ब्लॉग नं. 2026/145 अ दिनांक: 25 मे, 2026 मित्रांनो, आज एक बातमी वाचनात आली की, देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिजर्व बँक ऑफ इंडियाने,भारत सरकारला रु. 2.86 लाख कोटीचा लाभांश, ट्रान्सफर केला. 2014 ला एनडीएचे सरकार सत्तेत आल्यापासून, या ट्रान्सफरची माहिती व्हायला सुरुवात झाली. 1979 बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर Nationalised Bank नी देखिल, दर वर्षी लाभांश भारत सरकारला ट्रान्सफर केला.यांत गैर असं काही नव्हतं.कारण या बँकांची पूर्ण मालकी भारत सरकारची झाली होती.आणि लाभांशाच्या व्याख्येनुसार हा लाभांश,दर वर्षी भारत सरकारला ट्रान्सफर करण्यात येतो.यासाठी लाभांश या शब्दाची व्याख्या पाहू. " कोणत्याही कंपनीला किंवा संस्थेला वर्षभरात झालेल्या एकूण निव्वळ नफ्यापैकी ( Net Profit) जो हिस्सा ती आपल्या भागधारकांना ( Shareholders) किंवा मालकांना वाटप करते , त्याला ' लाभांश ' किंवा ' डिविडेंड ' असे म्हणतात." रिजर्व बँकेतील भागधारक कोण? 100% भारत सरकार.त्यामुळे रिजर्व बँके...
ब्लॉग नं. 2026/142. दिनांक: 22 मे, 2026. मित्रांनो, उपवास: आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेली प्राचीन ' डिटॉक्स ' पद्धत हजारो वर्षांपासून विविध संस्कृतींमध्ये उपवास पाळला जातो.पूर्वी याला धार्मिक अधिष्ठान होते , पण आता जगभरातील शास्त्रज्ञ , याला ' डिटॉक्स हॅक ' (Detox Hack) म्हणून पाहत आहेत.पण नक्की उपवास केल्याने शरीरात काय बदल होतात ? विज्ञानाचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे ? आजच्या ब्लॉगमधून सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर: 1 . ऑटोफॅगी ( Autophagy): शरीराची स्वतःची स्वच्छता मोहीम : उपवासाचा सर्वात मोठा वैज्ञानिक फायदा म्हणजे ' ऑटोफॅगी '. जेव्हा आपण काही काळ अन्न घेत नाही , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी , स्वतःच्याच खराब झालेल्या पेशी आणि प्रथिनांचा पुनर्वापर करू लागते.सोप्या भाषेत सांगायचे तर , शरीर स्वतःचीच ' स्वच्छता ' (Cellular Cleaning) करते , ज्यामुळे जुनाट आजारांचा धोका कमी होतो. 2 . पचनसंस्थेला विश्रांती आणि डिटॉक्सिफिकेशन : आपली पचनसंस्था चोवीस तास कार्यरत असते.उपवासामुळे या संस्थेला आवश्यक विश्रांती मिळते. शरीरातील विषारी द्रव्ये ( T...