ब्लाॅग नं.2026/125 5 मे, 2026. मित्रांनो , सावधान! फ्रीजमधील ' गार पाणी ' पिताय ? मग हे वाचायलाच हवे! उन्हाळ्याचे दिवस असोत किंवा कडक ऊन पडलेले असो , बा हेरून आल्यावर आपण सर्वात आधी फ्रीजकडे धाव घेतो आणि गटागटा गार पाणी पितो.त्या क्षणाला ते खूप सुखद वाटत असलं , तरी हेच गार पाणी तुमच्या शरीराचं किती नुकसान करतं , याची तुम्हाला कल्पना आहे का ? आज या विषयावर ब्लॉगमधे चर्चा करु या. सविस्तरः आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या दोन्हीनुसार , प्रमाणाबाहेर थंड पाणी पिणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.चला तर मग जाणून घेऊया , गार पाणी पिण्याचे गंभीर दुष्परिणाम. 1. पचनक्रियेवर होणारा परिणाम: जेव्हा आपण गार पाणी पितो , तेव्हा आपली पचनक्रिया मंदावते.अन्नाचे नीट पचन न झाल्यामुळे गॅस , ॲसिडिटी आणि अपचनाच्या समस्या वारंवार जाणवू लागतात.शरीर अन्नातील पोषक तत्वं शोषण्याऐवजी, पाण्याचे तापमान शरीराच्या तापमानाशी जुळवून घेण्यातच,आपली ऊर्जा खर्च करते. 2. हृदय आणि मेंदूसाठी घातक: हृदयाची गती: अति थंड पाणी प्यायल्याने,हृदयाच्या ठोक्यांची गती कमी होऊ शकते , ज्यामुळे हृदयावर विनाकारण ता...
ब्लॉग नं. 2026/118. दिनांक:- 28 एप्रिल ,2026. मित्रांनो , कॅल्शियमच्या गोळ्यांपलीकडे: मजबूत हाडांसाठी फक्त दूध आणि गोळ्या पुरेशा आहेत का ? अनेकांना असं वाटतं की,रोज एक कॅल्शियमची गोळी घेतली किंवा ग्लासभर दूध प्यायलं की,हाडांचे आरोग्य सुरक्षित झाले. पण तुम्हाला माहिती आहे का ? हाड म्हणजे केवळ कॅल्शियम साठवण्याची निर्जीव पेटी नाही , तर त्या जिवंत पेशी ( Living Tissue) आहेत. ती सतत झिजत असते आणि स्वतःची पुनर्बांधणी करत असते. आजच्या धावपळीच्या आणि शहरी जीवनशैलीत,हाडांचे आरोग्य राखणे हे केवळ पूरक आहारापुरते मर्यादित न राहता , ती एक दैनंदिन जीवनशैली बनणे गरजेचे आहे.आजचा ब्लॉग याच विषयाला समर्पित आहे. सविस्तर: 1 . हाड: एक जिवंत यंत्रणा : अस्थिरोग तज्ञांच्या मते , हाडांच्या आरोग्यासाठी केवळ कॅल्शियम पुरेसे नाही.हाडांची मजबूती टिकवण्यासाठी एका त्रिसूत्रीची गरज असते: · व्हिटॅमिन डी: कॅल्शियम शोषून घेण्यासाठी. · प्रथिने ( Proteins): हाडांच्या संरचनेसाठी आणि ताकदीसाठी. · ...