ब्लाॅग नं.2026/183. दिनांकः 2 जुलाई, 2026. मित्रांनो , झोपेत तोंडातून लाळ का गळते ? 99% लोकांना माहीत नसलेली ही 5 कारणे आणि आरोग्य संकेत आपण आज जाणून घेणार आहोत.सकाळी उठल्यावर उशीवर लाळेचे सुकलेले डाग दिसणे ही अनेकांसाठी अत्यंत सामान्य गोष्ट असते. आपल्यापैकी बहुतेकांनी कधी ना कधी हा अनुभव घेतला असेल.अनेकदा आपण याकडे एक क्षुल्लक गोष्ट किंवा वाईट सवय म्हणून दुर्लक्ष करतो , तर कधी मित्रांमध्ये किंवा कुटुंबात याची थट्टा उडवून विषय सोडून देतो. परंतु , आरोग्य तज्ज्ञांच्या मते , जर तुमच्यासोबत असं रोज घडत असेल , तर मात्र सावध होण्याची गरज आहे. ही केवळ एक साधी सवय नसून , तुमच्या शरीरात दडलेल्या एखाद्या मोठ्या आजाराचा पूर्वसंकेत असू शकतो.चला तर मग आजच्या या ब्लॉगमध्ये जाणून घेऊया की , झोपेत लाळ का गळते , त्याची मुख्य कारणे कोणती आणि कोणत्या परिस्थितीत डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. सविस्तरः शरीरासाठी लाळ का महत्त्वाची आहे ? सर्वात आधी हे समजून घेणे गरजेचे आहे की , लाळ आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार , आपल्या तोंडात असणाऱ्या लाळ ग्रंथींमधून ( Salivary...
ब्लॉग नं. 2026/1 76. दिनांक: 25 जून, 2026. मित्रांनो , मधुमेहींसाठी वरदान ठरू शकतो ' तीळ ': हृदयविकाराचा धोका कमी करण्यास कशी होते मदत ? आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा आणि आपण अनेक पदार्थांमध्ये आवडीने वापरणारा घटक म्हणजे तीळ . पण तुम्हाला माहित आहे का ? हे छोटेसे तीळ केवळ जेवणाची चव वाढवत नाहीत , तर विशेषतः मधुमेह ( Diabetes) असलेल्या व्यक्तींसाठी,ते आरोग्याचा एक मोठा खजिना आहेत.एका नवीन संशोधनातून समोर आले आहे की , तिळाचे नियमित सेवन केल्यास,मधुमेहामुळे होणाऱ्या हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. चला तर आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊया , ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या अहवालानुसार तिळाचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत. सविस्तर: मधुमेह आणि हृदयविकाराचा संबंध काय ? जागतिक स्तरावर हृदयविकार हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण मानले जाते.मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हा धोका अधिक असतो , कारण रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे रक्तावाहिन्यांचे हळूहळू नुकसान होते. मधुमेह शरीरात: · एलडीएल ( LDL) म्हणजेच ' वाईट ' कोले...