ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
Blog No.2023/2 28 Date:- 31 st , August 2023. मित्रांनो, आजच्या “आहार-विचार” मध्ये आपण “मेथी” या महत्वाच्या पालेभाजीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. आज गुरुवार, यापूर्वी आपण बटाटा,पालक आणि कांदा या तीन भाज्यांची तीन गुरुवारी माहिती करून घेतली होती. प्रास्ताविक Trigonella foenum-graecum अर्थात मेथी ही एक औषधी वनस्पती आहे.तिच्या खाद्य बिया आणि पानांसाठी मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मेथीचा पाक आणि औषधी वापराचा मोठा इतिहास आहे आणि मेथी मूळची भूमध्यसागरीय प्रदेश आणि दक्षिण आशियातील आहे.तिची पौष्टिक सामग्री , औषधी उपयोग आणि आरोग्य फायद्यांची माहिती येथे करून घेणार आहोत. मेथीचे घटक - *जीवनसत्त्वे*: मेथीमध्ये व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन बी 6 , व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के यासह विविध जीवनसत्त्वे असतात. - *प्रथिने*: मेथीचे दाणे प्रथिनांचे स्त्रोत आहेत , ज्यामध्ये लाइसिन आणि ट्रिप्टोफॅन सारख्या अमीनो ऍसिड असतात. मेथीच्या बियांमध्ये सुमारे 20-30% प्र...