ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
Blog No.2023/200 Date:- 31 st ,July 2023 keep going, the two words motivate you. मित्रांनो, या वर्षीचा म्हणजे 2023 चा 200 वा ब्लॉग पोस्ट करतांना मला अतिशय आनंद होत आहे. आनंद यासाठी इतक्या विविध ब्लॉग पोस्ट लिहिण्यासाठी खाद्य म्हणजे विषय मला मिळाले. माणसाला एखादे कार्य करण्यास मुख्यतः दोन गोष्टी प्रेरित करत असतात. पहिली म्हणजे पैसा आणि दुसरी म्हणजे प्रोत्साहन. "Motivation" पैसा एका विशिष्ट कालावधी करता प्रोत्साहन देऊ शकतो. प्रोत्साहन हे मनुष्याला अगदी मनुष्याच्या जीवनात जोपर्यंत कार्यरत राहिलो तरी कार्य करण्यास कामी येतं.मग नोकरीत असतांना एका टप्प्यावर हे माहित झालं होतं की आता कार्य करुन पैसा मिळणार नाही.पण प्रोत्साहनामुळे निवृत्तीपर्यन्त त...