Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

नव्या संसद इमारतीचे उदघाटन

 Blog No. 2023/132  

Date: 27th, May 2023.

 मित्रांनो,

            भारतात भारतीयांनी भारताच्या राजधानीत बांधलेले असे काय आहे?असा कोणी प्रश्न विचारला तर उत्तर सूप्रीम कोर्टची इमारत.जिथे इमारत नवी पण कायदे अधिकतम जुनेच (IPC 1860,Indian Contract Act 1872,Indian Partnership Act 1932, Negotiable Instrument Act 1881) आहेत.भारताची संसद, ब्रिटिशांनी बांधलेली, राष्ट्रपती भवन ब्रिटिशांनी बांधलेले,कुतुब मिनार,लाल किल्ला मुघलांनी बांधलेला.भारताचे लोकप्रतिनिधी जिथे बसतात.जिथून देशाचा कारभार चालतो.ती संसदेची नवी इमारत असावी,असे खूप आधी ठरले होते.पण त्या बद्दल निर्णय घेण्यात येऊन 10 डिसेंबर, 2020 ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाची पायाभरणी केली होती.

28 मे 2023 ला नव्या संसदेचे उदघाटन

          28 मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उदघाटन होणार आहे.जी 150 वर्षाच्या गुलाम गिरीचे सगळे अवशेष नष्ट करेल. राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधील काही वृत्तांनुसार संसदेच्या इमारतीचे नाव बदलले जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे, त्यामधे आपल्याला काही पडायचे नाही.मित्रांनो,तुम्ही थोडे जून चित्रपट आठवून पहा. हिरोने काही चांगलं करायचे ठरविले की प्राण,के.एन. सिंग,ललिता पवार वगैरे तत्सम मंडळी अपशकुन कसा करता येईल,यासाठी कामाला लागत.अगदी तसंच 20 विरोधी पक्ष या उदघाटन समारंभावर बहिष्कार टाकणार आहेत.कारण काय तर म्हणे राष्ट्रपतींना उदघाटन करू द्यायला पाहिजे.ह्याच सगळ्या पक्षांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला माननीय द्रौपदी मुर्मू उभ्या होत्या,तेव्हा त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभा केला होता.एक आदिवासी महिला बिनविरोध राष्ट्रपती निवडली जावी हे त्यांना त्या वेळेस सुचले नाही.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुणी तरी एक जण सूप्रीम कोर्टला जाऊन पोहोचला की तिथे जाऊन पाहू या.पण तिथे त्याची निराशा झाली.सूप्रीम कोर्ट केस दाखल करुन घ्यायला देखील नाही म्हणाले.असो.पुढे जाऊन भारतासाठी आणि भारतीयांसाठी भूषण ठरू पाहणाऱ्या या इमारतीच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित रहाण्याचे निमंत्रण त्यांना आहे,पण उपस्थित राहण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी नाही. असेच म्हणावे लागेल.     


कशी असेल भारताची नवी संसद

970 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन संसदेत व्हीआयपी, संसद सदस्य (खासदार) आणि पाहुण्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असतील. नवीन इमारतीला शक्ती द्वार, ज्ञान द्वार आणि कर्म द्वार असे तीन मुख्य दरवाजे आहेत.Tata Projects Limited द्वारे बांधण्यात आलेल्या, नवीन इमारतीमध्ये भारताचा लोकशाही वारसा प्रदर्शित करण्यासाठी एक भव्य संविधान हॉल, खासदारांसाठी एक विश्रामगृह, एक वाचनालय, अनेक समिती खोल्या, जेवणाचे क्षेत्र आणि पुरेशी पार्किंगची जागा असेल.

नवीन संसदेचे आकारमान

नवीन संसदेचे बिल्ट-अप क्षेत्र सुमारे 65000 चौरस मीटर आहे.सध्याच्या 552 जागांच्या तुलनेत लोकसभेत आता 888 सदस्य बसू शकतील, तर राज्यसभेत 384 जागा सामावून घेता येतील, जुन्या संसदेच्या तुलनेत राज्यसभेत 139 अधिक जागा असतील.संयुक्त सत्रादरम्यान, लोकसभेची आसन क्षमता १२७२ पर्यंत वाढवता येऊ शकते.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर

नवीन संसद भवनाच्या रचनेत कार्यकारिणीच्या कार्यात मदत करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही सभागृहांच्या आत, फर्निचरमध्ये मतदानाच्या सुलभतेसाठी स्मार्ट डिस्प्ले आणि बायोमेट्रिक्स आहेत. सदस्यांच्या जागा प्रोग्राम करण्यायोग्य मायक्रोफोन्स, डिजिटल भाषा व्याख्या आणि रेकॉर्डिंग पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहेत.नवीन संसदेची रचना किमान 150 वर्षे चालेल. पंतप्रधानांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवीन इमारत दर्जेदार बांधकामासह विक्रमी वेळेत बांधण्यात आली आहे.

सध्याच्या इमारतीने स्वतंत्र भारताची पहिली संसद म्हणून काम केले आणि संविधानाचा स्वीकार केला. मूलतः कौन्सिल हाऊस म्हटल्या जाणार्‍या या इमारतीत इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल होती. 1956 मध्ये अधिक जागेची मागणी पूर्ण करण्यासाठी संसद भवनात दोन मजले जोडण्यात आले.2006 मध्ये, भारताच्या 2,500 वर्षांच्या समृद्ध लोकशाही वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी संसद संग्रहालय जोडण्यात आले. अधिका-यांनी सांगितले की 96 वर्षे जुनी इमारत कधीही द्विसदनीय विधानमंडळ सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेली नव्हती आणि आसन व्यवस्था अरुंद आणि अवजड होती, दुसऱ्या रांगेच्या पलीकडे डेस्क नव्हते. लोकसभा आणि राज्यसभेने संसदेसाठी नवीन इमारत बांधण्याची सरकारला विनंती करणारे ठराव पारित केले होते.

सारांश

भारताच्या विद्यमान संसदेची इमारत दिल्ली येथे गेलो असतांना पहाण्याचा योग आला होता.(अर्थात दुरून) नवीन इमारत पहाण्याचा योग केव्हा येतो बघायचं.भारतीयांनी बांधलेली ही वास्तु निश्चित बघायला आवडेल,कारण त्यात आत्मीयता नक्कीच अधिक असणार,जर ब्रिटिशांनी बांधलेली संसद बघून हे आपल्या देशातील लोकशाहीचे मंदिर अशी भावना तेव्हा मनात आली होती.हे आपल्या सारख्या सर्वसामान्यांचे विचार.तर आता इथेच थांबतो.पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे.    

फोटो सौजन्य@ India Today अँड  India Times

Comments

  1. छान माहिती 👏🏼👍🏻

    ReplyDelete
  2. छान माहिती. खरचच अभिमान वाटावा असच काम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...