ब्लॉग नं. 2026/13 9 . दिनांक: 1 9 मे, 2026. मित्रांनो, ' स्लीप डेब्ट ': 6 तासांपेक्षा कमी झोप घेताय ? तर तुम्ही आरोग्याशी खेळत आहात आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत , कामाचा प्रचंड ताण असणे , हे जणू अभिमानाचे लक्षण मानले जाते."मी तर फक्त 5 -6 तासांच्या झोपेवर अगदी आरामात काम भागवतो ," असे सांगणारे लोक आपल्याला आजूबाजूला सर्रास भेटतात. रात्री उशिरापर्यंत जागून डेडलाइन्स पूर्ण करणे , डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि तीव्र डोकेदुखी घेऊन , कॉफीच्या मदतीने दिवस ढकलणे , ही अनेकांची रोजची दिनचर्या झाली आहे. पण ज्याला आपण ' उत्पादकता ' (Productivity) समजतो , ती प्रत्यक्षात आपल्या शरीराला आतून पोखरत आहे. नवीन संशोधनातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे , सातत्याने 6 तासांपेक्षा कमी झोप घेणे म्हणजे , केवळ सुस्ती येणे नव्हे , तर शरीराच्या अनेक महत्त्वाच्या यंत्रणा कोलमडून पडणे होय. या संबंधी सविस्तर जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: अपुऱ्या झोपेचा शरीरावर होणा रे 5 गंभीर परिणाम: ...
ब्लॉग नं . 2026 /134 . दिनांक: 14 मे, 2026. मित्रांनो , चालणे हे सर्वात सोपा आणि कुठलाही खर्च करावा लागत नसलेला,व्यायाम प्रकार आहे.चालण्याच्या व्यायामाचा विचार करताना , सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी नेमकी कोणती वेळ निवडावी , याचा विचार आपण अनेकदा करतो. ' सकाळी चालावे की संध्याकाळी ?' हा विषय नेहमीच चर्चेचा राहिला आहे. फिटनेसप्रेमी , डॉक्टर आणि अगदी कुटुंबातील व्हॉट्सॲप ग्रुप्समधील सदस्यही,यापैकी कोणती वेळ अधिक चांगली आहे , यावर आपली ठाम मते मांडत असतात.काही लोकांना सकाळची वेळ शांत , प्रसन्न आणि उत्साहवर्धक वाटते , तर काहींच्या मते दिवसभराच्या कामाच्या धावपळीनंतर,संध्याकाळची वेळ अधिक सोयीस्कर ठरते.मात्र , प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ, ( Diabetologist) डॉ. व्ही.मोहन यांच्या मते , यामागील सत्य बहुतेकांना वाटते,त्यापेक्षा खूपच साधे आणि सोपे आहे.आजच्या ब्लॉगमध्ये हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर: ' डॉ. मोहन्स डायबिटीस स्पेशालिटीज सेंटर ' चे अध्यक्ष,आणि ' पद्मश्री ' पुरस्कार विजेते डॉ. मोहन यांनी , चालणे आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण,या...