Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

घुम घुम घुम घुमर रे घुमे

 Blog No.2023/223            

Date:- 25th, August 2023.


 मित्रांनो,

        “घुम घुम घुम घुमर घुमे” हे गाणं गुणगुणतंच आपण टॉकीजच्या बाहेर पडतो. परवा मी अभिषेक बच्चन आणि सयामी खेर यांच्या प्रमुख भूमिका असलेला “घूमर” हा चित्रपट पीव्हीआर मॉलला जाऊन बघितला. खेळांवर आधारित असलेले चित्रपट बरेच आले.पण त्याहून वेगळा,असं या चित्रपटाबद्दल म्हणता येईल.या चित्रपटाला रेटिंग द्यायचं म्हटलं तर मी 5 पैकी 4 रेटिंग देईन.या चित्रपटाबद्दलहा आजचा ब्लॉग.

घूमरची कहाणी

       “घूमर” मध्ये अनिना म्हणजेच सयामी खेर ही एक महिला क्रिकेटप्लेयर,चांगली बॅट्समन असते. तिची इंग्लंडला जाणाऱ्या महिला क्रिकेट टीम मध्ये निवड होते.संघ निवडीच्या वेळेस जेव्हा निवडसमितीचे लोक क्रिकेटपटूंना अजमावून पहात असतात, त्या ठिकाणी क्रिकेट क्लबमध्ये एक माजी क्रिकेटपटू पदमसिंह सोधी जो बोलर असतो. तो तिथे मैदानावर येतो.अनिना त्यावेळेस बॅटिंग करत असते.तिथे उपस्थित असलेले कोच आणि इतर पदाधिकारी त्याला मैदानावर जाण्यास विरोध करतात.तरी तो मी अनिनाला फक्त एक बॉल टाकतो म्हणत असतो आणि तो बॉल तकतोच.  ती तो बॉल खेळू शकत नाही. ती क्लीन बोल्ड होते.

              पदमसिंह सोधी तिथून कोणालाही सिलेक्ट करतात वगैरे बडबड करत निघून जातो.दुसऱ्या दिवशी क्रिकेट क्लबमध्ये निवड झालेल्या क्रिकेटची celebration पार्टी असते. नित्य नेमाप्रमाणे पदमसिंह सोधी तिथे दारू प्यायला येतो. त्याला क्रिकेट क्लबचे पदाधिकारी हटकण्याचा प्रयत्न करतात. तरी तो आंत शिरतो आणि सयामीला तिच्या निवडीबद्दल दोष देतो. ती निराश होऊन तिथून निघून जाते.ती कारमधून जात असतांना तिचा अपघात होतो आणि ती तिचा उजवा हात कोपरापासून गमावून बसते.ती खूप निराश होते. तिची आजी शबाना आजमी आणि तिचे वडीलही निराश होता. सयामी मला आता जगायचे नाही म्हणतं असते तेव्हा पदमसिंह सोधी तिथे येतो आणि तिला म्हणतो तू पुढील वर्षी क्रिकेट टीममध्ये निवडली जाशील म्हणतो.

               तो त्यासाठी तिला कसे प्रोत्साहित करतो, तिची कठोर परीक्षा घेतो, शेवटी तिची निवड क्रिकेट टीम मध्ये होते कां? अमिताभ बच्चनचा नेमका रोल काय हे जाणून घ्यायचे असेल तर चित्रपट बघावा लागेल.अभिषेक बच्चन खरं तर एक चांगला अभिनेता आहे,गुणी कलावंत आहे, पण अमिताभच्या टॉवरिंग पर्सनॅलिटीमुळे निश्चितच त्याच्यातील कलाकारांवर अन्याय होतो आहे.अभिषेकचा एक संवाद “लाइफ लॉजिक का खेल नही मॅजिक का खेल है” त्याने खूप प्रभावीपणे सादर केला आहे. सयामी खेरने खूप सुंदर अभिनय केला आहे. शबाना आझमीने देखिल दादीच्या भूमिकेत अगदी सहज सुंदर अभिनय केला आहे.अमिताभ नेहमीप्रमाणे पडदा व्यापून टाकतो.   बाकीचे कलाकार माझ्या ओळखीचे नाहीत.पण त्यांनी त्यांना दिलेल्या भूमिका सुरेख पार पाडल्या आहेत.

               आर बाळकृष्णन जो आर.बाल्की या नावाने ओळखला जातो.त्याचे आधीचे दिग्दर्शित केलेले चित्रपट म्हणजे “चीनी कम”, “पा”, “शमिताभ”, “कि अँड का”, “पॅडमॅन”, “मिशन मंगल”, “चूप:रिव्हेन्ज ऑफ अॅन आर्टिस्ट”. अशा हटके चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे.श्रीदेवीचा इंग्लिश-विगलिश” हा त्याने दिग्दर्शित केला नसला तरी याचा निर्माता आर.बाल्की हाच आहे. या चित्रपटात गाणी विशेष लक्षात ठेवण्यासारखी नाहीत. त्यातल्या त्यात “घूम घूम घूम घूमर घुमे” हे टाइटल सॉन्ग परिणामकारक झाले आहे.

 

 


सारांश                              

               आजकाल चित्रपट पहायचा म्हटलं की मॉलमध्ये जाऊन पाहावा लागतो. तिथे उपस्थित प्रेक्षकांच्या संख्येवरून चित्रपट हिट की फ्लॉप काही अंदाज येतं नाही. चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि बघायची इच्छा झाली.बरेच दिवसांत म्हणजे द केरला स्टोरी नंतर पाहिलेला नाही. बघावा आणि एक ब्लॉग लिहावा. म्हणून बघितला पण. घूमर अजिबात कंटाळवाणा नाही,गती चांगली ठेवली आहे.एकदा अवश्य बघावा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 प्रसाद नातु,पुणे

 रेटिंग ****      

photo courtesy @hindustan times                         


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...