Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

सक्षम आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांची कपात

 Blog No. 2023/24 

Date,30th,  January 2023 . 

मित्रांनो, 

            परदेशांत आलेली मंदी आणि मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आलेली नोकरी कपात.ह्याच्या वार्ता आजकाल मोठ्या प्रमाणात ऐकायला येत असतांना एक गोष्ट काळजी लावणारी आहे. ती म्हणजे ही कपात करतांना एखादा कर्मचारी सक्षम आणि निष्ठावंत आहे.त्याला ही नोकरीतून कमी केले जात आहे.भारतात मंदी नाही आणि भारतात अशी परिस्थिति नसली तरी, परदेशातील घडणाऱ्या गोष्टींचे अंधानुकरण करीत,ते जे करीत असतात,त्या मागे काही उदात्त हेतु आहे.असे मानणाऱ्यांची खुळचट लोकांची संख्या आपल्या देशात कमी नाही.म्हणून काळजी वाटते.  

 Experience Quotient (EQ) देखिल महत्वाचा          

वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांच्या जागी तेवढ्या पगारात 2 ते 3 नवीन कर्मचारी ठेवता येतील,अशी ही कृती देखिल अशीच बिनडोक पणाची आहे. कारण intelligent quotient (IQ ) सोबत तेवढाच Experience Quotient (EQ) देखिल महत्वाचा आहे.विशेषतः जिथे decision making चा प्रश्न आहे. तिथे वरिष्ठ कर्मचारी असणे गरजेचे आहे.कारण त्यांच्या पाठीशी अनुभवाची शिदोरी असते.ती महत्वाची असते.

 सक्षम आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांवर होणारे दुष्परिणाम

            तर गोष्ट आहे सक्षम आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची.आधीच नव्या जगांत निष्ठा नावाची चीज फारशी कुठे उरली नाही.अशात कर्मचारी एखादी संस्था आपली मानून तिच्यावर निष्ठा ठेऊन काम करीत असेल.तर त्याच्यात कंपनी/संस्थे प्रति एक समर्पणाची वृत्ती म्हणा भावना म्हणा जागृत होते.अशा वेळेस त्या कर्मचाऱ्यास कंपनीने त्याला,जे कर्मचारी कार्यक्षम आणि निष्ठावान नाहीत,अशा लोकांसोबत कंपनीतून कमी केले तर त्याच्यावर निश्चितपणे परिणाम होईल.त्याच्यावर होणाऱ्या परिणामांची यादी खाली प्रमाणे:-

1.त्या कर्मचाऱ्याच्या मनात नैराश्याच्या भावनेचा उदय.

2.नवीन कंपनीत तो कर्मचारी अलिप्तपणे काम करेल.आपली कंपनी समजून काम करणार नाही.

3.तो स्वतःहून कुठलेही काम न करता do as directed किंवा सांगकाम्या सारखा काम करेल. अर्थात जे काम सांगितले जाईल तेवढे काम करेल.

4. नवीन कंपनीत जास्तीची मेहेनत घेऊन कुठलेही काम करणार नाही.

5.त्याच्यातील झोकून देऊन काम करण्याची वृत्ती लोप पावेल.

6.ही कंपनी देखिल आपल्याला कमी करणार नाही ना असा एक विचार नेहमी त्याच्या मनात घोळत राहील ज्याचा परिणाम त्याच्या कार्यक्षमतेवर होईल.

7. कमजोर मनाचा व्यक्ती मानसिक रोगाला देखिल बळी पडू शकतो.

8. काम न करण्याची वृत्ती/भावना इतर कर्मचाऱ्यांमध्ये बळावत जाईल.

9.ह्याचा एकत्रित परिणाम म्हणजे हळूहळू समर्पण वृत्ती आणि निष्ठा लोप पावेल.

 खासगीकरणाला होणाऱ्या विरोधाचे कारण

मी ह्या गोष्टीचा संबंध राष्ट्रीयकृत बँका म्हणा इतर वित्तीय संस्था जसे एलआयसी, जनरल इन्शुरेंस क्षेत्रातील   खासगीकरणाशी जोडू पहातो. खासगीकरणाला विरोध हा प्रामुख्याने जॉब सेक्युर्टी राहील की नाही ह्या विचाराने अधिक होत आहे. कुठल्याही क्षेत्रात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, समर्पणाची भावना ही जॉब सेक्युर्टी असेल तरच असते अशी धारणा ह्या क्षेत्रातील कर्मचाऱ्याची असेल तर त्यात चूक काही म्हणता येणार नाही.पण जर आपली काम न करण्याची वृत्ती सरकारी कंपनीत जोपासली जात असते म्हणून जर खासगीकरणाला विरोध असेल,  तर ते मात्र चुकीचे आहे.

एकंदरीत काय तर सक्षम आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना असू नये आणि काम न करणाऱ्याला काही शिक्षा नाही असा विचार असू नये.ह्याचा विचार मॅनेजमेंट विशेषतः एच.आर. विभाग ह्यांनी करायला हवा. हेच खरे.


प्रसाद नातु,पुणे.

 

                                                                                                         

Comments

  1. मी कॉर्पोरेट दिंडी या पुस्तकात याचा उहापोह केला आहे आणि उपाय सुचविला आहे.

    ReplyDelete
  2. ज्वलंत प्रश्न आहे

    ReplyDelete
  3. Very Nicely Explained Raja !

    ReplyDelete

Post a Comment