Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

कोटक महिंद्रा बँकेवर RBI चे निर्बंध

Blog No. 2024/ 082.   

Date: 26th, April 2024. 

मित्रांनो,

            काल वर्तमानपत्रात एक बातमी झळकली,ती होती कोटक महिंद्रा बँकेसंदर्भात,जी देशातील खासगी क्षेत्रातील 4 थी मोठी खासगी बँक आहे.रिजर्व बँक ऑफ इंडियाने दिनांक 24 एप्रिल,2024 ला जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की “कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून नवीन ग्राहक नोंदविण्यावर,तसेच नवीन क्रेडिट कार्ड वितरित करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. काय आहे रिजर्व बँकेचे पत्रक हे सविस्तर बघू,या ब्लॉग मधे.

सविस्तर:        

            “भारतीय रिझर्व्ह बँकेने आज, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला (यापुढे 'बँक' म्हणून संदर्भित)) i) ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहकांचे ऑनबोर्डिंग आणि (ii) नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे तात्काळ प्रभावाने, बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.तथापि, बँक तिच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसह विद्यमान ग्राहकांना सेवा प्रदान करणे सुरू ठेवेल.”

            परिपत्रकात पुढे म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेच्या 2022 आणि 2023 या वर्षांसाठी करण्यात आलेल्या बँकेच्या आयटी तपासणीत बऱ्याच प्रमाणात आणि गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.रिजर्व बँकेच्या नियमांचे अनुपालन करण्यात आलेले नाही.तसेच बँक सतत दोन वर्षे, नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्य करत नसल्याचे आढळून आले आहे.या समस्यांचे सर्वसमावेशक आणि वेळेवर निराकरण करण्यात बँकेला सतत अपयश आल्याने  ही कृती करणे आवश्यक झाले आहे.त्यानंतरच्या मूल्यांकना दरम्यान, बँकेने 2022 आणि 2023 या वर्षांसाठी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुधारात्मक कृती योजनांचे पालन न केल्याचे आढळून आले, कारण बँकेने सादर केलेले अनुपालन एकतर अपुरे, चुकीचे किंवा शाश्वत नसल्याचे आढळून आले.

            मजबूत IT इन्फ्रास्ट्रक्चर आणि IT जोखीम व्यवस्थापन फ्रेमवर्कच्या अनुपस्थितीत, बँकेची कोअर बँकिंग प्रणाली (CBS) आणि तिच्या ऑनलाइन आणि डिजिटल बँकिंग चॅनेलला,गेल्या दोन वर्षांत वारंवार आणि लक्षणीय आउटेजचा सामना करावा लागला आहे.अलीकडेच 15 एप्रिल,2024 ला सेवा व्यत्यय आल्याने ग्राहकांची गंभीर गैरसोय झाली. बँकेच्या वाढीशी सुसंगत IT प्रणाली आणि नियंत्रणे तयार करण्यात अपयशी ठरल्यामुळे बँकेला आवश्यक ऑपरेशनल लवचिकता निर्माण करण्यात भौतिकदृष्ट्या कमतरता असल्याचे दिसून आले आहे.रिजर्व बँकेने गेल्या दोन वर्षात कोटक महिंद्रा बँकेशी सतत उच्च स्तरीय संबंध साधून बँकेचे आयटी क्षेत्र मजबूत होईल,यासाठी पाठपुरावा केला.पण परिणाम फारसे समाधानकारक नाहीत.हे देखील लक्षात आले आहे की,रात्री उशिरापर्यंत,क्रेडिट कार्ड्सशी संबंधित व्यवहारांसह, बँकेच्या डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे, ज्यामुळे IT प्रणालींवर आणखी भार पडत आहे.

            म्हणून, रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हितासाठी आणि बँकेच्या कार्यक्षम सेवा प्रदान करण्याच्या क्षमतेवरच नव्हे,तर आर्थिक स्थितीवरही गंभीर परिणाम होऊ नयेत म्हणून,वर नमूद केल्याप्रमाणे बँकेवर काही व्यावसायिक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.आता रिझर्व्ह बँकेचे सर्वसमावेशक बाह्य लेखापरीक्षण पूर्ण झाल्यावर आणि बाह्य लेखापरीक्षणात निदर्शनास आणल्या जाणाऱ्या सर्व उणिवा,तसेच आरबीआय तपासणीमध्ये समाविष्ट असलेल्या निरिक्षणांचे पुनरावलोकन केले जाईल.हे परिपत्रक रिजर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांच्या सहीने हे पत्रक जारी करण्यात आले आहे.   

समारोप:

            रिजर्व बँक ऑफ इंडियाची कारवाई स्वागतार्य आहे. खासगी बँका स्पर्धेत वाहवत जातात आणि चुका करून ठेवतात.आजकाल क्रेडिट कार्ड व्यवहारांवर रिजर्व बँकेची करडी नजर आहे.विना तारण वैयक्तिक कर्ज देण्यावर मर्यादा आहेत,म्हणून क्रेडिट कार्ड भरमसाठ वाटून नफा कमाविण्याचे प्रयत्न केले जातात. पण यात बँकेचे पैसे बुडीत खात्यात जाण्याची शक्यता अधिक असते.म्हणून रिजर्व बँकेने वेळीच ही कारवाई केली असे म्हणावे लागेल.अर्थात बँकेची आर्थिक स्थिति वगैरे मार्च 2024 चे रिजल्ट लागतील तेव्हा कळेलच.काल शेअर बाजारात कोटक महिंद्राचा शेअर सकाळी 1665.00 उघडला आणि संध्याकाळी 1602.00 वर बंद झाला आहे.    

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.

         

Comments

  1. It's quite natural when PSBs are subjected to stringent norms of Compliances, these private banks should not be made an exception. In fact due to private ownership(except govt) at higher levels, these banks should be subjected to more severe norms. By so far, these banks in the name of better technology has escaped from RBI's vigil. Now the skeletons/weak links are coming out of the drawing board

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...