियोगात रस आहे" हे मी नाही म्हणत.हे दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले आहे. आहे ना आपला देश न्यारा.उच्च न्यायालय काय म्हणाले ते पाहू या.                                                               सविस्त...

सॅम पित्रोदा वादग्रस्त राजकारणी

Blog No. 202 4 /   083.    Date: 27 th , April 202 4.   मित्रांनो,             या वेळेसच्या निवडणुका बऱ्याच कारणांनी गाजत आहेत.पहिली गोष्ट ही की बहुतेक पक्षांना या वेळेस आपले उमेदवार निश्चित करण्यास वेळ लागतोय. सातचरणांमद्धे निवडणूक असल्याने शेवटच्या चरणात होणाऱ्या बऱ्याच मतदारसंघासाठी अजून बऱ्याच ठिकाणी कोण उमेदवार आहे,अजून हे निश्चित झालेले नाही.पहिल्या फेरीत इंडी आघाडी थोडा लीड घेत आहे,असे दिसत असतांना अचानक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि एकेकाळी गांधी घराण्याचे जवळचे विश्वासू असलेले सॅम पित्रोदा यांनी नेहमीप्रमाणे एक वादग्रस्त विधान करून कॉंग्रेस पक्षाला पर्यायाने इंडी आघाडीला दोन पावले मागे खेचले आहे.आज त्यांच्या या वादग्रस्त विधानाबद्दल आणि एकूणच सॅम पित्रोदा हे कॉंग्रेसला नेहमीच कसे त्रासदायक ठरले आहेत. हे बघू या.                               सविस्तर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि एकेकाळी गांधी घराण्याचे जवळचे विश्वासू असलेले सॅ...

कोटक महिंद्रा बँकेवर RBI चे निर्बंध

Blog No. 202 4 /   082.    Date: 26 th , April 202 4.   मित्रांनो,             काल वर्तमानपत्रात एक बातमी झळकली , ती होती कोटक महिंद्रा बँकेसंदर्भात,जी देशातील खासगी क्षेत्रातील 4 थी मोठी खासगी बँक आहे.रिजर्व बँक ऑफ इंडियाने दिनांक 24 एप्रिल,2024 ला जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की “कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून नवीन ग्राहक नोंदविण्यावर,तसेच नवीन क्रेडिट कार्ड वितरित करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. काय आहे रिजर्व बँकेचे पत्रक हे सविस्तर बघू,या ब्लॉग मधे. सविस्तर :                           “भारतीय रिझर्व्ह बँकेने आज , बँकिंग नियमन कायदा , 1949 च्या कलम 35 A अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून , कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला (यापुढे ' बँक ' म्हणून संदर्भित)) i) ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहकांचे ऑनबोर्डिंग आणि ( ii) नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे तात्काळ प्रभावाने , बंद करण्या...

न्याहारी,नाश्ता किंवा ब्रेकफास्ट आरोग्यदायी

Blog No. 202 4 /   081.    Date: 25 th , April 202 4.   मित्रांनो, परदेशात ब्रेकफास्ट अर्थात न्याहारी ही संकल्पना खूप आधीपासून आहे.आपल्याकडे अजून ही बरेच लोक दिवसाची सुरुवात चहा, कॉफी घेऊन किंवा फार तर त्यासोबत बिस्किटे खाऊन करत असतात.पण आरोग्य तज्ञाच्या मते हे योग्य नाही आणि त्यासाठी कारण हे दिले जाते की रात्रीचे जेवण आणि सकाळचे जेवण यातील अंतर बघितले तर,म्हणजे समजा आपण रात्रीचे जेवण 8.30-9.00 ला केले आणि सकाळचे लवकरात लवकर म्हणजे 11.00 वाजता केले तर यातील वेळ हा 12 तासापेक्षा जास्त होतो. 2019 चा अभ्यास असे सुचवितो की नियमितपणे नाश्ता न केल्यास लठ्ठपणा , उच्च रक्तदाब , उच्च कोलेस्टेरॉल पातळी , आणि अगदी टाइप 2 मधुमेह,जे सर्व हृदयविकाराच्या जोखमीचे आजार आहेत,त्या आजारांची जोखीम वाढू शकते.यासाठी आरोग्यदायी ब्रेकफास्ट तज्ञांनी सुचविला आहे. तो आज आपण बघणार आहोत. चांगला न्याहारी,ब्रेकफास्ट किंवा नाश्ता कसा बनवायचा ? 1. न्याहारीसाठी संपूर्ण धान्याचा वापर करा. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असे म्हटले आहे की संपूर्ण धान्य आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. संप...