ब्लॉग नं. 2026/13 8 . दिनांक: 1 8 मे, 2026. मित्रांनो, रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि ' कर्बोदके ': जाणून घ्या शास्त्रोक्त माहिती सर्वसाधारणपणे असे मानले जाते की , रक्तातील साखर वाढण्यास केवळ कर्बोदके ( Carbohydrates) जबाबदार असतात.यामुळे अनेकजण आपल्या आहारातून धान्य पूर्णपणे बंद करतात.पण तज्ज्ञांच्या मते , सर्वच कर्बोदके शरीरासाठी घातक नसतात.खरं तर , काही विशिष्ट कर्बोदके तुमच्या शरीराच्या विरोधात नव्हे , तर शरीरासोबत काम करतात.या बाबत अधिक माहिती जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: इन्सुलिन प्रतिरोध ( Insulin Resistance) म्हणजे काय ? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसच्या मते , जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत , तेव्हा इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होतो.यामुळे ग्लुकोज रक्तप्रवाहात साचून राहते आणि स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन सोडावे लागते.एका सर्वेक्षणानुसार , 18 ते 44 वयोगटातील सुमारे 40 % अमेरिकन प्रौढांना ही समस्या जाणवते , ज्याची अनेकदा त्यांना जाणीवही नसते. संपूर्ण धान्ये इन्सुलिन प्रतिरोध सुधारण्यासाठ...
ब्लॉग नं. 2026/133. दिनांक: 13 मे, 2026. मित्रांनो, नुकतेच पंतप्रधानांनी देशाला उद्देशून एक महत्त्वाचे आवाहन केले आहे: पुढील एक वर्ष सोने खरेदी थांबवणे आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या बाबतीत काटकसरीचे धोरण अवलंबणे. सामान्य नागरिकाला वाटू शकते की, माझ्या वैयक्तिक सोने खरेदीचा किंवा गाडीच्या पेट्रोलचा , देशाच्या अर्थव्यवस्थेशी इतका मोठा काय संबंध? परंतु,यामागे 'परकीय चलन साठा' (Foreign Exchange Reserves) वाचवण्याचे , एक मोठे गणित दडलेले आहे. या संबंधी आपण आजच्या ब्लॉगमधून माहिती करून घेणार आहोत. सविस्तर: यावर पुढे काही लिहायच्या आधी मी हे स्पष्ट करू इच्छितो की, कुणाच्या पक्षाकडून नव्हे,तर देशाचा नागरिक म्हणून या प्रश्नाकडे पहातो. आपल्या सगळ्यांच्या मनांत “देश प्रथम” ही भावना असली पाहिजे.या भावनेतून पंतप्रधानांनी जे आवाहन केले आहे, त्याकडे पाहूया. 1 . भारत, सोने आणि आयात (The Gold Connection) : भारतात सोन्याला केवळ दागिना ...