ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025. मित्रांनो, डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...
Blog No.2022/
Date 22-07-2020
मित्रांनो,
हळूहळू सगळं अंगवळणी पडलं. कॅशियर रोज माझ्या सोबतच यायचा आणि जायचा. त्यावेळी चंद्रपुर जिल्ह्यात एम आर सी पी हा प्रोजेक्ट राबविला जात होता. यांत प्रत्येक गावात एक ग्राम समितीची, नाबार्ड च्या मदतीने स्थापना केली होती. ही सर्वथा अराजकिय समिती होती. त्यामुळे सगळ्याच गावात मी ओळखीचा झालो. मग कुठल्याही गांवात कुठलाही कार्यक्रम असला की मी एक तर उदघाटक, प्रमुख पाहुणा किंवा अध्यक्ष असायचो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी वगळता बाकी सगळेच कार्यक्रम बहुधा रात्री असायचे.
असेच एकदा कोहपरा या गांवचे सरपंच आणि इतर नागरिक मला बॅकेत भेटायला आले. विदर्भात राष्ट्रसंत तुकडोची महाराजांमुळे खंजेरी भजन खुप प्रसिध्द आहे. खंजेरी भजन स्पर्धेचे विदर्भ स्तरीय आयोजन केल जाते. तशा विदर्भ स्तरीय स्पर्धेचे आयोजन करायचे असा कोहपरा गांव वासीयांचा मानस असल्याचे व मला उदघाटक म्हणून आमंत्रित करायला ते आले असल्याचे त्यांनी सांगितले . शनिवारी रात्री 10 वाजता येण्याचे त्यानी आमंत्रण दिले आणि मी ते संगीतासंवंधित कार्यक्रम असल्याने आनंदाने स्वीकारले. कारण अमरावतीला राहिल्याने आणि मोझरी येथे महाराजांचा आश्रम होता ते अमरावती पासून केवळ 30 कि मी वर असल्याने खंजेरी भजनाविषयी आकर्षण होते.
तेव्हा शनिवारी हाफ डे असायचा. मी घरी येतांना मिसे सरांकडे डोकावलो आणि कार्यक्रमाला चलण्याबध्दल विचारले . ते लगेच तयार झाले.
शनिवारी रात्री 9.00 च्या सुमारास आम्ही दोघे माझ्या कारने निघालो. 15 -16 कि मी अंतर होते आणि तो महामार्ग ही नव्हता. त्यामुळे अर्ध्या तासांत आम्ही कोहोपरा येथे जाऊन पोहोचलो. सरपंचानी आमचे स्वागत केले. कार्यक्रमाला वेळ असल्याने ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आजूबाजूला जंगल असल्याने तिथे जे फाॅरेस्ट ऑफिसर होते त्यांना आमंत्रित केले होते. आम्ही बोलत असतांना एक फाॅरेस्ट गार्ड सरपंचाना भेटायला आला. सरपंच दारापाशी गेले. फाॅरेस्ट ऑफिसरना अर्जंट काम असल्याने ते येऊ शकत नसल्याचा निरोप त्याने दिला. सरपंच आत येऊन मोठ्या काळजीत म्हणाले की साहेब येणार नाहीत . मग एकाने मिसे साहेब अध्यक्ष पद स्वीकारतील का अशी विनंती केली आणि आयत्या वेळी प्रस्ताव ठेवत असल्याबध्दल खेद व्यक्त केला. मिसे साहेब एक दर्दी व्यक्ती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबध्दल नितांत आदर असल्याने त्यांनी विनंती आनंदाने स्विकारली. 5 मिनीटातच कार्यक्रम स्थळी येण्याब्दल निरोप आला. आम्ही पोहोचताच कार्यक्रम सुरू झाला. आलेल्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाले. मग उदघाटन झाले याची विधिवत घोषणा करण्यासाठी माझ्या हाती माईक सोपवला गेला.आधीच वेळ झाला असल्याने मी मनोगत थोडक्यांत आटोपून उदघाटन झाल्याची घोषणा केली. नंतर बरीच भाषण झाली. शेवटी अध्यक्षीय भाषणासाठी मिसे साहेबांना आमंत्रित केले. मी स्वतः गातो हे मिसे साहेबांना माहित होते. त्यांनी भाषणाची सुरूवात करतांना म्हटले की या कार्यक्रमाचे उदघाटक नातू साहेब असल्याने कार्यक्रमाचे उदघाटन एखादे छान भजन गाऊन करतील. असं मला वाटल होत. .तुम्हाला माहित नसेल कदाचित पण तुमचे साहेब चांगले गातात. एवढे म्हणायचा अवकाश की मिसे साहेबांचे भाषण संपताच एखादे भजन म्हणण्याची विनंती करण्यांत आली .गावकर्याचे प्रेम आणि आग्रहापुढे माझी तयारी नाही वगैरे काही सबब चालली नाही. आधी माझे माहेर पंढरी, मोगरा फुलला अशा फर्माईश आल्या , मला गावचं लागलं .मग अनुज जलोटाचे एखादे भजन म्हणा तेव्हा ऐसी लागी लागन म्हटलं. स्पर्धक ताटकळेले बघून मी लोकांना म्हटलं की स्पर्धक उत्सुकतेने वाट पहात आहेत. स्पर्धा सुरू होण्याची, त्यांच्या मनांत या क्षणाला जी भावना असेल म्हणजे नको देवराया अंत असा पाहू ते म्हणून संपवितो अस म्हणत आवरतं घेतलं. कार्यक्रम रात्रभर चालू रहाणार असल्याने 12 च्या सुमारास आम्हाला निघायची परवानगी दिली.
सोमवारी बॅकेत गेलो. दुपारच्या सुमारास एक आजी बाई बॅकेत आल्या. मॅनेजरना भेटायचय म्हणाल्या शिपायाने माझ्या समोर आणून सोडले. मी आजीबाईंच्या द्रृष्टीने लहानच होतो. तुच भजन म्हटलसं काल. मी होकार दिला. खुप छान गातोस. कान तृप्त झाले. कर्ज वसुली करणारा मॅनेजर गाणं ही म्हणू शकतो अस वाटल नव्हतं कधी. असाच एकदा कार्यक्रम कर. आशिर्वाद आहेत माझे तुला. मी ही माऊलीला वाकून नमस्कार केला. मला मिळालेली ही निर्व्याज शाबासकी मी कधीच विसरू शकणार नाही.
Nicely written. Aajibayeen kadun मिळालेल्या shabaski ne tumhala khup satisfaction milale asel. Such incidences remains in our forever. Definitely special.
ReplyDeleteसर, खूप छान अनुभव सांगितले आहेत आपण. आपले अनुभव वाचताना मला माझ्या डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेल्या राधानगरी शाखेतील दिवसांची आठवण आली. आपण स्पर्धेच्या सुरुवातीला गायलेली भजने आणि आजीबाईंनी शाखेत येऊन दिलेल्या आशीर्वादाबद्दलची सांगितलेलीआठवण खूप हृद्य आहे. सर, आपण खूप छान लिहिता, आपणाकडे आठवणींचा खजिना आहे, लिहीत रहा. Please keep it up.
ReplyDelete