Skip to main content

Posts

Showing posts from December, 2022

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

पुस्तके आणि पुरस्कार

  मित्रांनो                                       आज एका वेगळ्या विषयावर मी हा ब्लॉग लिहीत आहे. माझी आज पर्यन्त एकूण 8 पुस्तके प्रकाशित झाली. सहा कथासंग्रह आणि दोन कादंबऱ्या. दृश्य-अदृश्य, सुनयना, होस्ट इज घोस्ट, चित्र आणि चेहरा, कथास्टक आणि मिली हे सहा कथासंग्रह आणि राणी तेजस्विनी व सहप्रवासी ह्या दोन कादंबऱ्या. त्या निमित्ताने पुस्तके आणि पुरस्कार ह्यांचा खूप जवळून संबंध आला आणि पुस्तकांना मिळणारे पुरस्कार किती अनमोल (?) असतात, ते पहिल्यांदाच कळून आले. ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, युवा पुरस्कार, सरस्वती सन्मान, क्रॉसवर्ड बुक्स अवॉर्ड इत्यादि सारखे सन्माननीय अपवाद वगळूया.             मी एकदा फेसबूक पहात बसलो होतो.वाचनात आले,“इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर सेल्फ पब्लिशिंग ऑथर्स”, आपले नामांकन आताच सादर ( submit ) करा. मी त्यात दिलेला फॉर्म भरायला सुरुवात केली.नावं,गावं, मोबाईल नंबर,ईमेल आयडी,मग ज्या पुस्तकासाठी न...

अजूनही माणुसकी जीवंत आहे.

मित्रांनो,             कधी कधी मनुष्य छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही शिकून जातो आणि कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी मनुष्याला स्वतःला कठोर म्हणणाऱ्या माणसाला भावनिक बनवितात. सध्या मी विदर्भात आलोय. खरं तर हा विदर्भ दौरा मी सेवानिवृत्ती नंतर यावे अशा इराद्याने ठरविला होता. पण त्या वेळी कोरोंनाने थैमान घातले आणि man proposes and god disposes चा अनुभव घेतला.आता जवळपास पावणे तीन वर्षानंतर तो दौरा प्रत्यक्षात उतरला.कदाचित समृद्धी महामार्गाची वाट पहात असेल. समृद्धी महामार्गाने खरोखर नागपूर जवळ आल्याचे जाणवले.अवघ्या 9 तासात,त्यातले साडेचार तास पुणे औरंगाबादला लागले, नागपूरला पोहोचलो.  अमरावतीस मित्राच्या मुलाच्या लग्नाला               18 ला माझ्या एक घनिष्ठ मित्राच्या मुलाचे लग्न अमरावतीला होते. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग नंबर 6 ने अल्पावधीत अमरावतीस पोहोचलो. माझ्या नोकरीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील मित्रांच्या भेटीने जुन्या आठवणी जागवल्या. “गेले ते दिन गेले’ हे गाणे ओठ...

पुस्तक परिचय :- न्यू पाथ फाइंडर

  पुस्तकाचे नांव:- न्यू पाथ फाइंडर लेखक :- श्री. गौतम कोतवाल             प्रकाशक:- ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन  परिचयकर्ता:- प्रसाद नातु, पुणे.    मूल्य:- 280      पृष्ठ संख्या:- 303           आज  पुस्तक प्रेमी समूहातील  गौतम कोतवाल ह्यांच्या पुस्तकाचा मी परिचय करून देत आहे. 29 ऑगस्ट 2021 ला  दाखल झालेले गौतम सर एक प्रथितयश बँकर आणि लेखक आहेत.        नुकताच श्री. गौतम कोतवाल यांच्याशी ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन आणि कॉसमॉस सहकारी बँकेच्या विद्यमाने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी भेट झाली.ह्या कार्यक्रमात श्री. कोतवाल ह्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांना चाळता आले. “न्यू पाथ फाइंडर” हे पुस्तक माझ्या नजरेस आले. सहज कुतुहुल म्हणून मी चाळले आणि मनांत आलं ह्या पुस्तकाचा परिचय फेसबुक वर करून द्यावा.        ह्या पुस्तकांस डॉ. विठ्ठल जाधव,माजी पोलिस संचालक ह्यांची प्रस्थाव...

चला ई-बुक वाचू या

 Blog No.2023/320 Date:-29th, December,2023. मित्रांनो,             सकाळी सकाळी मनांत आलं,आज जरा वेगळ्या विषयाकडे तुम्हाला घेऊन जायचे. शहरात प्रामुख्याने भेडसावणारी समस्या,रहायला मनाप्रमाणे घर मिळणे.घर म्हणजे पूर्वी ज्याला घर म्हणत असतं,ते स्वतःचे वेगळे असे घर ही कल्पना शहरात तरी दुर्मिळ आणि महाग झालेली आहे.आता घर म्हणजे वन, टू किंवा थ्री बीएचके फ्लॅट.त्यात दर काही महिन्यांनी वाढत जाणारा टी.व्ही.चा आकार,आजकाल एकमेकांच्या घरी सहकुटुंब गप्पा मारायला जाणे वगैरे प्रकार, दुर्मिळ होत चालला असला,तरी कुणी आलंच तर बसायला म्हणून घेतलेले मोठमोठाले सोफे.कितीही मोठा फ्लॅट घेतला तरी जागा पुरेशी पडत नाही,ही समस्या. भिंतीतील कपाटे ही कल्पना देखिल दुर्मिळ होत चालली.आधी कमीतकमी दोन विटांच्या भीती असतं,आता एका विटेची भिंत,त्यामुळे भिंतीतली कपाटे बघायला मिळतं नाहीत.             आज काल कुणी पुस्तकं वाचत नाही,अशी ओरड असते.पण वास्तविकता तशी नाही, लोक वाचतात. जिथे शक्य आहे तिथे लायब्ररी लावून ...