Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

शाबासकी

Blog No.2022/
Date 22-07-2020

मित्रांनो,  


बॅकेच्या नोकरीच्या निमित्ताने बराच फिरलो. प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगळा होता. चंद्रपुर जिल्हातील राजुरा तालुक्यांत राजुरा या शहरापासून 13 कि मी अंतरावर विहीरगांव येथे बॅकेची शाखा होती. 25 सप्टेंबर 1999 ला मी  राजुरा येथून विहीरगांवला जाॅईन होण्यासाठी आपली राजदुत मोटार सायकल घेऊन निघालो. रस्ता बघितलेला नव्हता पण कुठून जायचं एवढं फक्त माहित होत. रस्त्यात आधी रेल्वे क्राॅसिंग लागलं. गेट बंद असल्यामुळे थोडं थांबाव लागलं. मग 2 कि मी. वर   एक गांव लागलं. सातरी अन् त्यानंतर उजव्या हाताला जंगल सुरू झालं. मग चनाखा नांवाचं गाव लागल. जंगल एका बाजूला चालूच होत. मी खरं तर जाम घाबरलो होतो. रोज सकाळी या रोडने जायच विशेष टेंशन नव्हत. पण संध्याकाळी याच रस्त्याने परत यायचं म्हणजे कठीण काम. जंगलातून बसमध्ये बसून गेलेलो पण त्यात रिस्क अशी काही नव्हती. पण मोटार सायकल वर एकट्याने फर्स्ट टाईम . मग जंगल संपलं. उजव्या हाताला शाळा लागली. बहुतेक हायस्कूल असावी. पुढे चौकात येऊन पोहोचलो. बॅक कुठेच दिसली नाही.  चौकात एकाला विचारलं. तो म्हणाला " खुप पुढे आलात साहेब. ब्रॅच मॅनेजर आहात ?. चला मी दाखवतो बॅक   "असं म्हणत तो मला न विचारता गाडीवर पाठीमागे बसला. आधी मला थोडा राग आला. पण थोडा विचार केल्यावर छान वाटलं. शहरांत केवळ हात वारे दाखवून आणखी कन्फ्यूज    करणर्या पेक्षा हे किती छान. हा विचार करत होतो. तेवढ्यांत उजव्या हाताला वळा सर अशा त्याच्या बोलण्याने  तंद्रीतून   भानावर आलो. आत एका मध्यम आकाराच्या खोलीत बॅक होती. मला पहाताच मॅनेजर "आईये साहाब" असे म्हणत बाहेर आले. 10 वर्ष जुनी शाखा होती ती. बिल्डींग कसली जागा म्हणायला हवं. ग्राम पंचायत च्या मालकिची जागा  होती.शाखा लहान होती आणि ही गोष्ट 21 वर्षापुरवी ची. त्यामळे त्या शाखेमध्ये ब्रॅन्च   मॅनेजर, कॅशियर , एक शिपाई आणि एक स्वीपर एवढाच स्टाफ होता . मॅनेजरने त्या तिघांची ओळख करून दिली.  तशी ओळख सगळ्यांशी होती  कारण स्वीपर सोडला तर बाकी तिघेही राजुर्यास रहायचे. 
हळूहळू  सगळं अंगवळणी पडलं. कॅशियर रोज माझ्या सोबतच  यायचा आणि जायचा. त्यावेळी चंद्रपुर जिल्ह्यात एम आर सी पी हा प्रोजेक्ट राबविला जात होता. यांत प्रत्येक गावात एक ग्राम समितीची,  नाबार्ड च्या मदतीने स्थापना केली होती. ही सर्वथा अराजकिय समिती होती. त्यामुळे सगळ्याच गावात मी ओळखीचा झालो. मग कुठल्याही गांवात कुठलाही कार्यक्रम असला की मी एक तर उदघाटक, प्रमुख पाहुणा किंवा अध्यक्ष असायचो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी वगळता बाकी सगळेच कार्यक्रम बहुधा रात्री असायचे. 
असेच एकदा कोहपरा या गांवचे सरपंच आणि इतर नागरिक मला बॅकेत भेटायला आले. विदर्भात राष्ट्रसंत तुकडोची महाराजांमुळे खंजेरी भजन खुप प्रसिध्द आहे. खंजेरी भजन स्पर्धेचे विदर्भ स्तरीय आयोजन केल जाते. तशा विदर्भ स्तरीय स्पर्धेचे आयोजन करायचे असा कोहपरा गांव वासीयांचा मानस असल्याचे व मला उदघाटक म्हणून आमंत्रित करायला ते आले असल्याचे त्यांनी सांगितले . शनिवारी रात्री 10 वाजता येण्याचे त्यानी आमंत्रण दिले आणि मी ते संगीतासंवंधित कार्यक्रम असल्याने आनंदाने स्वीकारले. कारण अमरावतीला राहिल्याने आणि मोझरी येथे महाराजांचा आश्रम होता ते अमरावती पासून केवळ 30 कि मी वर असल्याने खंजेरी भजनाविषयी आकर्षण होते.
तेव्हा शनिवारी हाफ डे असायचा. मी घरी येतांना मिसे सरांकडे डोकावलो आणि कार्यक्रमाला चलण्याबध्दल विचारले . ते लगेच तयार झाले. 
शनिवारी रात्री 9.00 च्या सुमारास आम्ही दोघे माझ्या कारने निघालो. 15 -16 कि मी अंतर होते आणि तो महामार्ग ही नव्हता. त्यामुळे अर्ध्या तासांत आम्ही कोहोपरा येथे जाऊन पोहोचलो. सरपंचानी आमचे स्वागत केले. कार्यक्रमाला वेळ असल्याने ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  आजूबाजूला जंगल असल्याने तिथे  जे फाॅरेस्ट ऑफिसर होते त्यांना आमंत्रित केले होते. आम्ही बोलत असतांना एक फाॅरेस्ट गार्ड सरपंचाना भेटायला आला. सरपंच दारापाशी गेले. फाॅरेस्ट ऑफिसरना अर्जंट काम असल्याने ते येऊ शकत नसल्याचा निरोप त्याने दिला. सरपंच आत येऊन  मोठ्या  काळजीत  म्हणाले की साहेब येणार नाहीत . मग एकाने मिसे साहेब अध्यक्ष पद स्वीकारतील का अशी विनंती केली आणि आयत्या    वेळी प्रस्ताव ठेवत असल्याबध्दल खेद व्यक्त केला. मिसे साहेब एक दर्दी व्यक्ती आणि राष्ट्रसंत  तुकडोजी महाराजांबध्दल नितांत आदर असल्याने त्यांनी विनंती आनंदाने स्विकारली. 5 मिनीटातच कार्यक्रम स्थळी येण्याब्दल निरोप आला. आम्ही पोहोचताच कार्यक्रम सुरू झाला. आलेल्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाले. मग उदघाटन झाले याची विधिवत घोषणा करण्यासाठी माझ्या हाती माईक सोपवला गेला.आधीच वेळ झाला असल्याने   मी मनोगत थोडक्यांत आटोपून उदघाटन झाल्याची घोषणा केली. नंतर बरीच भाषण झाली. शेवटी अध्यक्षीय भाषणासाठी मिसे साहेबांना आमंत्रित केले. मी स्वतः गातो हे मिसे साहेबांना माहित होते. त्यांनी भाषणाची सुरूवात करतांना म्हटले की या कार्यक्रमाचे उदघाटक नातू साहेब असल्याने कार्यक्रमाचे उदघाटन एखादे छान भजन गाऊन करतील. असं मला वाटल होत.  .तुम्हाला माहित नसेल कदाचित पण तुमचे साहेब चांगले गातात. एवढे म्हणायचा अवकाश की मिसे साहेबांचे भाषण संपताच एखादे भजन म्हणण्याची विनंती करण्यांत आली  .गावकर्याचे प्रेम आणि आग्रहापुढे माझी तयारी नाही वगैरे काही सबब चालली नाही. आधी माझे माहेर पंढरी,  मोगरा फुलला अशा फर्माईश आल्या , मला गावचं लागलं .मग अनुज जलोटाचे एखादे भजन म्हणा तेव्हा ऐसी  लागी लागन म्हटलं. स्पर्धक ताटकळेले बघून मी लोकांना म्हटलं की स्पर्धक उत्सुकतेने वाट पहात आहेत. स्पर्धा सुरू होण्याची, त्यांच्या मनांत या क्षणाला जी भावना असेल म्हणजे  नको देवराया  अंत असा पाहू ते म्हणून संपवितो अस म्हणत  आवरतं घेतलं. कार्यक्रम रात्रभर चालू रहाणार असल्याने 12 च्या सुमारास आम्हाला निघायची  परवानगी  दिली. 
सोमवारी बॅकेत गेलो. दुपारच्या सुमारास एक आजी बाई बॅकेत आल्या. मॅनेजरना भेटायचय म्हणाल्या शिपायाने माझ्या समोर आणून सोडले. मी आजीबाईंच्या द्रृष्टीने लहानच होतो. तुच भजन म्हटलसं काल. मी होकार दिला. खुप छान गातोस. कान तृप्त झाले. कर्ज वसुली करणारा मॅनेजर गाणं ही म्हणू शकतो अस वाटल नव्हतं कधी. असाच एकदा कार्यक्रम कर. आशिर्वाद आहेत माझे तुला. मी ही माऊलीला वाकून नमस्कार केला. मला मिळालेली ही निर्व्याज शाबासकी मी कधीच विसरू शकणार नाही.

 
 

 



Comments

  1. Nicely written. Aajibayeen kadun मिळालेल्या shabaski ne tumhala khup satisfaction milale asel. Such incidences remains in our forever. Definitely special.

    ReplyDelete
  2. सर, खूप छान अनुभव सांगितले आहेत आपण. आपले अनुभव वाचताना मला माझ्या डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेल्या राधानगरी शाखेतील दिवसांची आठवण आली. आपण स्पर्धेच्या सुरुवातीला गायलेली भजने आणि आजीबाईंनी शाखेत येऊन दिलेल्या आशीर्वादाबद्दलची सांगितलेलीआठवण खूप हृद्य आहे. सर, आपण खूप छान लिहिता, आपणाकडे आठवणींचा खजिना आहे, लिहीत रहा. Please keep it up.

    ReplyDelete

Post a Comment