ब्लॉग नं.2026/116 दिनांक: 26 एप्रिल 2026. मित्रांनो , आजच्या काळात ' व्हिटॅमिन डी ' (Vitamin D) हे आरोग्याच्या जगातील सर्वात लाडकं सप्लिमेंट बनलं आहे. हाडे मजबूत करणे , रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि मन:स्थिती सुधारणे यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः भारतीयांमध्ये याची मोठी कमतरता आढळते , त्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ हे सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देतात. परंतु , " अति तिथे माती" ही म्हण व्हिटॅमिन डीच्या बाबतीतही खरी ठरते. गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन डी घेणे तुमच्या जीवावर बेतू शकते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण या विषयावर सविस्तर चर्चा करूया. सविस्तर: ⚠️ व्हिटॅमिन डी इतर व्हिटॅमिन्सपेक्षा वेगळे का आहे ? व्हिटॅमिन सी सारखी जीवनसत्त्वे पाण्यात विरघळणारी असतात , जी शरीराबाहेर सहज टाकली जातात. मात्र , व्हिटॅमिन डी हे चरबी-विद्राव्य ( Fat-soluble) आहे. याचा अर्थ असा की,ते शरीरातील पेशींमद्धे ( Tissues) जमा होते.ते सहजपणे शरीराबाहेर पडत नाही.कालांतराने याची पातळी धोकादायक मर्यादेपर्यंत वाढू शकते.सूर्यप्रकाश किंवा अन्नातून व्हिटॅमिन ...
ब्लॉग नं. 2026/109. दिनांक: 19 एप्रिल, 2026. मित्रांनो, काही वेळेस रक्त चाचणी केली आणि ब्लड रिपोर्ट आला की, आपल्या लक्षात येतं की, सूर्यप्रकाशात राहूनही व्हिटॅमिन डीची कमतरता आहे.खरं तर,आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की , " सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्रोत आहे." मग भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात , जिथे वर्षाचे बाराही महिने कडक ऊन असतं , तिथे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे रुग्ण का वाढत आहेत ? आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घ्या यामागची कारणे आणि उपाय ! सविस्तर: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( ICMR) च्या अहवालानुसार , भारतातील शहरी आणि निमशहरी भागातील,लोकसंख्येमध्ये व्हिटॅमिन डीची मोठी कमतरता दिसून आली आहे.दररोज उन्हात वावरणाऱ्या लोकांनाही,जेव्हा ' व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी ' असल्याचे कळते , तेव्हा प्रश्न पडतो की नक्की चूक कुठे होतेय ? चला तर मग , यामागचे वैज्ञानिक कारण आणि आपण करत असलेल्या सामान्य चुका समजून घेऊया. 1. सूर्यप्रकाशाची चुकीची वेळ: व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी,त्वचेचा सूर...