Blog No.2023/240
Date:-17th, September,2023.
मित्रांनो,
आपण शारिरीक दृष्ट्या मजबूत बनण्यासाठी बरंच काही करत असतो.जसे की
व्यायाम, चालणे, समतोल आहार किंवा डाएट
ईत्यादी.पण मानसिकदृष्ट्या सुदृढ बनण्यासाठी काही करतो का? मला
प्रश्न यासाठी पडला आहे,कारण कुणी मी मानसिकदृष्ट्या सुदृढ
बनण्यासाठी अमुक अमुक करतो बरं, हे अजून तरी कुणी म्हटलेलं मी ऐकलेलं नाही.आज आपण मानसिकदृष्ट्या
सुदृढ बनण्यासाठी काय करता येईल
हे पहाणार आहोत.
प्रास्ताविक
मी अशा 10 सवयी तुम्हाला सांगणार आहे,ज्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या
मजबूत बनण्यास मदत करू शकतील. त्या
खालील प्रमाणे:-
1.
आत्म-जागरूकतेचा सराव करा: तुमचे
विचार,भावना आणि त्यांचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यासाठी
प्रयत्न करा.
2.
सकारात्मक स्व-संवाद: नकारात्मक
विचारांना रचनात्मक आणि सकारात्मक विचारांनी बदला. वास्तववादी ध्येये निश्चित करा. या संबंधात स्वतःशीच संवाद साधा.
3.
आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण
करण्यासाठी साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे ठरवा.जिवनात काही तरी उद्दिष्टे असायला हवी किंवा छंद असायला
हवेत. छंदामुळे माणूस ताण. तणाव यापासून दूर राहू शकतो.
4.
बदल स्वीकारा: बदलासाठी मनाची अनुकूलता
ही महत्त्वाची आहे.बदलाकडे वाढीची संधी म्हणून
पहा.जिवनात होणाऱ्या बदलांकडे सकारात्मकतेने पहा.The measure of intelligence
is the ability to change' - असे अल्बर्ट
आईन्स्टाईनने म्हटले आहे.
5.
लवचिकता निर्माण करा: अडथळे आणि
अपयशांपासून शिका, त्यांचा पायरीचा दगड म्हणून वापर करा.कुठल्याही गोष्टी
बाबत दुराग्रह नको. निर्णयात लवचिकता हवी.
6.
स्वत: ची काळजी घेण्यास प्राधान्य
द्या: माणूस इतरांकरिता खूप काही करत असतो,पण स्वतःकडे
अजिबात लक्ष देत नाही.स्वतःकडे लक्ष द्यायला शिका. व्यायाम,पोषण आणि झोपेद्वारे निरोगी जीवनशैली टिकवून ठेवा.
7. इतरांची मदत मागा आणि घ्या: आपल्याला
काही समस्या असेल तर तिचे समाधान शोधण्यासाठी कुणा पुढे झुकावे लागले तरी संकोच करू
नका. जेव्हा गरज असेल तेव्हा मित्र, कुटुंब किंवा
व्यावसायिक यांना मदत मागा.त्याने तणाव दूर करण्यास मदत होईल आणि समस्यांचे निवारण शक्य
होईल. कधी कधी इतरांकडे आपल्या समस्यांवर अधिक चांगला तोडगा असू शकतो.
8. समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित
करा: समस्यांना घाबरून
न जाता किंवा दु:ख करत बसण्यापेक्षा त्यावर मत करण्यासाठी तार्किक
आणि समाधान-केंद्रित मानसिकतेसह आव्हानांना सामोरे जा.
9. जागरुकतेचा सराव करा: तणाव आणि
चिंता कमी करण्यासाठी सजगता आणि ध्यान जोपासा.
10.
सतत शिका: जिवनात सतत काही तरी शिकत
राहिले पाहिजे. त्यामुळे मेंदू तल्लख राखण्यास मदत होते. नवीन ज्ञान मिळवून तुमचे
मन सक्रिय ठेवा आणि नवनविन कौशल्ये विकसित करा.
सारांश
या सवयी
तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्याने तुम्हाला कालांतराने मानसिक शक्ती
विकसित होण्यास मदत होऊ शकते. माणूस जर
मानसिक दृष्ट्या सुदृढ असला तर तो शारीरिक दृष्ट्या देखिल सुदृढ राहू शकतो. शारीरिक
दृष्ट्या सुदृढ होण्याची प्रोसेस ही सतत राबवायची असते. त्याच प्रमाणे मानसिक दृष्ट्या
सुदृढ होण्याची प्रोसेस ही दीर्घ कालीन आहे. हा एक
प्रवास आहे आणि प्रगती हळूहळू होऊ शकते.म्हणून यासाठी संयम बाळगणे गरजेचे आहे. तर मग
चला आजपासून सुरू करू या, हा प्रवास.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा
वाटला,हे कमेन्ट बॉक्स
मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया
उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी
रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु,पुणे

छान 👌🏼
ReplyDelete👍🏾👍🏾
ReplyDeleteछान लिहिलात
ReplyDelete🙏 छान व अनुकरणीय
ReplyDelete