Blog No. 2023/132
Date: 27th, May 2023.
भारतात भारतीयांनी भारताच्या राजधानीत बांधलेले असे काय आहे?असा
कोणी प्रश्न विचारला तर उत्तर सूप्रीम कोर्टची इमारत.जिथे इमारत नवी पण कायदे अधिकतम
जुनेच (IPC 1860,Indian Contract Act 1872,Indian Partnership Act 1932, Negotiable Instrument Act 1881) आहेत.भारताची
संसद, ब्रिटिशांनी बांधलेली, राष्ट्रपती भवन ब्रिटिशांनी बांधलेले,कुतुब मिनार,लाल किल्ला मुघलांनी बांधलेला.भारताचे लोकप्रतिनिधी जिथे बसतात.जिथून
देशाचा कारभार चालतो.ती संसदेची नवी इमारत असावी,असे खूप आधी ठरले होते.पण त्या बद्दल
निर्णय घेण्यात येऊन 10 डिसेंबर, 2020 ला, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाची पायाभरणी केली होती.
28 मे 2023 ला नव्या संसदेचे उदघाटन
28 मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उदघाटन होणार आहे.जी 150 वर्षाच्या गुलाम गिरीचे सगळे अवशेष नष्ट करेल. राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधील काही वृत्तांनुसार संसदेच्या इमारतीचे नाव बदलले जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे, त्यामधे आपल्याला काही पडायचे नाही.मित्रांनो,तुम्ही थोडे जून चित्रपट आठवून पहा. हिरोने काही चांगलं करायचे ठरविले की प्राण,के.एन. सिंग,ललिता पवार वगैरे तत्सम मंडळी अपशकुन कसा करता येईल,यासाठी कामाला लागत.अगदी तसंच 20 विरोधी पक्ष या उदघाटन समारंभावर बहिष्कार टाकणार आहेत.कारण काय तर म्हणे राष्ट्रपतींना उदघाटन करू द्यायला पाहिजे.ह्याच सगळ्या पक्षांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला माननीय द्रौपदी मुर्मू उभ्या होत्या,तेव्हा त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभा केला होता.एक आदिवासी महिला बिनविरोध राष्ट्रपती निवडली जावी हे त्यांना त्या वेळेस सुचले नाही.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुणी तरी एक जण सूप्रीम कोर्टला जाऊन पोहोचला की तिथे जाऊन पाहू या.पण तिथे त्याची निराशा झाली.सूप्रीम कोर्ट केस दाखल करुन घ्यायला देखील नाही म्हणाले.असो.पुढे जाऊन भारतासाठी आणि भारतीयांसाठी भूषण ठरू पाहणाऱ्या या इमारतीच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित रहाण्याचे निमंत्रण त्यांना आहे,पण उपस्थित राहण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी नाही. असेच म्हणावे लागेल.
कशी असेल भारताची नवी संसद
970 कोटी
रुपये खर्चून बांधलेल्या नवीन संसदेत व्हीआयपी, संसद सदस्य
(खासदार) आणि पाहुण्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असतील. नवीन इमारतीला शक्ती
द्वार, ज्ञान द्वार आणि कर्म द्वार असे तीन मुख्य दरवाजे
आहेत.Tata Projects Limited द्वारे बांधण्यात आलेल्या,
नवीन इमारतीमध्ये भारताचा लोकशाही वारसा प्रदर्शित करण्यासाठी एक
भव्य संविधान हॉल, खासदारांसाठी एक विश्रामगृह, एक वाचनालय, अनेक समिती खोल्या, जेवणाचे क्षेत्र आणि पुरेशी पार्किंगची जागा असेल.
नवीन संसदेचे आकारमान
नवीन संसदेचे
बिल्ट-अप क्षेत्र सुमारे 65000
चौरस मीटर आहे.सध्याच्या 552
जागांच्या तुलनेत लोकसभेत आता 888
सदस्य बसू शकतील,
तर राज्यसभेत 384
जागा सामावून घेता येतील,
जुन्या संसदेच्या तुलनेत राज्यसभेत 139
अधिक जागा असतील.संयुक्त सत्रादरम्यान,
लोकसभेची आसन क्षमता १२७२ पर्यंत वाढवता येऊ शकते.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर
नवीन संसद
भवनाच्या रचनेत कार्यकारिणीच्या कार्यात मदत करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा
समावेश करण्यात आला आहे. दोन्ही सभागृहांच्या आत, फर्निचरमध्ये
मतदानाच्या सुलभतेसाठी स्मार्ट डिस्प्ले आणि बायोमेट्रिक्स आहेत. सदस्यांच्या जागा
प्रोग्राम करण्यायोग्य मायक्रोफोन्स, डिजिटल भाषा व्याख्या
आणि रेकॉर्डिंग पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहेत.नवीन संसदेची रचना किमान 150 वर्षे
चालेल. पंतप्रधानांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवीन इमारत दर्जेदार बांधकामासह
विक्रमी वेळेत बांधण्यात आली आहे.
सध्याच्या इमारतीने स्वतंत्र भारताची पहिली संसद म्हणून काम केले आणि संविधानाचा स्वीकार केला. मूलतः कौन्सिल हाऊस म्हटल्या जाणार्या या इमारतीत इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल होती. 1956 मध्ये अधिक जागेची मागणी पूर्ण करण्यासाठी संसद भवनात दोन मजले जोडण्यात आले.2006 मध्ये, भारताच्या 2,500 वर्षांच्या समृद्ध लोकशाही वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी संसद संग्रहालय जोडण्यात आले. अधिका-यांनी सांगितले की 96 वर्षे जुनी इमारत कधीही द्विसदनीय विधानमंडळ सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेली नव्हती आणि आसन व्यवस्था अरुंद आणि अवजड होती, दुसऱ्या रांगेच्या पलीकडे डेस्क नव्हते. लोकसभा आणि राज्यसभेने संसदेसाठी नवीन इमारत बांधण्याची सरकारला विनंती करणारे ठराव पारित केले होते.
सारांश
भारताच्या विद्यमान संसदेची इमारत दिल्ली येथे गेलो असतांना पहाण्याचा योग आला होता.(अर्थात दुरून) नवीन इमारत पहाण्याचा योग केव्हा येतो बघायचं.भारतीयांनी बांधलेली ही वास्तु निश्चित बघायला आवडेल,कारण त्यात आत्मीयता नक्कीच अधिक असणार,जर ब्रिटिशांनी बांधलेली संसद बघून हे आपल्या देशातील लोकशाहीचे मंदिर अशी भावना तेव्हा मनात आली होती.हे आपल्या सारख्या सर्वसामान्यांचे विचार.तर आता इथेच थांबतो.पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु,पुणे.
फोटो सौजन्य@ India Today अँड India Times


Chan blog
ReplyDelete🙏
ReplyDeleteछान माहिती 👏🏼👍🏻
ReplyDeleteछान माहिती. खरचच अभिमान वाटावा असच काम
ReplyDelete